अण्णा हजारे विरुद्ध अरविंद केजरीवाल दारू दुकान प्रकरण
दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पार पडल्या. तब्बल 27 वर्षानंतर दिल्ली येथे भाजप पक्षाने बाजी मारली.
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी ह्या पक्षाचा पराभव झाला. विशेष म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये चक्क अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री राहून देखील यांचा पराभव झाला.
अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला पाहून अण्णा हजारे यांनी काही माध्यमांना मुलाखती दिल्या एका मुलाखतीत तर अण्णा हजारे यांना चक्क अश्रू अनावर झाले.
त्या मुलाखतीत अण्णा हजारे यांनी सांगितले देखील की आमचे चांगले संबंध होते परंतु काही गोष्टींमुळे मला तुमच्या विरोधात बोलावं लागले मला तसे करायचे नव्हते परंतु मला तसं करायला तुम्ही भाग पाडले.
तर अण्णा हजारे यांनी निवडणुकीच्या एक-दोन दिवस आधीच अरविंद केजरीवाल् यांना मतदान करू नका असे दिल्लीकरांना आव्हान केले होते.
एकेकाळी केजरीवाल हे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना गुरु मानत होते.
तर एकेकाळी चांगले मित्र असणारे नंतर एकमेकांच्या विरोधात का बोलायला लागले? अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल त्यांची मैत्री कधी झाली होती? नंतर त्याच मैत्रीत फूट कशी पडत गेली?
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची बारा वर्षांपूर्वी असणारी मैत्री ही अशी तुटत का गेली?
त्यामुळे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात नक्की काय वाद आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक 1) अरविंद केजरीवाल यांचा इतिहास कसा आहे ?
अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणातील सिवानी जिल्ह्यातील खेडा या गावात झाला होता.
गोविंद राम आणि गीता देवी हे त्यांचे आई-वडील आहेत.
त्यांचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हिस्सार येथील कॅम्पस स्कूलमध्ये आणि नंतर सोनीपतमधील होली चाईल्ड शाळेत झाले.
ते 1985 मध्ये IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण झाले.
मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी IIT खडगपूर येथून पदवी घेतली.
1989 मध्ये केजरीवाल जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये रुजू झाले.
1992 मध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी त्यांनी टाटा स्टीलला रामराम ठोकला.
1995 मध्ये अरविंद केजरीवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले.
त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली.
त्यांनी आयकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिले.
त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
2002 मध्ये नोकरीत रुजू झाले.
त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी 18 महिने विना वेतन सुट्टीसाठी अर्ज केला.
ही सुट्टी मंजूर झाली. 2006 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीतील संयुक्त आयकर आयुक्त पदाचा राजीनामा दिला. 2011 मध्ये केजरीवाल यांनी नोकरीतील नियमानुसार त्यांच्याकडील थकीत 9 लाख 27 हजार 787 रुपये सरकार दरबारी जमा केले.
मुद्दा क्रमांक २) अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांच्या संपर्कात कसे आले?
2011 मध्ये अरविंद केजरीवाल हे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या संपर्कात आले.
2011 मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालू केले होते.
अण्णा हजारे यांनी हे आंदोलन दिल्लीत जाऊन केले होते.
या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात चांगला संपर्क निर्माण झाला.
त्यांनी लोकपाल कायद्यासाठी इंडिया अगेंस्ट करप्शन ग्रुपची (IAC) स्थापना केली.
16 ऑगस्टपासून ते दिल्लीत रामलीला मैदानात अण्णा हजारे यांच्यासह उपोषणाला बसले.
हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत चालले. त्यावेळी या आंदोलनात किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी महत्वाची भूमिका निभावली.
अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा अण्णा हजारे यांच्यानंतरचा मुख्य चेहरा ठरले.
मुद्दा क्रमांक ३) सर्व सुरळीत चालू असताना अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील संबंध का बिघडले?
काही काळ सरकारी नोकरीत असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी 2011 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या संपर्कात आले.
ते दिल्लीत रामलीला मैदानात अण्णा हजारे यांच्यासह उपोषणाला बसले.
या आंदोलन काळात अण्णा हजारे यांना अरविंद केजरीवाल यांनी चांगली साथ दिली होती.
उपोषणावेळीअण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत काय बोलायचे याचे नियोजन देखील तेच करत होते.
तसेच पत्रकार परिषदेवेळी अण्णाच्या कानात देखील एकदा मुद्दा मांडून त्यावर सल्ला मसलत करीत होते.
त्यामुळे त्याकाळी दिल्लीत गाजलेलया अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात केजरीवाल यांची वेगळीच ओळख निर्माण झाली होती.
त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील एक वेगळी छाप पडली होती.
त्याकाळी दिल्लीत झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा अरविंद केजरीवाल यांनी चांगल्या पद्धतीने करून घेतला.
त्यांनी भ्रष्टचार विरोधातील लढा दिल्लीत त्यानंतर ही सुरूच ठेवला. त्यामध्ये खंड पडू दिला नाही. त्यातूनच अरविंद केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 रोजी राजकीय पक्ष गठित केला. 24 नोव्हेंबर 2012 ला आम आदमी पक्ष (AAP) असे त्याचे नामाकरणही केले.
यावरुन पहिल्यांदा अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये खटके उडू लागले.
कारण अण्णा हजारे यांचा पक्ष स्थापनेला विरोध होता.
मात्र, केजरीवाल यांनी अण्णाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत काम सुरूच ठेवले.
कारण अण्णा हजारे यांना वाटत होतं की आपले आंदोलन हे भ्रष्टाचारी विरोधात आहे. यासाठी आपल्याला कोणताही पक्ष काढायची गरज नाही.
परंतू केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
केजरीवाल यांनी त्यानंतर पार पडलेल्या 2013 मधील दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली.
त्याला देखील अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला होता.
त्यावेळी अण्णा हजारे यांनी आपले नाव आणि फोटो वापरण्यावर केजरीवाल यांना बंदी घातली होती.
त्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाने अभुतपूर्व विजय मिळवला होता.
या नवख्या पक्षाने चांगलीच कमाल केली होती. त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा देखील पराभव केला.
त्यावेळी अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी असे बोलले गेले की काँग्रेसनेच त्यांना बाहेरुन पाठिंबा दिल्याने केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले .
त्यानंतर दोन वर्षातच काँग्रेसने सरकारचा पाठींबा काढून घेतला. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत केजरीवाल आम आदमी पक्षाने सर्वाधिक 67 जागा जिंकल्या.
त्यानंतर 2020 मध्ये भाजपने त्यांना पराभूत करण्यासाठी चांगली ताकत लावली.
पण आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत 70 मधील 62 जागांवर विजय मिळवला. 16 फेब्रुवारी 2020 रोजी, ज्या रामलीला मैदानावर त्यांनी कधीकाळी उपोषण केले होते. त्याच मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तोपर्यंत सर्व व्यवस्थित चालू होते.
परंतु अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मद्य धोरण खुले केल्याने अण्णा हजारे यांनी या मद्य धोरणास स्पष्टपणे विरोध केला होता.
मुळात अण्णा हजारे हे गांधीवादी विचारांचे होते.
नवी दिल्लीत त्यांचा शिष्य केजरीवाल हे दारूचे दुकाने वाटतात, हे समजताच त्यांचा संताप अनावर झाला.
अण्णा हजारे यांनी याबाबत केजरीवाल यांना चार पत्रे पाठवली होती.
त्यांनी या मद्य धोरणास उघडपणे विरोध केला होता. मात्र, त्याकाळी केजरीवाल यांनी अण्णांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले. या पत्राचे उत्तर सुद्धा त्यांनी दिले नव्हते. त्यामुळे पूर्वीपासून बिघडलेल्या संबंधात आणखी भर पडली.
मुख्यमंत्री केजरीवाल त्यानंतर चार कोटी रुपये किंमतीच्या बंगल्यामध्ये राहायला जाताच अण्णा हजारे यांनी परत एकदा पत्र पाठवून निषेध केला होता.
मात्र, त्याकडे ही त्यांनी दुर्लक्ष केले होते.
त्यानंतर नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी प्रथम अटक झाली .
त्यावेळी देखील अण्णा हजारे यांनी पुन्हा केजरीवाल यांच्याशी पत्रव्यवहार करून मद्य धोरण रद्द करा, असे मागणी केली. परंतु आपच्या मंत्र्यांवर या मद्य परवाना धारकांचा प्रचंड दबाव असल्याने मद्य धोरण पुढे तसेच सुरू राहिले.
दरम्यान, अण्णा हजारे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांच्या पत्राला दाद देत नसल्याचे लक्षात येताच नवी दिल्लीच्या राज्यपालांनाही पत्र पाठवून लक्ष वेधले.
हे मद्य धोरण म्हणजे मद्य घोटाळा आहे. हे गेले पाच ते सहा महिन्यांपासून सुरू होते.
नवी दिल्लीतील मद्य व्यापाऱ्यांना परवाने देताना काही बंधनही राहिले नव्हते. विशेष म्हणजे या मद्य धोरणांची बंधनही राहिले नव्हते. विशेष म्हणजे या मद्य धोरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने देखील केली होती.
या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांच्याविरुद्ध नऊ वेळा समन्स बजावले.
आपचा जन्मच मुळी भ्रष्टाचार विरोधासाठी झाला होता. एखाद्या शासकीय यंत्रणेने दोन वेळा समन्स बजावून हजर न होणे. यामुळे साहजिकच दिल्लीतील जनतेची केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली.
त्यातच केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अटक करूनही केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता.
त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सातत्याने त्यांच्यावर टीका केली होती.
‘मी त्यांना असे धोरण बनवू नये असे सांगितले होते. आमचे काम अबकारी धोरण बनवणे नाही. यातून त्यांना जास्त पैसे कमावतील असे वाटत होते म्हणून त्यांनी हे धोरण बनवले.
मला वाईट वाटले, त्यामुळे मी दोनदा पत्रे लिहिली.
एकेकाळी माझ्यासोबत काम करून दारूविरोधात आवाज उठवणारा केजरीवाल यांच्यासारखा माणूस अबकारी धोरण बनवत आहे याचे मला वाईट वाटले.
दारू वाईट आहे हे अगदी लहान मुलालाही माहीत असते. त्यांच्या कर्माचे हे फळ आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली होती.
त्या काळातच लोकशाही मानणाऱ्या अण्णा हजारे यांनी स्पष्ट भूमिका घेतली.
७२ तासांच्या पुढे सामान्य माणूस पुढे जेलमध्ये असेल तर त्याचे पद अधिकार काढून घेतले जातात.
परंतु येथे तर केजरीवाल हे तुरुंगातून दिल्लीचा कारभार पाहत होते. त्यामुळे केजरीवाल व अण्णा हजारे यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत गेली.
त्याचा फटका केजरीवाल यांना बसला आहे. दुसरीकडे केंद्रात भाजपचे सरकार राज्यात आपचे सरकार यामध्ये तणाव भरपूर होता. त्याचा फटका केजरीवाल यांना बसलाआहे . त्यामुळे आता त्यांना दिल्लीतील सत्ता सोडावी लागली आहे.
तर मंडळी या सर्व कारणांमुळे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात वाद निर्माण झाला.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले निर्णय बरोबर होते का? हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.