आज आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या विधानसभा मतदारसंघाबद्दल. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ क्रमांक २१६ आहे. अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. अकोले तालुका आणि २. संगमनेर तालुक्यातील घारगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. अकोले येथे किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. अकोले हा भाग काही प्रमाणात आदिवासी भागात येतो .
2019 मध्ये अकोले या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण निमाजी लहानटे यांना एक लाख 13 हजार 414 मते मिळाली होती तर यांच्या विरोधात असणारे भाजपचे वैभव पिक्चर यांना 55 हजार 725 एवढी मते मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे रहा असा आव्हान खुद्द शरद पवार यांनी केले आहे . तसेच या ठिकाणचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण लहामटे यांना खाली बसवा असं आव्हान केले आहे.
त्यामुळे आता अकोले या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांच्यामध्ये लढत होईल. तर अकोले करांना आवाहन करताना शरद पवार म्हणाले अमित भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला मी संधी दिली मला वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल. त्यांना काही झालं तरी शरद साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं पण मुंबईत गेल्यानंतर मात्र हा भल तिकडे जाऊन बसला कुठे बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवण्याची वेळ आली आहे. तसेच आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा तरुणांच्या ताकदीवर अकोला आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामूळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण पाहता व तसेच महाविकास आघाडी यांच्याकडे असलेले सहानभूतीचे वातावरण यामुळे अमित भांगरे यांना विद्यमान आमदार होण्याची संधी भेटू शकते. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अकोले या तालुक्यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहिला आवडेल हे या मला कमेंट करून सांगा.