अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या मतदार संघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार अशी लढत होती. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर निवडणूक निकालाच्या दिवशी तर तब्बल 11तास मतमोजणी चालू होती. सर्वात शेवटी निकाल लागला असेल तर तो कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचा. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे तो म्हणजे रोहित पवार हे जिंकून कसे आले याच्यापेक्षा राम शिंदे यांचा पराभव कसा झाला ? तसेच राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला . रोहित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात पोस्टल मतदानामध्ये आघाडी घेतली. त्यामुळे राम शिंदे यांचा शेवटचा टप्प्यात पराभव झाला असं म्हणायला हरकत नाही.
राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे विरोधात चांगलीच कडवी झुंज दिली. त्यामुळे राम शिंदे यांचा पराभव होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? राम शिंदे यांची यंत्रणा नेमकी कोठे कमी पडली ? तर रोहित पवार यांना कोणाचा पाठिंबा भेटला त्यामुळे रोहित पवार यांचा विजय थोडाफार प्रमाणात सोयीस्कर झाला? असे प्रश्न सर्वांनाच पडत आहेत. चला तर मग पाहूया राम शिंदे यांचा पराभव होण्याचे पाच कारणे.
कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाचे राम शिंदे यांना एक लाख 26 हजार 433 एवढे मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांना एक लाख 27 हजार 676 एवढे मते मिळाली. रोहित पवार यांना शेवटच्या टप्प्यामध्ये 1243 मतांची आघाडी घेऊन त्यांचा विजय झाला. प्राध्यापक राम शिंदे यांनी 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी चांगली तयारी केली होती असं म्हणायला हरकत नाही कारण शिंदे हे निवडणुकीत पहिल्यापासूनच आघाडी घेत रोहित पवार यांच्या यंत्रणेला त्यांनी जेरीस आणलं होतं.
शिंदे मोठ्या प्रमाणात विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते परंतु शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचे बळावर सूत्र फिरवली असं बोललं जात आहे. कारण कर्जत जामखेडची निवडणूक पार्सल व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच झाली. यावेळी या निवडणुकीत पवारांच्या धनशक्ती विरोधात लढण्यासाठी शिंदे यांचे पाठीशी जनशक्ती एकवटली होती. मतमोजणीच्या दिवशी राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या चांगले चढ उतार पाहायला मिळाली सलग अकरा तास मतमोजणी चालू होती मोठ्या प्रमाणात रोहित पवार हरले राम शिंदे जिंकले राम शिंदे हरले रोहित पवार जिंकले अशा बातम्याही समोर येत होत्या परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये पोस्टल मतदानामध्ये रोहित पवार यांनी आघाडी घेतली आणि राम शिंदे यांचा १२४३ मतांनी निसटता पराभव झाला. चला तर पाहूया राम शिंदे यांचा पराभव नक्की का झाला?
कर्जत जामखेड येथील निवडणुकी तसे पाहिले गेले तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. तसेच राम शिंदे यांचे प्रचार यंत्रणापेक्षा रोहित पवारांची प्रचार यंत्रणा ही नेहमीच दांडगी राहिलेली आहे. त्यामुळे राम शिंदे यांची प्रचार यंत्रणा कुठेतरी ढिसाळ पाहायला मिळाली आहे. कारण राम शिंदे यांना कौटुंबिक राजकीय वारसा नसल्यामुळे यांच्या पाठीमागे कुटुंबातून पाहिजे तेवढा पाठिंबा नाही. तसेच 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्येच रोहित पवार आणि अजित पवार यांची कराड येथे भेट झाली त्यावेळी अजित पवार माध्यमांसमोर रोहित पवार यांना बोलून गेले अरे ढाण्या वाचलास तू माझी सभा कर्जत जामखेड मध्ये झाली असती तर तुझे काय झाले असते. त्यावर ती रोहित पवार यांनी देखील मिस्कीलपणे उत्तर दिले होते निकालामध्ये थोडाफार वर खाली झालेलं पाहायला भेटलं असतं.
याचाच अर्थ असा होतो की अजित पवार यांनी जाणून-बुजून कर्जत जामखेड येथे सभा घेतली नाही की खरंच अजित पवार यांना कर्जत जामखेड मध्ये येण्यासाठी वेळच भेटला नाही. त्यानंतर राम शिंदे यांनी देखील माध्यमांसमोर येऊन त्यांचे मत व्यक्त केले आहे कारण राम शिंदे यांनी सांगितले की त्यांना कुठेतरी कुणकून लागली होती की अशा काहीतरी गोष्टी पाठीमागे चालू आहेत परंतु त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु ज्या वेळेस अजितदादा यांचे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये पसरू लागले तसे राम शिंदे यांनी देखील प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलू लागले की मी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये जो समंजस करा झाला होता त्याचा बळी पडलो आहे.
माझ्या कानावर या अगोदरही या गोष्टी आल्या होत्या परंतु असं काही होणार नाही अजित पवार हे महायुतीमध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी होणार नाहीत असं मला वाटत असल्यामुळे या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले त्यामुळे माझा पराभव झाला आहे.तसेच महायुतीतील उमेदवारांनी असं करणं हे चुकीच आहे हे देखील राम शिंदे बोलले आहेत. तसेच दुसरीकडे मुद्दा येतो तो म्हणजे सुजय विखे यांचा. सुजय विखे यांनी तसे पाहिले गेले तर भाजपचे उमेदवार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी त्यांनी पारनेर विधानसभा श्रीगोंदा विधानसभा शिर्डी विधानसभा संगमनेर विधानसभा अशा अनेक मतदारसंघांमध्ये त्यांनी सहभागीतल्या परंतु सुजय विखे यांनी देखील कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये सभा घेतली नाही. त्यामुळे राम शिंदे यांना एकंदरीत भाजप पक्षाकडूनही आणि महायुतीकडून पाहिजे तसा पाठिंबा भेटला नाही असे म्हणायला हरकत नाही.
तसेच राम शिंदे यांचा जनसंपर्कही कमी झाला कारण ते मतदारसंघांमध्ये जास्त वेळ देत नाही अश्या चर्चा त्यांच्या कर्जत जामखेड मतदासंघांमध्ये रंगल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता राम शिंदे यांना अगदी थोड्या मतांनी पराभवाला सामोरे जायला लागले परंतु राम शिंदे यांनी फेर मतमोजणी व्हावी यासाठी देखील अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र मध्ये अशा चर्चा आहेत की महायुतीने ईव्हीएम हॅक केल्यामुळे त्यांचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आले आहेत. परंतु कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र भाजपच्या उमेदवाराने फेर मतमोजणी साठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राम शिंदे हे चांगले चर्चेत आले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते फेरमतं मोजणी झाल्यानंतर निकालामध्ये काही फरक पडेल का तसेच राम शिंदे यांना पराभूत होण्यामागे आणखी कोणती कारणे आहेत हे आम्हाला कमेंट्स करून कळवा