गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा वाल्मिक, त्यांनीच आणलेल्या कायद्यात पुरता फसला!
बीड येथील कोर्टाच्या आवारात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. खंडणी आणि खुनाच्या आरोपात पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या वाल्मिक कराडसाठी त्याच्या गावातही आंदोलन करण्यात आली. कोण मोबाईल टॉवरवर चढून वाल्मिक कराडला देव म्हणत होतं? तर काही महिलांनी कराडच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिलांच्या अचानक अंगात आलं. आधी फक्त एका महिलेच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर काही महिला घोषणा देत होत्या. मात्र आपल्या सोबतीला आलेल्या महिलेच्या अंगात आल्याचं पाहून तिच्याही अंगात आलं. सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मिक कराडच्या पांगरी गावात महिलांनी अक्षरश: थैमान घातले. या महिला आमच्या आण्णाला न्याय द्या असे म्हणत रस्त्यावरच झोपल्या तर काहींनी ड़ोकंच आपटून घेतलं. तर काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर परळी येथे अजूनही बंद पुकारण्यात आला आहे. तर हे सर्व घडलं ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असलेला आणि बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली . आता वाल्मीक कराड वर मकोकां कायदा लावला त्यामुळे त्याची आता सुटका लवकर होणार नाही यामुळे वाल्मीक कराडच्या समर्थनात परळीत त्याच्या समर्थकांनी गोंधळ केला. गोपीनाथ मुंडे यांना कधी वाटलेली नसेल की आपणच तयार केलेला कायदा मध्ये आपलाच घरगडी यामध्ये कधीतरी अडकेल.
चला तर पाहूया गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा वाल्मीक कराड गोपीनाथ मुंडे यांनी आणलेल्या मकोका कायद्यात कसा फसला?
संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. योगायोग म्हणजे वाल्मिक कराड याने गोपीनाथ मुंडे यांच्याकडेच घरकाम करून त्याच्या कारकिर्दीला सुरूवात केली. पण मोक्का हा कायदा लागू करत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या मनातही आले नसेल की आपल्याच जवळचा माणूस या कायद्याच्या कचाट्यात सापडेल .तर आपल्याच मालकाने केलेल्या कायद्याचा फास आपल्याभोवती आवळेल याची कल्पनाही वाल्मिक कराडने केली नसेल. बीड आणि तिथलं राजकारण ज्यांच्या नावाशिवाय सुरू होत नाही. असे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी कधीकाळी राज्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला. त्याच गोपीनाथ मुंडेंच्या बीडमधील गुन्हेगारीने बीडची तुलना बिहारसोबत होऊ लागली. गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा तयार झाला तो म्हणजेच ‘मकोका’ कायदा. मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष न्यायालयात चालतो. पण हा कायदा राज्यात आणण्याचे श्रेय गोपिनाथ मुंडेंना जाते. तर ते कसं जाणून घेऊ. 1992 आणि 93 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे राज्यात अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या. त्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलं होते. त्याचवेळी वाढलेल्या गुन्हेगारीविरोधात दिवंगत गोपिनाथ मुंडेंनी आवाज उठवला होता. 1995 साली शिवसेना भाजप युतीच्या सरकरामध्ये गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली होती. कारण 1990 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीवर वचक ठेवणारा टाडा हा कायदा रद्द केला होता. त्यामुळं राज्यात गुन्हेगारीवर वेळीच वचक ठेवण्यासाठी मुंडेंनी सर्वोच्च न्यायालयाने टाडा कायद्यावर जे आक्षेप घेतले होते. ते बाजूला ठेवत मोक्का हा नवा कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्र सरकारने या कायद्याला मंजुरी दिली. त्यानंतर राज्यात 24 फेब्रुवारी 1999 साली मोक्का कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. मकोका कायद्यात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड एकेकाळी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या परळीतल्या घरी कामाला होता. मात्र आपल्या मालकानं गृहमंत्री असताना राज्यातली संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणलेल्या मकोका कायद्यात एके दिवशी आपणच अडकू असा विचारही कधी वाल्मिक कराडनं केला नसेल. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींसोबत कराडचे कनेक्शन असल्याचा संशय आल्यामुळे कराडवर मकोका लावण्यात आलाय. विशेष म्हणजे या आरोपींसोबत वाल्मिक कराडचे सहा फोन कॉल्स झाल्याची माहिती पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. नेमके कुणासोबत आणि कसे वाल्मिकचे कॉल्स झाले ते पाहूयात.
पोलिसांच्या सूत्रांनुसार खुनातील आरोपी विष्णू चाटे आणि इतर आरोपींमध्ये सहा कॉल्स झाले आहेत. खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणाबाबत हे कॉल्स झाल्याचं सूत्रांचं म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स चाटेच्या माध्यमातून कराडसोबत झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे. या कॉल्समधून हत्येतील आरोपी आणि वाल्मीक कराडमध्ये संभाषण झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय. त्यामुळे हत्या प्रकरणात कराड दिवसेंदिवस पुरता अडकत चाललाय. ज्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरकाम करत वाल्मिक कराडने आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्याच मुडेंनी केलेल्या कायद्यात तो अडकला.. त्यामुळं राजकीय वर्तुळात मुंडेंच्या जवळचाच माणुस कायद्याच्या कचाट्यात सापडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर मंडळी गोपिनाथ मुंडे यांनी आणलेल्या मोकाका कायदा आणि वाल्मीक कराड याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून सांगा.