संतोष देशमुख यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष देशमुख यांना महिन्याभर आधीपासून धमकी येत होती अशी माहिती आहे. याबाबत त्यांच्या पत्नीला विचारलं असता त्या म्हणाल्या, “पवनचक्की प्रकरणावरून त्यांचं भांडण झालं होतं. तेव्हापासून ते टेन्शनमध्ये होते. त्यांनी फोनवरून मला एवढंच सांगितलं की पवनचक्कीवरून किरकिर झाली आहे. ते गुंडप्रवृत्तीचे लोक आहेत.” भांडण झाल्यानंतर शनिवारी ते लातूरला आले होते. त्यांनी मला सांगितलं की मला खूप भीती वाटतेय. ते गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, मला मारहाण करतील. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की भीती वाटतेय तर गावी जाऊ नका. थोडेदिवस इथे थांबा. त्यामुळे ते शनिवारी गावी परतले नाहीत. रविवारीही लातुरला थांबले. पण त्यांना सतत कोणाचे तरी फोन येत होते. सतत फोन यायला लागल्याने ते गावी जातो असं सांगून सोमवारी निघून गेले”, असं आश्विनी देशमुख म्हणाल्या. दरम्यान, आज बीडमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला. पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं. तसंच आत्मदहनाचाही इशारा दिला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्यावर बांगड्यासुद्धा फेकल्या. तसंच, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही येथील महिलांनी केला.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *