WMO ने पुण्यात राबवले महारक्तदान शिबिर
कै.मराठा प्रवीण पिसाळ यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी पुण्यामध्ये विविध भागात रक्तदान शिबीर आयोजित केले होते मार्गदर्शन कार्यवाहक निलेश पिसाळ सर, प्रबंधक देव मोरे सर, मनीषा वंजारे ताई त्याच्या मार्गदर्शन ने पुण्यात 7 ठिकाणी रक्तदान शिबीर घेतले होते. खुप छान प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिर हे शिवाजीनगर धायरी ,भोर, उरळीकांचन, वाघोली ,भोसरी, आकुर्डी, आपल्या मराठा बांधवांनी खूप जास्तीत जास्त छान असा प्रतिसाद दिला या मुळे भरपूर रक्त बॅग संकलन करण्यात आल्या.. या रक्त बॅग गरजू रुग्णांना दिल्या जातील, रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तविरांचे तसेच ज्ञात अज्ञात सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार.
रक्तदान शिबीर आयोजनासाठी WMO पुणे प्रमुख प्रबंधक धनंजय शेवाळे, अनिकेत जरे , शुभांगी नरवडे याच्याबरोबर ऍडमिन निलेश काळे, जितेंद्र चंदनशिव, चेतन गोळे, रवी जाधव, सतीश मिरकड, विजय साळेकर, सुभाष पालेकर, निलेश साळुंखे, प्रशांत वाडकर, विष्णु झांजळे, आकाश धनावले, विशाल मगर यांनी अतिशय उत्कृष्ट नियीजन करून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडला या कार्यात विशेष सहकार्य सुहास चव्हाण यांचे लाभले, तरी सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली.
सर्वात महत्वाचे म्हणजे भविष्यात कधीच कोणाला रक्त किंवा रक्तातील कोणताही घटक पुणे जिल्ह्यातील जॉब त्याही बांधवाला लागला तर ते 100% उपलब्ध करून दिले जाईल हा विश्वास WMO पुणे ऍडमिन परिवार यांनी दिला आहे या सोबतच असे बरेच समाज उपयोगी कार्यक्रम WMO माध्यमातून होतील जेणे करून समजाची सर्वांगीण प्रगती साधण्यास मदत होईल अशी ग्वाही वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या प्रतिनिधींनी दिली..