मुंबई स्पीड बोट दुर्घटना


मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
तर हा अपघात नक्की झाला कसा? या सर्व प्रकाराला जबाब
चला तर पाहूया मुंबई येथे एलिफंटाला जाणारे एक प्रवासी बोट का बुडाली?
बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी गेट ऑफ इंडिया वरून साडेतीन वाजता ही बोट एलिफंटाकडे निघाली होती या बोटीमध्ये एकूण १००पेक्षा  जास्त प्रवासी होते . या बोटने जवळपास १० किलोमीटर प्रवास केला होता.
तेवढ्यात तिथे एक छोटी बोट ज्यामध्ये आठ ते दहा माणसे होती ते तिथे जवळपास राऊंड मारत होते परंतु त्या बोटचा स्पीड खूप जास्त होता.
ती बोट दुसरी राउंड मारत असताना मोठ्या बोटलां येऊन जोराने धडकली. त्यामुळे हळूहळू मोठ्या बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली.
तशी बोटही पाण्यात बुडायला लागली.
यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. पण आता या अपघातामध्ये १० प्रवाश्यांचा आणि ३ नौदलातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण 130 जणांची क्षमता या बोटीची होती. सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाश्यांचं बचावकार्य पूर्ण झालं होत. तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असंही म्हटलं जातंय. या बोटीमध्ये लहान मुलं, अनेक कुटुंब होती.
एका स्पीड बोटने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि हा अपघात झाला आहे. नेमकं त्याक्षणी काय घडलं? बोट नेमकी कशी बुडाली? याबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने  सांगितलं आहे कि ‘मी गेटवे ऑफ इंडियावरुन 3.30 वाजता ही बोट पकडली. जवळपास आम्ही 10 किलोमीटरचा प्रवास केला होता.  तर तिथे एक स्पीड बोट राऊंड मारत होती. तिचा स्पीड खुप जास्त होता.
दुसऱ्या राऊंडला ती स्पीड बोट आली आणि आमच्या बोटीला धडक दिली. तेवढ्यात आम्हाला ड्रायव्हरनेही लाईव्ह जॅकेट घालायला सांगितलं. मी बोटीच्या वर होतो, खाली येऊन लाईव्ह जॅकेट घालेपर्यंत संपूर्ण बोटीमध्ये पाणी आलं. बोट उलटली होती. मी पुन्हा बोटीच्या वर गेलो. जवळपास 15 मिनिटं पोहत होतो. तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीने मला वाचवलं.’ या बोटीमध्ये अनेक लहान लहान मुलं होती, बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट देण्यात आलं, असं सगळं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
बोटीत किती जण होते? यावर  काही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ‘बोटीत जवळपास 100 पेक्षा अधिक लोकं होते. लहान लहान मुलं आहेत,बरीच कुटुंब होती. आम्हालाही सुरुवातीला लाईव्ह जॅकेट दिलं नव्हतं. जेव्हा बोटीत पाणी यायला लागलं तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट देण्यात आलं. बोट बुडाल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी बचाव कार्य सुरु झालं
बचावपथक जवळपास अर्ध्या तासाने आलं. पण ज्या बोटी आजूबाजूने जात होत्या, त्यातली एक बोट 15 मिनिटांत आली. स्पीड बोटमध्ये 8 ते 10 माणसं होती. ते धडक देतील हा विचार मी करत होतो की तेवढ्यात त्या स्पीड बोटने येऊन धडक दिली. त्याच बोटीमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या बोटीतील एका व्यक्तीचा पाय तुटला, त्याच रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला आम्ही आमच्या बोटीमध्ये घेतलं.
मुंबईतील गेटवेहून एलिफंटा येथे प्रवाशांना घेऊन निघालेली प्रवासी बोट उरण कारंजा येथे समुद्रात बुडाल्याची घटना घडल्यानंतर आता या बोटीच्या चालकाने या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने ती बुडाल्याचा आरोप केले.
ज्या स्पीड बोटीने या बोटीला धडक दिली ती बोट नेव्हीची असल्याचं म्हटलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही बोट नेव्हीची असल्याचं म्हटलंय. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मी देखील तो व्हिडीओ पाहिला. नेव्ही किंवा कोस्टगार्ड अतिशय वेगाने बोट फिरवत होते. बहुधा त्या बोटीचा कंट्रोल गेला. जर ही बोट नेव्हीची असेल तर या बोटीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. परंतु हे सर्व आरोप नेव्हीने फेटाळले आहेत.
या बोटीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर या घटनास्थळावरचं संपूर्ण बचावकार्य पूर्ण झालयं.
या अपघतावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, ‘एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशासनाला आदेश दिले आहेत.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली. तसेच मुंबईत एलिफंटा परिसरात काल सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला दिले आहेत.
ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण ही केवळ दुर्दैवी घटना आहे, असं बोलून चालणार नाही. कारण याआधी देखील अशाच प्रकारे दोन ते तीन वेळ ही बोट उलटली आहे. एकूण प्रवाश्यांची क्षमता आणि किती जणांना बोटीत ठेवलं होतं, ते पहावं लागेल. मेरीनटाईम बोर्डाच्या माध्यमातून बोटींची तपासणी होत नाही, असं पाहायला मिळतंय. याची चौकशी व्हायला हवी.
शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जे प्रवासी होते त्यातील दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बरेच प्रवासी वाचलेत. त्यामुळे चिंतेची बाब नाही. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही. यासाठी जबाबदार ज्या बोटीने धडक दिली ती बोट आहे. ती बोट नेव्हीची असल्याचं सांगण्यात येतंय, पण ज्यावेळी नेव्हीचे लोक म्हणतायत ती आमची बोट नाही. यासंदर्भातली अधिकृत माहिती समोर यायला हवी.
तर हा अपघात नक्की कोणामुळे झाला तसेच यामध्ये दोषी कोण कोण आहे या सर्व गोष्टी समोर येतीलच परंतु या अपघात का झाला आणि त्यामध्ये चूक कोणाची असेल यावर तुमची प्रतिक्रिया काय हे मला कमेंट्स करून कळवा.

Leave a Comment