रेखा गुप्ता यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवण्याच्या मागची पाच कारणे
दिल्लीला पुढचा मुख्यमंत्री मिळाला आहे. पुन्हा एकदा दिल्लीची कमान एका महिलेकडे सोपवण्यात आली आहे. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी मार्लेना यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या चौथ्या महिला आहेत.
सुषमा स्वराज यांच्या रूपाने दिल्लीला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या. भाजपने त्यांना दिल्ली सरकारच्या शेवटच्या ५२ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनवले होते. आता तब्बल 27 वर्षानंतर भाजप पक्षाकडून रेखा गुप्ता ह्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत.
1993 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप 70 पैकी 49 जागा जिंकून बहुमताने सत्तेत आला होता.
त्यावेळी भाजप पक्षाला पाच वर्षात तीन मुख्यमंत्री द्यावे लागले होते. यामध्ये प्रथम मदनलाल खुराना यांना दोन वर्षासाठी मुख्यमंत्री बनवण्यात आले त्यानंतर साहिब सिंग वर्मा हे अडीच वर्ष होऊन जास्त मुख्यमंत्री म्हणून राहिले होते त्यानंतर शेवटी सुषमा स्वराज यांना 52 दिवसांसाठी मुख्यमंत्री हे पद देण्यात आले होते.
आता तब्बल 27 वर्षानंतर भाजप पक्षाकडून पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री होणार आहेत. त्या महिला म्हणजे रेखा गुप्ता.
परंतु रेखा गुप्ता यांचा इतिहास पाहिला तर त्या या अगोदर विधानसभेच्या दोन निवडणुका हरल्या आहेत आणि यावेळेस त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आहेत. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर डायरेक्ट त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे.
परंतु रेखा गुप्ता यांनाच भाजप पक्ष दिल्लीमध्ये मुख्यमंत्री का बनवत आहेत?
चला तर आपण याची 4 कारणे सविस्तर पाहूया.
मुद्दा क्रमांक १) कोण आहेत रेखा गुप्ता?
दिल्लीतील नवनिर्वाचित भाजपा आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 50 वर्षांच्या गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या. विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे.
रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात 1974 साली झाला. त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले. रेखा गुप्ता यांचे वडिल स्टेट बँकेत मॅनेजर होते. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे.
कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) संपर्क आला. त्या अभाविपच्या कामात सक्रीय होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
रेखा गुप्ता या दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार तदारसंघातून विजय मिळवला. रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला. या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना 68 हजार 200 मतं मिळाले. तर वंदना कुमारी यांना 38605 मतं मिळाली होती.
मुद्दा क्रमांक २) महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्या आरएसएस ची निवड आहे
आतापर्यंत दिल्लीत शीला दीक्षित, सुषमा स्वराज आणि आतिशी या तीन महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. रेखा यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. रेखा गुप्ता आरएसएसची निवड आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी, आरएसएसने त्यांचे नाव प्रस्तावित केले, जे भाजपने स्वीकारले. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांसारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता.
मुद्दा क्रमांक ३) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल हे वैश्य होते.
वैश्य हा समुदाय मोठ्या प्रमाणात व्यवसायात अग्रेसर आहे. त्यामुळेच दिल्लीत भाजपचे मुख्य मतदार हे वैश्य मानले जातात.
रेखा या देखील माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या वैश्य आहे. दिल्लीतील व्यवसायात वैश्य समुदायाचा मोठा वाटा आहे. हे नेहमीच भाजपचे मुख्य मतदार मानले जाते. याच कारणास्तव, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपच्या तीन नेत्यांची नावे होती. रेखा गुप्ता व्यतिरिक्त विजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र महाजन यांची नावे होती.
मुद्दा क्रमांक ४) महिला मतदार यांना भाजप पक्षाकडे आकर्षित करणे
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण ४८ जागा जिंकल्या, त्यांना एकूण ४५.५६% मते मिळाली. याचे एक प्रमुख कारण म्हणजे भाजपने महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या.
गरीब महिलांसाठी सिलेंडरवर ५०० रुपये अनुदान, होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
महिलांसाठी मोफत बस सेवा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे
मातृ सुरक्षा वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना २१ हजार रुपये आणि ६ पोषण किट देण्यात येणार आहे.
दरमहा २५०० रुपये आर्थिक मदत. जी ८ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू होऊ शकते.
दिल्लीतील घरगुती काम करणाऱ्यांच्या कल्याणासाठी एक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.
दिल्लीमध्ये महिलांसाठी अशा भरपूर योजनांची घोषणा करण्यात आली.
त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील महिला मतदारांसारख्याच दिल्लीतही महिला मतदारांची संख्या भाजपच्या बाजूने जास्त आकर्षित झाली.
आणि आता त्याच्यामध्ये महिला मुख्यमंत्री दिल्यानंतर भाजपकडे महिलांचे हे आकर्षण कायम राहणार आहे.
यामुळे भाजप पक्षाने तब्बल 27 वर्षानंतर पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद देण्यात येणार आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते दिल्ली येथे पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद का देण्यात येणार आहे हे आम्हाला कमेंट्स करून सांगा