१४ वर्षाच्या मुलांतील वाद आणि निर्घृण हत्याजगात मैत्रीचं नातं खूप चांगलं म्हणलं जातं परंतु आता त्याच मैत्रीवरून विश्वास उठत चालला आहे. त्याचे कारण एकूण तुम्ही थक्क व्हाल. आपल्याला आपल्या जीवनात लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपल्या सोबत मैत्री ही असतेच. अगदी लहान वयापासूनच मैत्रीची सुरुवात होती. परंतु आता अशा लहान वयातच मैत्रीमध्ये देखील वाद होताना दिसू लागले आहेत. अशीच काहीशी घटना घडली लातूर येथील औसा तालुक्यामध्ये. अवघ्या 14 वर्षाच्या मुलाने त्याच्याच वयाच्या मुलाची हत्या करून तो मृत्यूदेह लपवून ठेवला होता.त्यामुळे ह्या मुलांची मानसिकता कशी होत चालली आहे आणि जरी आपण हत्या केली तरी यातून कशी सुटका करायची हे देखील यांना समजत आहे. तसेच आत्ताच्या मुलांना स्वतःच्या रागावर ती नियंत्रणही ठेवता येत नाहीये. त्यामुळे अशा घटना घडल्याच्या समोर येत आहे. चला तर पाहूया 14 वर्षीय मुलाने त्याच्याच वयाच्या मुलाची हत्या का केली आहे, लातूरमध्ये नेमकं काय घडलं आहे
औसा तालुक्यातील कमालपूर येथील मृत रितेश गिरी व त्याचे दोन मित्र राजू पटेल वय वर्षे 14 व प्रसिध्द थोरे वय वर्षे 14 हे तिघे मित्र शनिवारी (ता.११) रोजी दुपारी विजया गिरी यांच्या शेतात असलेले नारळ खाण्यासाठी गेले होते. परंतु रितेश गिरी हा रात्र झाली तरी घरी आला नव्हता. रात्री नऊ वाजेपर्यंत रितेश वय वर्षे 14 घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी विचारपूस करीत त्याचा शोध घेत होते. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्याच्या सोबत गेलेल्या प्रसिद्ध थोरे हा गावात रितेशच्या वडिलांना दिसला. त्याला रितेश बाबत विचारले असता प्रसिद्धने तो माझ्या जवळून केव्हाच गेला असल्याचे सांगीतले . तसेच आता तो कुठे गेला हे माहीत नसल्याचे सांगितले.
घरच्यांनी रितेशचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.त्यामुळे संपूर्ण कुटुंब रात्रीचा रितेश कुठे असेल याची चिंता करीत ते झोपले. दुसऱ्या दिवशी रविवारी रितेशचा शोध घेत असतांना त्यांना राजू पटेल हा भेटला. त्याला रितेश बाबत विचारणा केली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. राजू पटेल याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की गावातील वामन गणपतराव कदम यांच्या शेतात नारळे खाण्याचे ठरवून प्रसिद्ध थोरे याने नारळ फोडण्यासाठी धारधार लोखंडी वीळा घेतला होता. शेतात जाऊन नारळ फोडून खाल्ली. तेथून परत येत असतांना विजया गिरी यांच्या शेतात प्रसिद्ध व रितेश यांच्यात बोलण्या बोलण्यात वाद झाला. रागाच्या भरात प्रसिध्द थोरे याने हातातील धारदार लोखंडी विळ्याने गळ्यावर, पोटावर, मानेवर व शरीराच्या इतर भागावर वार करून रितेशचा खून केला. त्यानंतर रितेश याला विजया गिरी यांच्या शेतात असलेल्या सोयाबीनच्या गुळीत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गाडून त्यावर गुळी टाकली. यावरून रितेशच्या कुटुंबाने शेताकडे धाव घेत गुळी बाजूला सारून पाहिले तर त्यामध्ये नग्न अवस्थेत रितेशचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या गळ्यावर, मांडीवर, हातावर व डोक्यात वार झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. या सर्व घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण होते. तसेच संशयिताला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका रितेश गिरी यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर त्या कुटुंबियांची पोलिसांनी समजूत काढत संशयित मुलांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.