काँग्रेसने कानडेना डावलून ओगलेना श्रीरामपूरची उमेदवारी


अहिल्यानगर.
श्रीरामपूर मतदारसंघातून धक्कादायक बातमी आली आहे. या बातमीने अनेकांना आश्चर्यचकित केले. श्रीरामपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी मिळेल अशी ठाम शक्यता होती पण अचानक काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आणि काँग्रेस पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष हेमंत ओगले यांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ओगले समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. ओगले यांच्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायची असा चंग बांधला आहे. आमदार लहू कानडे आणि त्यांचे समर्थक यांच्यामध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. विद्यमान आमदारांना विधानसभेचे तिकीट दिले जाते असा काँग्रेसचा प्रभागात आहे पण काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर नाराजी दाखवत ओगले यांना उमेदवारी दिली.
हेमंत ओगले हे तरुण तडफदार उमेदवार आहेत तर विद्यमान आमदार हे वयस्कर झालेले आहेत. त्यामुळे मतदारांची मागणी होती की आमच्या मतदारसंघाला तरुण तडफदार उमेदवार पाहिजे. आता पुढे आमदार लहू कानडे यांचे समर्थक ओगले यांना सहकार्य करतात की वेगळी भूमिका घेतात ते पाहावे लागेल. मतदानाच्या अनुषंगाने हा निर्णय जनता दरबारात वीस तारखेला जात आहे आणि त्याचा निकाल 23 तारखेला लागत आहे.


Leave a Comment