HSRP नंबर प्लेट नाही बसवली तर कारवाई होणार!

महाराष्ट्र मध्ये राज्य परिवहन विभागाने कार, दुचाकी, ट्रॅक्टर, तीन चाकी वाहन, चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितली आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्याची 31 मार्च ही महाराष्ट्र मध्ये शेवटची तारीख असणार आहे.
31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिला आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इतर राज्यांमध्ये कंपल्सरी केलेली आहे.
परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी नव्हती.
आता महाराष्ट्र मध्ये हाय रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी का करण्यात आली?
तसेच 31 मार्च पर्यंत प्लेट बसून न झाल्यास मुदतवाढ भेटणार का?
हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट चे बुकिंग कसे करावे तसेच कोणती कागदपत्रे लागतात?
हया सर्व प्रश्नांची माहिती  सविस्तर पाहणार आहोत
चला तर पाहूया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नक्की काय आहे आणि ती बसवणे का गरजेचे आहे.
तसेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्ही कोठे रजिस्टर करू शकता. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
हाय-सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही एक व्हीकल लायसेन्स प्लेट आहे. जी छेडछाड-प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे. HSRP प्लेट्समध्ये एक यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर, होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो. ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमसारख्या टिकाऊ मटेरियलपासून बनलेली आहे आणि त्यावर हॉट-स्टॅम्प केलेला अल्फा-न्यूमेरिक कोड आहे.
सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे. तो सहज काढता येत नाही.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP Registration) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतला गेला असून वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिला होता.
मात्र, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी बसविण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळे वाहनांनी आता ३० एप्रिल २०२५ पूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
HSRP प्लेटची वैशिष्ट्य काय आहे ते पाहू
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते.
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या नियम ५० नुसार, वाहनावर HSRP लावणे सक्तीचे आहे. या कायद्यांतर्गत एकूण ६ प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहे.
१ ) नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
२ ) ट्रान्सपोर्ट वाहने
३ ) भाडेतत्त्वावर असलेली वाहतूक वाहने
४ ) बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने
५ ) बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
६ ) बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने
नवीन वाहनांव्यतिरिक्त जुन्या वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे.
चला तर पाहूया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कशी बसवता येईल आणि तिचा खर्च किती येणार आहे.
राज्य परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांचे वेबसाईटच्या वेब पेजवर अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय-सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्यासाठी वाहन मालकांना 531 ते 879 रुपये मोजावे लागतील.
महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिली आहे. बुधवारपासून परिवहन विभागाची पेमेंट लिंक अॅक्टिव्ह झाली आहे. या किमतीत नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आणि जीएसटी देखील समाविष्ट आहे. HSRP लागू करण्यासाठी ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि स्कूटर यांसारख्या दुचाकींसाठी 531 रुपये, ऑटो-रिक्षासारख्या तीनचाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी 879 रुपये खर्च होतील.
नवीन दर काय असतील?
महाराष्ट्र परिवहन विभागाने आपल्या वेबसाइटवर विविध प्रकारच्या वाहनांसाठी HSRP दर देखील नमूद केले आहेत. त्यावरही 18 टक्के दराने जीएसटी लावला जाईल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी 200 मिमी बाय 100 मिमी आणि 285 मिमी बाय 45 मिमी आकाराच्या प्रत्येक एचएसआरपी प्लेटची किंमत 219.9 रुपये असेल. त्याच वेळी, चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी, 500 मिमी बाय 120 मिमी आणि 340 मिमी बाय 200 मिमी आकाराच्या प्लेटची किंमत 342.41 रुपये असेल.
GST वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अनुक्रमे 10.18 आणि 50 रुपये असेल. HSRP लादण्यासाठी GST वाटा दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 81 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी 90 रुपये आणि चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 134.10 रुपये असेल. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांनाही पुढील आणि मागील बाजूस HSRP लावले जाईल आणि त्यांच्या विंडशील्डवर नोंदणी चिन्हाचे स्टिकर लावले जाईल.
चला तर पाहूया कसे कराल HSRP नंबर प्लेट बुकिंग? (HSRP Registration)
तुम्हाला जर एच एस आर बी नंबर प्लेट बुकिंग करायचे असल्यास यासाठी तुम्ही निश्चित केलेल्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करू शकता. यासाठी https://mhhsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवून घ्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.तसेच ही वेबसाईट लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देखील मिळेल.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नंबर प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात:
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC)
पत्त्याचा पुरावा
ओळखीचा पुरावा
वाहनाच्या मेक आणि मॉडेलबद्दल तपशील
चेसिस नंबर
इंजिन नंबर
HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही खालील पद्धती वापरू शकता:
संबंधित राज्याच्या परिवहन विभागाच्या वेबसाइटला भेट द्या
महाराष्ट्रातील लोकांनी https://mhhsrp.com या वेबसाईटला भेट द्या.
‘बुक वर क्लिक करा.
त्यानंतर राज्य निवडा, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच गाडीचा नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर, मोबाईल नंबर,
त्यामध्ये भरून घ्या.
नंतर एक कॅपच्या येईल
तो नंबर टाका.
त्यानंतर क्लिकहेअर वर क्लिक करून पुढील प्रोसेस करा.
चला तर पाहूया यासाठी किती खर्च येईल? (HSRP Registration)
दुचाकी आणि ट्रॅक्टर करिता 450 रुपये यात जीएसटी वेगळी असेल
तीन चाकी साठी पाचशे रुपये यामध्ये जीएसटी वेगळी असेल
हलकी मोटर वाहने प्रवासीकार मध्यम व्यावसायिक वाहने अवजड व्यवसायिक वाहने आणि ट्रेलर याकरिता 745 रुपये आकारण्यात येतील आणि जीएसटी वेगळी असेल.


By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *