288 विधानसभा मतदारसंघांपैकी 21 मतदारसंघात 21 महिला ह्या आमदार झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीतील भाजपने 132 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने 41 जागांवर बाजी मारली आहे.
तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागा जिंकल्या. समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या. इतर पक्ष आणि अपक्षांना 10 जागा मिळाल्या.
या निकालांमध्ये महिलांनी देखील बाजी मारलेली आपण पाहिले आहे.
288 विधानसभा मतदारसंघांपैकी 21 मतदारसंघात 21 महिला ह्या आमदार झाल्या आहेत.
21 महिला आमदारांपैकी भाजप पक्षाच्या 14 महिला उमेदवार विजयी झाले आहेत त्यापैकी दहा दहा महिला उमेदवार ह्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत.
तर शिवसेना एकनाथ शिंदे या गटाच्या दोन महिला उमेदवार जिंकून आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चार महिला उमेदवार निवडून आले आहेत
तर विरोधी पक्षातून एक महिला आमदार निवडून आले आहेत त्या काँग्रेसच्या पक्षाच्या आहेत.
चला तर पाहूयात 288 मतदारसंघांपैकी 21 मतदारसंघातील 21 महिला उमेदवार ज्या जिंकून आले आहेत त्या नक्की कोण आहेत आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
भाजपच्या सर्वाधिक 14 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यापैकी 10 उमेदवारांना जनतेने पुन्हा निवडून दिले आहे.
श्वेता महाले या चिखली या मतदारसंघातून बाजी मारली आहे.
चिखली या मतदारसंघातून श्वेता महाले यांच्याविरुद्ध राहुल बोंद्रे अशी लढत झाली होती.
यामध्ये श्वेता महाले यांना एक लाख 9 हजार 212 मते मिळाली तर राहुल बोंद्रे यांना एक लाख सहा हजार अकरा मते मिळाली.
पुढील महिला उमेदवार आहेत त्या म्हणजे मेघना बोर्डीकर
मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर या विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे.
जिंतूर या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून मेघना बोर्डीकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून विजय भांबळे हे रिंगणात होते.
मेघना बोर्डीकर यांना एक लाख 13 हजार 432 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार 916 एवढी मते मिळाली त्यामुळे मेघना बोर्डीकर यांचा ४ हजार पाचशे 16 मतांनी विजय झाला.
आता पाहुयात पुढील महिला उमेदवार त्या म्हणजे देवयानी फरांदे.
देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे.
नाशिकमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून देवयानी फरांदे यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वसंत गीते हे रिंगणात होते.
देवयानी फरांदे यांना एक लाख 4 हजार 986 एवढी मते मिळाली तर वसंत गीते यांना 87 हजार 151 एवढी मते मिळाली.
आता पाहुयात पुढील महिला उमेदवार त्या म्हणजे सीमा हिराई.
नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सीमा हिराई या महिला उमेदवार विजयी ठरल्या आहेत.
नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाच्या सीमा हिराई यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे रिंगणात होते.
सुधाकर बडगुजर यांना 72 हजार 661 एवढी मते मिळाली तर भाजप पक्षाच्या सीमा हिरा यांना एक लाख 40 हजार 773 एवढे मते मिळून विजयी झाल्या
बेलापूर या विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे या विजयी झाल्या आहेत.
बेलापूर विधानसभा संघातून भाजप पक्षाच्या मंदा म्हात्रे यांचा 1554 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे संदीप नाईक यांचा पराभव केला.
गणेश नाईक आणि त्यांच्या मुलाला वेगळ्या पक्षात पाठवण्यासाठी बेलापूर विधानसभातल्या या मतदारसंघाची उमेदवारी कारणीभूत ठरली. .
ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या मतदारसंघातून यंदा भाजपतर्फे मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे गणेश नाईकांचा मुलगा संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली.
दहिसर या विधानसभा मतदारसंघातून मनीषा चौधरी या महिला उमेदवार यांनी गुलाल उधळला आहे
दहिसर या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून मनीषा चौधरी यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विनोद घोसाळकर हे रिंगणात होते.
विनोद घोसाळकर यांना ५४ हजार 298 एवढी मते मिळाली तर मनीषा चौधरी यांना एकूण 98587 मतं मिळून त्यांचा विजय झाला आहे.
गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.
गोरेगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाच्या विद्या ठाकूर यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समीर देसाई हे रिंगणात होते.
समीर देसाई यांना 72 हजार 764 एवढे मते मिळाली तर भाजप पक्षाच्या विद्या ठाकूर यांना 96 हजार 364 एवढे मते मिळाली.
विद्या ठाकूर ह्या तब्बल 23 हजार 600 मते वाढीव जिंकल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील पर्वती या विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ या विजयी झाल्या आहेत.
पर्वती या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाच्या माधुरी मिसाळ यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून अश्विनी कदम या रिंगणात होत्या.
अश्विनी कदम यांना 63 हजार 372 एवढे मते मिळाली तर माधुरी मिसाळ यां एक लाख 17 हजार 887 एवढी मते मिळून त्या विजयी झाल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या विधानसभा मतदारसंघातील मोनिका राजळे या विजय ठरल्या आहेत.
भाजपच्या मोनिका राजळे यांना 98 हजार 630 मते घेत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांना 78 हजार 881 मते मिळाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना 57 हजार 235 मते मिळाली.
केज या विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाच्या नमिता मुंदडा यांचा विजय झाला आहे.
केजा विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून नमिता मुंदडा यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे हे रिंगणात होते.
पृथ्वीराज साठे यांना एक लाख 14 हजार 394 मते मिळाली तर नमिता मुंदडा यांना एक लाख 17 हजार 81 एवढी मते मिळाली.
नमिता मुंदडा या 2687 एवढी वाढीव मते घेऊन जिंकून आल्या.
भाजपच्या 4 नवीन महिला आमदारांमध्ये श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंबारी) यांचा समावेश आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे) 2 महिला आमदार विजयी ठरल्या आहेत.
मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 महिला आमदार यांनी गुलाल उधळला आहे.
सुलभा खोडे (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि आदिती तटकरे (श्रीवर्धन) यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला.
काँग्रेसची 1 महिला आमदार निवडूण आल्या आहेत.
काँग्रेसच्या ज्योती गायकवाड (धवारी) या विरोधी पक्षातून एकमेव महिला आमदार यांनी गुलाल उधळला आहे