शिंदेंच्या माजी आमदारामुळे ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराची आमदारकी धोक्यात?
उमरगा विधानसभा मतदारसंघ येथे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून ज्ञानराज चौगुले यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रवीण स्वामी अशी लढत झाली होती.
यामध्ये ज्ञानराज चौगुले यांना 92 हजार 241 एवढी मते मिळाली होती तर प्रवीण स्वामी यांना 96 हजार 206 एवढी मते मिळाली होती.
त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे आमदार म्हणून निवडून आले होते.
परंतु आता त्यांच्या आमदारकी धोक्यात आले आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात का आली आहे?
प्रवीण स्वामी हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा निवडणुकीतील पराभव झालेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे.
आता या याचिकेची सुनावणी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे.
तोपर्यंत प्रवीण स्वामी यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जात पडताळणी समिती धाराशिव येथे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र या समितीने याबाबतची सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगत ही तक्रार फेटाळली होती.
त्यामुळे ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.  आता प्रवीण स्वामी यांच्या प्रमाणपत्राच्या वैद्यतेबाबत फेब्रुवारी महिन्यामध्ये सुनावणी होणार आहे.
तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून प्रवीण स्वामी यांना याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कारण असे बोलले जात आहे की शिवसेना फुटी नंतर चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं बोललं जात आहे.
तर आता आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रवीण स्वामी यांच्या जात प्रमाणपत्र वैद्यतेबाबत सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होईल त्यामुळे आता निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर या सर्व गोष्टींवरती प्रवीण स्वामी हे काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *