BH Number plate बद्दल तुम्हाला माहित आहे का?
तुम्ही अनेक वाहनांवर BH नंबरची नेम प्लेट पाहिली असेल, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, ही नंबर प्लेट नेमकी कुणाला मिळते ? नोकरीनिमित्त सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतं.
यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या.
भारत सरकारने ही समस्या सोडवली आहे. त्यासाठी बीएच सीरीज नंबर प्लेट तयार करून घ्यावी लागेल. त्यामुळे राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही.
याशिवाय तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटवर MH, HR, UP, MP असं लिहिलेलं असतं. या नंबर्सचा अर्थ राज्याच्या नोंदणीनुसार असतो. आता वाहनांच्या प्लेटवर भारत सीरिजसाठी BH असं लिहिलं जाईल.
कारच्या BH सीरिज नंबर प्लेट ही नियमित नंबर प्लेटपेक्षा वेगळी असते, त्यामुळे तुम्हीही कार खरेदी करणार असाल आणि तुम्हाला BH नंबर प्लेट घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
कारच्या BH सीरिज नंबर प्लेटचा अर्थ काय? त्याचे फायदे, शुल्क, कागदपत्रं कोणती लागतात? यासाठी अर्ज कोण करू शकतो आणि अर्ज कसा करावा याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक १) बीएच नंबर प्लेट म्हणजे नक्की काय आहे?
बीएच नंबर प्लेटमध्ये एक अद्वितीय नोंदणी क्रमांक असतो, जो संपूर्ण भारतातील एका वैयक्तिक वाहनाला दिला जातो.
ही नंबर प्लेट अशा लोकांसाठी आहे, ज्यांना नोकरीनिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार प्रवास करावा लागतो.
या नंबर प्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाहन मालकाला एकाच नोंदणी क्रमांकाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी मिळते.
म्हणजेच, जर तुम्ही दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालात तर वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, यामुळे वाहनमालकांना मोठ्या त्रासापासून वाचवता येईल
याशिवाय, विम्याच्या दृष्टिकोनातून बीएच नंबर प्लेट असणेदेखील सोयीस्कर आहे, कारण कार विम्यावर याचा परिणाम होत नाह
भारत सीरिजमधील नंबर प्लेट्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या असतील.
यामध्ये पांढऱ्या रंगाचं बॅकग्राऊंड असेल आणि त्यावर काळ्या रंगात क्रमांक लिहिलेला असेल.
प्लेटवरील क्रमांक BH ने सुरू होईल आणि ज्या वर्षात नोंदणी झाली त्या वर्षाचे शेवटचे दोन अंक त्यात असतील.
वन नेशन वन नंबर’ अंतर्गत BH सीरिज नंबर असलेली वाहनं भारतात कुठेही चालवता येतात.
पहिला क्रमांक ’21 BH 0905A’ उत्तर प्रदेशात जारी करण्यात आला. ज्यामध्ये २१ म्हणजे २०२१ वर्ष, BH म्हणजे भारत वर्ष मालिका, ०९०५ म्हणजे वाहन क्रमांक, A म्हणजे A ते Z अल्फाबेट सीरिज आहे.
नवीन वाहन घेताना BH-SERIES नंबर प्लेटसाठी देखील अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला फॉर्म २० आणि फॉर्म ६० भरावा लागेल. तुम्ही खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर फॉर्मसोबत एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट, आयडी यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात
मुद्दा क्रमांक २) बीएच सिरीज नंबर प्लेट फायदे काय आहेत?
भारतात जेव्हा तुम्ही नवीन राज्यात किंवा शहरात जाता तेव्हा तुम्हाला अनेकदा नवीन ठिकाणी तुमचे वाहन पुन्हा नोंदणी करावे लागते, ही प्रक्रिया निश्चितच थोडी त्रासदायक असते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) काही वर्षांपूर्वी ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे.
भारत सीरिज नंबर प्लेट्स, ज्यांना BH नंबर प्लेट्स असेही म्हणतात. ही नंबर प्लेट २०२१ मध्ये लाँच करण्यात आली, ज्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त वारंवार एका राज्यांतून दुसऱ्या राज्यांत स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींसाठी वाहन नोंदणी सुलभ झाले. .
मुद्दा क्रमांक ३) बीएच सीरिज नंबर प्लेट्सची पात्रता काय आहे ?
भारत सीरिज (BH) नंबर प्लेटचे अनेक फायदे आहेत. ही नंबर प्लेट संपूर्ण देशभर वैध आहे.
म्हणजेच, बीएच सीरिज नंबर प्लेट असलेल्या वाहनमालकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, यामुळे वेळ आणि पैसा वाचतो. बीएच सीरिज नंबर प्लेटमुळे कागदपत्रांचा त्रास कमी होतो. जर एखादे वाहन चोरीला गेले किंवा अपघात झाला तर बीएच सीरिज नंबर प्लेटमुळे अधिकाऱ्यांना वाहनमालकाची ओळख पटवणे सोपे होते. बीएच सीरिज नंबर प्लेट असलेल्या वाहनमालकांना एकाच वेळी २४ महिन्यांचा रोड टॅक्स भरावा लागतो. जर तुम्ही दोन वर्षांनंतर कर भरण्यास विसरलात तर तुम्हाला दररोज १०० रुपये दंड भरावा लागेल.
मुद्दा क्रमांक ४) बीएच नंबर प्लेटसाठी कोण अर्ज करू शकतो?
१) केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांचे कर्मचारी, जसे की लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे कर्मचारी.
२) सार्वजनिक उपक्रम विभागाचे कर्मचारी किंवा संरक्षण कर्मचारी. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य.
३) किमान चार राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी.
मुद्दा क्रमांक ५) बीएच नंबर प्लेट साठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड
रहिवासी दाखला
वाहन मॉडेल नंबर
चेसिस नंबर
वर्किंग सर्टिफिकेट फॉर्म नंबर ६०
ही सर्व कागदपत्रे बीएस नंबर प्लेटसाठी लागतात
मुद्दा क्रमांक ६) बीएच सीरिज नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करावा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या https://morth.nic.in/en वेबसाइटवर जा
२) पोर्टलवर लॉग इन करा.
३) Vehicle Registration टॅबवर क्लिक करा.
४) तुमचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडा.
५) Apply For New Registration टॅबवर क्लिक करा.
६) ड्रॉपडाउन मेनूमधून Bharat Series निवडा.
७) तुमचे नाव, पत्ता, वाहन मॉडेल, चेसिस, इंजिन इत्यादी वाहन तपशील अपलोड करा.
८) ओळखपत्र आणि पत्ता पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
९) रजिस्ट्रेशन फी जमा करा.
१०) फी जमा केल्यानंतर एक कन्फर्मेशन स्लिप मिळेल, ज्यात युनिक अॅप्लिकेशन नंबर असेल.
११) अर्ज भरताना सीरिज प्रकारातील BH पर्याय निवडा.
१२) वर्किंग सर्टिफिकेट (फॉर्म ६०) किंवा अधिकृत आयडीची प्रत सादर करा.
१३) प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कडून BH सीरिजसाठी मंजुरी मिळवा.
१४) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वाहन पोर्टल भारतातील सर्व राज्यांमध्ये जारी केलेल्या रेंडम नंबरमध्ये BH सीरिज रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल.
तर मंडळी तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची बदली ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल तर तुम्ही नक्कीच बीएच नंबर प्लेट तुमच्या कार साठी बनवून घ्या .आ