HMPV वायरस कोरोना पेक्षा किती खतरनाक?
कोरोना विषाणूने चीनसह जगभरात प्रचंड गोंधळ निर्माण केला होता. अजूनही तो पूर्णपणे संपला नसताना आता आणखी एक विषाणू पसरू लागला आहे, ज्याचा सर्वाधिक उद्रेक चीनमध्येच दिसून येत आहेकरोना विषाणूच्या वेळेसही असेच सांगण्यात येत होत की कोरोना हा रोग एवढ्या गंभीर स्वरूपाचा नाही असं पहिल्या टप्प्यामध्ये सांगण्यात येत होतं.
परंतु याचं गांभीर्य लक्षात न घेता कोरोना हा भारतात देखील आला.
आणि त्यानंतर संपूर्ण जगात सगळीकडे लॉकडाऊन करण्याची वेळ आली होती.
कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सामान्य लोकांचे किती नुकसान झाले आहे हे सांगणे देखील कठीण आहे.
तसंच आता एचएमपीवी HMPV या रोगाने देखील चीनमध्ये आता थैमान घातल्याचं दिसत आहे.
चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत आहे.
त्यामुळे आता HMPV या व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.
चला तर पाहूया चीनमध्ये थैमान घातलेल्या HMPV व्हायरस म्हणजे काय आहे.
या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल?
चला तर जाणून घेऊया, एचएमपीव्ही म्हणजेच हुमन मेटाफिनो व्हायरस म्हणजे नक्की काय आहे. तो किती धोकादायक आहे.
त्याच्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो?
HMPV) हा RNA व्हायरस आहे जो प्नियमोविरिदे कुटुंबातील आहे. या विषाणूमुळे श्वसन संक्रमण होते ज्याची लक्षणे सहसा सर्दीसारखी असतात. हा रोग सामान्यतः सौम्य असतो, परंतु यामुळे न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा नवीन विषाणू नाही. याची ओळख २४ वर्षांपूर्वी २००१ मध्ये झाली होती. तथापि काही शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की हा विषाणू किमान १९५८ मध्येही पसरला होता. त्यानंतरही त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही किंवा त्यावर फारसे संशोधनही झाले नाही.
हा विषाणू देखील भीतीदायक आहे कारण ५ वर्षांपूर्वी, कोविडच्या सुरूवातीस अशीच प्रकरणे नोंदवली गेली होती आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगाला वेढले होते. सध्या चीनमध्ये लाखो लोकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली असून रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीही सातत्याने वाढत आहे.
चीनच्या उत्तरेकडील भागात HMPV (Human Metapneumovirus) विषाणू वेगाने पसरत आहे. अधिकाधिक लहान मुलं याला बळी पडत आहेत. भारतातही एचएमपीव्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. बंगळुरूमध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीला या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूने किती कहर केला आहे हे लक्षात येऊ शकते. इतके लोक या विषाणूला बळी पडले आहेत की रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी बेड्चा तुटवडा आहे.
चीन आरोग्य अधिकाऱ्यांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी काही प्रोटोकॉल लागू केले आहेत. मात्र, याबाबत कोणतीही आपातकालीन स्थिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
HMPV विषाणू खोकला आणि शिंकणे यातूनही पसरतो. याशिवाय हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही पसरू शकतो. त्याचा प्रभाव तीन ते पाच दिवस राहतो. हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो
खोकणे आणि शिंकणे याशिवाय, HMPV विषाणू संक्रमित व्यक्तीला हस्तांदोलन, मिठी मारणे यामुळे हा पसरतो. यासोबतच एखाद्या संक्रमित व्यक्तीने दरवाजाच्या हँडल, कीबोर्ड किंवा खेळण्यांना हात लावला तरही संसर्ग पसरू शकतो.
HMPV विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खोकला, ताप, सर्दी, घसा खवखवणे, अस्वस्थता आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसतात
लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना HMPV विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो.
खरंच हा HMPV व्हायरस किती धोकादायक आहे? खरंच यामुळं चिंतेची स्थिती आहे का? याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
HMPV व्हायरसच्या धोक्याबाबत माहिती देताना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी सांगतात की, “सध्याची परिस्थिती पाहता आणि या व्हायरसबाबत सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खरंतर घाबरण्याची गरज नाही. पण निश्चितच आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, हा व्हायरस नवीन नाही अनेक वर्षांपासून तो अस्तित्वात आहे.
 हिवाळात्यातल्या थंडीच्या दिवसात या व्हायरसच्या संसर्गाच्या केसेस पाहायला मिळतात. या व्हायरससाठी कुठलीही लस आपल्याकडं उपलब्ध नाही किंवा कुठंलही औषध नाही. पण जशी रुग्णांमध्ये लक्षण दिसतील त्यानुसार रुग्णांवर उपचार केले जातात. जर आपण व्यवस्थित सगळ्या प्रतिबंधात्मक गोष्टींचं आपण पालन केलं तर सात-आठ दिवसांत रुग्ण बरा होतो.
पण या व्हायरल संसर्गाचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त होऊ शकतं ज्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. ज्या लोकांची स्वतःची शक्ती कमी असते जसं की, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती. तसंच जे लोक कॅन्सरच्या आजारानं पीडित आहेत. त्याचबरोबर जे लोक अशी औषधं घेतात ज्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळं अशा प्रकारचे व्हायरल संसर्ग होत असतात.
चला तर जाणून घेऊया काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ?
यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA चे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी या नव्या विषाणूबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्हिडीओमध्ये HMPV विषाणूची लागण झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांचा उल्लेख केला आहे. ‘हा कोविडसारखाच असला तरी कोविडच्या गटातला नाही. त्याची तीव्रता कोविडपेक्षा कमी आहे. त्याचा मृत्यूदरही कमी आहे. करोना विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचा गट वेगळा आहे. न्यूमोव्हिरीडी नावाच्या गटातला हा विषाणू आहे. याची बाधा झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं अशी लक्षणं दिसतात. याची तीव्रता वाढत गेली, तर न्यूमोनिया होण्याचीही लक्षणं दिसून येतात. यातही ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. पण हा तितका धोकादायक नाही’, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे.
यापासून बचाव कसा करू शकतो?
 तुम्हाला जर सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर जाऊ नका. स्वतः ला आयसोलेट करुन घ्या, म्हणजे इतरांच्या संपर्कात येणार नाही अशा बंद खोलीत राहा. तसंच जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे जिथं खूप लोक एकत्र येणार आहेत. त्यामुळं जर आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तर आपलं तोंड मास्कनं झाकून घ्या. यामुळं हा व्हायरस इतरांपर्यंत पसरण्यापासून तुम्ही रोखू शकता. एकूणच जर आपण सतर्कता ठेवली तर या व्हायरसचा संसर्ग पसरण्यापासून, स्वतःला होण्यापासून आपण बचाव करु शकतो.
तसेच मास्क घालणं, गर्दीत न जाणं, इतरांपासून अंतर ठेवणं, साबण-पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करणे. हा करोनाइतका धोकादायक नसला, तरी आपण सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे’, असंही डॉ. अविनाश भोंडवे यांनी नमूद केलं आहे.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *