Site icon

अहमदनगर जिल्हा विधानसभा निवडणूक मतदार संघ निहाय लेखाजोखा 2024


नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि आता केंद्रीय मंत्री ठरवण्यात आले आहेत त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आहे.
त्यानंतर आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभेचे.
आता प्रत्येक पक्ष विधानसभेच्या तयारीला लागला आहे.
विधानसभा ह्या साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये पार पडतील
लोकसभा निकालानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे विधानसभेकडे .
तसे पाहिले तर विधानसभेसाठी आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी प्रत्येक पक्ष आपल्या जागांसाठी दावा करू लागला आहे.
चला तर पाहू अहमदनगर जिल्ह्यामध्ये विधानसभा बाबतीत काय चर्चा चालू आहे.
अहमदनगर मध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि अहमदनगर मध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे .
त्यामुळे महायुती विधानसभेसाठी जातीने लक्ष घालणार आहे. तसेच महायुतीच्या उमेदवारांना आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.
चला तर पाहूया अहमदनगर येथील बारावी विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांची यादी .
नेवासा येथे सध्याचे विद्यमान आमदार शंकराव गडाख हे आहेत.
शंकरराव गडाख यांच्या विरोधात महायुती कडून विठ्ठलराव आणि बाळासाहेब मुरकुटे हे लढण्यासाठी उत्सुक आहेत.
आता या दोघांपैकी महायुती कोणाला उमेदवारी देते हे महत्त्वाचं ठरणार आहे.
राहुरी येथे प्राजक्त तनपुरे हे सध्याचे विद्यमान आमदार आहे .
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्ता तनपुरे विरुद्ध शिवाजी कर्डिले अशी निवडणूक पार पडली होती तर इथे शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता मात्र या वेळेसही राहुरी या मतदारसंघातून पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजी कर्डिले अशी लढत पाहायला भेटेल.
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून उमेदवार म्हणून असतील तर भाजपकडून शिवाजी कर्डिले यांचे नाव समोर येत आहे.
शेवगाव – पाथर्डी या जागेसाठी चंद्रशेखर घुले, प्रतापराव ढाकणे, हर्षदा ताई काकडे हे लोक या जागेसाठी इच्छुक आहेत.
 तर येथे विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे या गेल्या दोन निवडणुकांपासून या जागेवर विजयी होत आहेत.
विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष राजळे यांना तिसऱ्यांदा या जागेवरून उमेदवारी देणार अशी शक्यता आहे.
नगर शहर इथून विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवार आहेत.
त्यामुळे अजित पवार जर महायुतीत राहिले तर आमदार संग्राम भैया जगताप यांना महायुतीकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे किरण काळे, शिवसेना ठाकरे गटाचे भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड अशी काही नावे या जागेसाठी चर्चेत आली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर हे उत्सुक आहे तर आता महाविकास आघाडी मधून इथे नक्की कोणाला उमेदवारी भेटणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रीगोंदा येथे महायुतीचे बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत.
परंतु आता इथे विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले, अनुराधा नागवडे, साजन पाचपुते महायुतीकडून इच्छुक असल्याचे बोलले जाते तर महाविकास आघाडी कडून राहूल जगताप, घनश्याम शेलार, यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी भेटते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .तर महायुतीकडून आता शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी भेटणार की पुन्हा एकदा बबनराव पाचपुते हेच उभे राहणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहूया सर्वात चर्चेचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कर्जत जामखेड.
2019 पूर्वी कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघावर ती महायुतीकडून राम शिंदे यांचे वर्चस्व होते.
परंतु 2019 मध्ये कर्जत जामखेड या विधानसभा मतदार संघामध्ये राम शिंदे यांना टक्कर देण्यासाठी रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उभे होते.
2019 मध्ये कर्जत जामखेड ही जागा रोहित पवार यांनी मिळवली.
त्यानंतर आता पुन्हा एकदा 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार आणि महायुतीकडून राम शिंदे यांची लढत पाहायला भेटू शकते.
परंतु रोहित पवार आता पुणे येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघ येथून लढण्यास उत्सुक असल्याचं बोलले जात आहे .त्यामुळे रोहित पवार नक्की अहमदनगर येथील कर्जत जामखेड की पुणे येथील खडकवासला या दोन्हीपैकी कुठून निवडणूक लढवणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. जर रोहित पवार यांनी खडकवासला येथून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर कर्जत जामखेड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून नवीन चेहरा कोण असणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक राहणार आहेत.
शिर्डी येथे भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील हे विद्यमान आमदार आहे.
तर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपकडून असतील का असा प्रश्न निर्माण होत आहे कारण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव दक्षिण नगर मधून उभे होते आणि त्यांचा चांगलाच पराभव पाहायला भेटला आहे .
तर महाविकास आघाडी कडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटणार हे महत्त्वाचे ठरणार आहे कारण राधाकृष्ण विखे पाटील यांना कोण टशन देऊ शकतो या शोधात सध्या महाविकास आघाडी आहे. त्यामुळे यावेळेस शिर्डी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत राहणार आहे.
संगमनेर येथे बाळासाहेब थोरात हे विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब थोरात हे काँग्रेस या पक्षाचे उमेदवार आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणूक ही चांगलीच गाजवली आहे कारण महाविकास आघाडीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यामुळे संगमनेर येथे महाविकास आघाडी कडून बाळासाहेब थोरात हे फिक्स उमेदवार असणार आहेत तर महायुतीकडून आता त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी भेटणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
तसेच संगमनेर येथे सुजय विखे हे देखील भाजप पक्षाकडून इच्छुक आहेत.
त्यामुळे इथे चुरचीशी लढत पहायला भेटेल.
अकोले येथे किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.
अकोले हा भाग काही प्रमाणात आदिवासी भागात येतो
यावेळेसही अकोले येथे महाविकास आघाडी मधून किरण लाहमटे यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता आहे तर महा इती कडून इथे कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पारनेर येथे सध्या दक्षिण नगर येथून निवडून आलेले निलेश लंके हे आमदार होते परंतु लोकसभे निवडणुकीसाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार होते .परंतु निलेश लंके यांची निवड आता खासदार पदी झाली आहे आणि त्यांनी महायुतीकडून लढणाऱ्या सुजय विखे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे सध्या निलेश लंके हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. त्यामुळे निलेश लंके यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी भेटणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव सध्या चर्चेत आहे. जर राणी लंके यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी भेटली तर महायुतीकडून लंके यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी भेटणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रीरामपूर येथे विद्यमान आमदार लहू कानडे हे आहेत. लहू कानडे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे महाविकास आघाडी कडून पुन्हा एकदा लहू कानडे यांनाच उमेदवारी भेटेल अशी चर्चा आहे. तर महायुती कडून इथे कोणाला उमेदवारी भेटेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
कोपरगाव येथे आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे इथे महायुतीकडून पुन्हा एकदा आशुतोष काळे यांची वर्णी लागेल. त्यामुळे 2019 मध्ये स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांची लढत होती. परंतु ह्या वेळेस महायुतीकडून आशुतोष काळे यांना तिकीट मिळाल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांची तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्नेहलता कोल्हे हा काय निर्णय घेतील हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर महाविकास आघाडी कडून कोणाला तिकीट मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर हे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ.
 ज्याप्रमाणे आपल्याला लोकसभा निवडणूक गाजताना दिसले त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक ही गाजताना दिसणार आहे कारण 2024 मध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस असे एकत्र लढणार आहे तर महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत होणार आहे त्यामुळे जागावाटपावरूनही यांच्यामध्ये जागेसाठी चुरस लागलेली पाहायला भेटणार आहे .

Exit mobile version