नंदुरबार जिल्हा येथे चार विधानसभा मतदारसंघ आहेत ,
नंदुरबार येथे अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, ही चार विधानसभा मतदारसंघ आहेत.
पहिला विधानसभा मतदारसंघ आहे अक्कलकुवा
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक आहे.
अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघ येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आमशा पाडवी यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाकडून के सी पाडवी आणि अपक्ष हिना गावित अशी लढत झाली होती
यामध्ये आमशा पाडवी यांना 72 हजार 629 एवढी मते मिळाली तर कै सी पाडवी यांना 69 हजार 725 एवढी मते मिळाली
आणि हिना गावित यांना 6हजार 731 एवढी मते मिळाली.
यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमशा पाडवी हे अक्कलकुवा येथे आमदार म्हणून निवडून आले.
दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे शहादा
शहादा विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोन आहे
शहादा या विधानसभा मतदारसंघ येथे भाजप पक्षाकडून राजेश पाडवी यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र कुमार गावित आणि अपक्ष गोपाळ भंडारी अशी लढत झाली होती
यामध्ये राजेश पाडवी यांना एक लाख 46 हजार 839 एवढी मते मिळाली तर राजेंद्र कुमार गावित यांना 93 हजार 625 एवढी मते मिळाली आणि अपक्ष गोपाळ भंडारी यांना 2 हजार 396 एवढी मते मिळाली.
यामुळे शहादा विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये भाजप पक्षाचे राजेश पाडवी हे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे नंदुरबार
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ क्रमांक तीन आहे
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये भाजप पक्षाकडून विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाकडून किरण ताडवी आणि मनसेकडून वासुदेव गांगुर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात होते
यामध्ये भाजप पक्षाचे विजयकुमार गावित यांना एक लाख 55 हजार 190 एवढी मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे किरण ताडवी यांना 78, हजार 943 एवढी मते मिळाली तर मनसे पक्षाचे वासुदेव गांगुर्डे यांना १ हजार 209 एवढी मते मिळाली.
यामुळे नंदुरबार येथे 2024 मध्ये भाजप पक्षाचे विजयकुमार गावित यांचा दणदणीत विजय झाला आहे.
आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे नवापूर
नवापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक चार आहे
नवापूर विधानसभा मतदारसंघ येथे काँग्रेस पक्षाकडून शिरीष कुमार नाईक यांच्याविरुद्ध अपक्ष शरद गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारत गावित हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
यामध्ये काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांना 87 हजार 166 एवढी मते मिळाली तर अपक्ष शरद गावित यांना 86 हजार 45 एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारत गावित यांना 56 हजार 176 एवढी मते मिळाली.
यामुळे 2024 मध्ये नवापूर येथे काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांचा दणदणीत विजय झाला आहे.
तर मंडळी ही आहे माहिती नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील निकालाबद्दल.
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.