सामाजिक कार्यकर्ते भारतराव घोरपडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तालुका उपाध्यक्षपदी निवड; भरत घोरपडे यांचे मनोगत


14 जानेवारी 1988 जन्म, बालमटाकळी गावी झाला.प्रार्थमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा ,व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री भगवान विद्यालय बालमटाकळी गावातच झाले. घरची परिस्थिती जेमतेम वडील आणि आई शेतकरी दिवसभर शेतात कष्ट. दोन बहिणी व आम्ही तिघे भाऊ असे आमचे मोठे कुटुंब त्यात मी सर्वात लहान त्यामुळे सर्वांचा लाडका होतो लहानपणापासूनच मी जिद्दी धाडसी असल्यामुळे लहानपणी छोट्या मोठ्या व्यवसाय मी करायचो संघटित पणे मुलांचा एकत्रित ग्रुप गणेशोत्सव शिवजयंती गावची यात्रा अशा धार्मिक व सामाजिक कामांमध्ये नेहमी पुढे .त्यामुळे एक मुलांचा ग्रुप नेहमी संघटित असायचा लहानपणापासूनच वकृत्वाची आवड असल्यामुळे शालेय जीवनात अनेक महापुरुषांच्या जयंतीला मी भाषण स्पर्धेत भाग घ्यायचा यामुळे माझी स्टेज डेरिंग वाढली. विद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी व्यवसाय क्षेत्रात उतरलो रसवंती ग्रह ओम साई जनरल स्टोअर्स शालेय पुस्तकाचे दुकान सुरू केले ते करत असताना 2015 रोजी अचानक माझा हात उसाच्या चरख्यामध्ये अडकला व माझ्या हाताची तीन बोटे काढावी लागली त्यामुळे मनाला खूप वाईट वाटले परंतु कुटुंबाने आधार दिला त्यातून मी सावरलो,पुढे समाजकारण करत असताना भाजप तालुका अध्यक्ष श्री तुषार भाऊ वैद्य भाजप पक्षामध्ये मी दहा वर्ष काम पाहिले या दहा वर्षात दोन वेळेस आमच्या भावजाईला ग्रामपंचायत सदस्य केले. नेहमी देण्याची भूमिका असल्यामुळे नेहमी पाठीशी उभा राहायचं स्वतःला काही मागितले नाही आणि स्वतःहून कोणी काही दिले नाही.त्याच काळात स्वच्छ विचाराची संगत मा,तुषार भाऊ वैद्य व जिल्हा परिषद सदस्य मा, नितीन भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाने समाजकार्याची आवड लागली . त्याच काळात बालमटाकळी ते अर्धपिंपरी या रस्त्यासाठी संपूर्ण शेतकऱ्याला घेऊन शेवगाव गेवराई रोडवर भव्य रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सतत अग्रेसर राहिलो. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे याच्या अंतरवाली मराठी येथे मोटार सायकल राली घेऊन शेकडो युवक गावच्या वतिने पाठिंबा दिला.नितिनभाऊ त्यांच्याबरोबर काम करत असताना बरेचसे अनुभव बरसे लोकांशी गाठीभेटी सुख दुःखामध्ये लोकांच्या नेहमी अग्रेसर राहायचं यामुळे एक वेगळी छाप निर्माण झाली. भाऊंचाही विश्वासाला मी पात्र ठरवलं अगदी कौटुंबिक संबंध त्यांच्याबरोबर झाले. पुढे गावातील ग्रामपंचायत निवडणूक 2023 रणधुमाळी सुरू झाली प्रत्येकाला सामाजिक कार्यकर्त्याची उणीव भासू लागली प्रत्येकाला मी हवा होतो परंतु राजकारण माझ्या डोक्या बाहेर होते, नकळत कुटुंबातीलच बंधूंची उमेदवारी झाली त्यामुळे पर्याय नव्हता त्यांच्या प्रचारार्थ लोकांपर्यंत जाणे मतदान मागणे त्यांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे शब्द द्यावे लागले त्यातूनच राजकारणात पाऊल पडले निस्वार्थी स्वभाव निर्मळ मन प्रखर वकृत्व यामुळे निश्चितच त्याचा फायदा कुटुंबातील बंधूंचे उमेदवारीला झाला व विद्यमान उपसरपंच हे पद मिळवले या सर्व प्रक्रियेमध्ये मी केलेली यंत्रणा सूत्रसंचालन तसेच तरुणांचा प्रस्ताव त्यांच्याविरोधात केलेला बळीराजा नावाचा पॅनल तिसरी आघाडी या सर्वांचा ठसा गावातील व तालुक्यातील राजकारणात पडला. आता गावात पूर्वी असलेली ओळख ही तालुक्यात झाली. नेहमी ओळख झालेले एक माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर घेणे हा छंदच लागला. यातून अजून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट बोलणे करायचं यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये मी घर केले. त्यामुळे नक्कीच पुढील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःहून बळीराजा ग्रुपचे काही सदस्य घेऊन दोन महिन्या अगोदर माननीय लोकप्रिय खासदार निलेश जी लंके साहेब यांच्याकडे जाणारा मी छोटासा कार्यकर्ता आहे. साहेब तुम्ही लढा मी तुमच्या पाठीशी आहे. असं त्यांना शब्द दिला मनाचा मोठेपणा दाखवला साहेब यांना खूप आनंद झाला. त्यांनी सर्वांना नाश्ता जेवण मानसन्मानासह आम्हाला निरोप दिला. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली एक दिलाने आमचा ग्रुप साहेबांच्या विचाराशी खंबीरपणे उभा होता. कलियुगातील नौटंकी राजकारणामुळे प्रत्येक जण दोन डगऱ्यावर हात ठेवून होता. परंतु आम्ही स्वाभिमान ग्रुप निष्ठेने साहेबांच्या तुतारी या चिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी घराघरापर्यंत जनतेच्या मनामध्ये पोहोचलो पक्षाची साहेबांची माहिती दिली. त्यामुळे बराचसा दिन दलित मागास वर्ग शेतकरी वर्ग कामगार वर्ग समाज आमच्या मागे एक एकवटला. शेवटी साहेबांचा विजय झाला.बळीराजा सर्व ग्रुप सदस्य आनंदी झाले व आनंद उत्सव साजरा केला. साहेबांबरोबर त्यावेळेस मला अनेक गावात नावे तर आसपास तालुक्यामधील संपूर्ण गाव आम्ही पिंजून काढला. नंतरही साहेबा बरोबर दूध व कांदा प्रश्न अहमदनगर ठिकाणी सहभागी झालो.इतरही कुठल्याही कार्यक्रमाला साहेब पाथर्डी शेवगाव नेवासा पैठण तालुक्यात आले तर आम्ही सर्व ग्रुप सदस्य साहेबांच्या कार्यक्रमाला हजर व्हायच. यामुळे साहेबांचा आमचा थेट परिचय झाला. गावातील अडचणी रस्ते पाणी लाईट याविषयी चर्चा आम्ही सतत करायचो. अँड प्रताप काका ढाकणे साहेबांबरोबर एक निष्ठेने लोकसभेत काम आम्हाला पाहायला मिळाले. पक्षानेही त्यांना त्यांचे कार्य पाहून लवकरच उमेदवारी जाहीर करतील. यामुळे सर्वांच्या मनामध्ये आनंद झाला प्रताप काकांशी आणि ऋषिकेश दादांची ही अधून मधून कॉन्टॅक्ट होत होते. त्यातूनच पुढे शरदचंद्रजी पवार गट पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पद मिळाले. केलेल्या कामाची जीवनातील पहिली पावती मिळाल्यासारखे वाटले. कोणीतरी न्याय केला असं मनात विचार आला. त्यानंतर आमच्या सर्व ग्रुपने शिवस्वराज्य यात्रा शेवगावला आली तेव्हा माननीय श्री जयंतराव पाटील साहेब तसेच संसद खासदार अमोलजी कोल्हे लोकप्रिय नगर दक्षिण खासदार निलेश लंके साहेब तसेच अँड प्रतापराव ढाकणे व अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गट श्री हरिश भारदे, सर्वांच्या समक्ष भाजप सोडून शरदचंन्द्र पवार गट तुतारी पक्षामध्ये सर्व बळीराजा ग्रुप सदस्यांनी प्रवेश केला. खा,निलेश लंके याच्या हस्ते निवडीचे पत्र घेतले. आज खुप समाधान वाटले, अनेक क्षेत्रातील लोकांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या.
त्या सर्व जनतेचा मि आभारी आहे.


Leave a Comment