विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.
भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा पाचपुते, माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
कोणत्या उमेदवाराला कोणत्या विधानसभा मतदारसंघातून संधी भेटली आहे.
अहिल्यानगर येथील सर्वात चर्चेचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कर्जत-जामखेड
कर्जत-जामखेडमधून आमदारराम शिंदे यांना उमेदवारी भेटली आहे.
भाजप नेते माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना देखील पहिल्या यादीत स्थान मिळालं आहे. त्यांना कर्जत-जामखेडमधून उमेदवारी जाहीर झाली. 2019 मध्ये त्यांचा रोहित पवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख आहे.
शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत भाजप नेते महसूल तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यांचा राहाता तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघ आहे. राधाकृष्ण विखे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता ते पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला समोरे जाणार आहे. मंत्री विखे भाजपमधील प्रमुख नेते असल्याने त्यांच्यावर राज्यातील काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत.
काँग्रेसने मतदार संघावर दावा कायम ठेवला असल्याने, मंत्री विखेंविरोधात काँग्रेस कोणता चेहरा देईल, याकडे आता लक्ष लागलं आहे. दरम्यान, मंत्री विखेंना भाजपकडून विरोध होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असलेले भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी मंत्री विखेंच्या उमेदवारीला विरोध केला होता.
राहुरी-नगरमधून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी भेटली आहे.
नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना भाजपने राहुरी-नगर विधानसभा मतदार संघातून पुन्हा संधी मिळाली. 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. शिवाजी कर्डिले यांना या पराभवाचा वचपा घ्यायचा आहे. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांनी चांगलीच जोरदार तयारी केली आहे.
शेवगाव-पाथर्डीमधून आमदार मोनिका राजळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा संधी मिळाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या त्या विश्वासू आहेत. आमदार राजळे यांना पक्षांतंर्गत मोठा विरोध आहे. पक्षातील विरोधकांवर मात करत त्या पुन्हा विजयाला गवसणी कशी घालतात, याची उत्सुकता राहणार आहे.
श्रीगोंदा येथून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ज्येष्ठ नेते भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. श्रीगोंदा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदारकीला समोरे जाणार आहे. बबनराव पाचपुते वयोमानानं थकल्यानं आणि आजारपणामुळं भाजपने त्यांच्याच पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली. पाचपुते यांचा या मतदार संघावर चांगली पकड आहे. प्रतिभा पाचपुते या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. त्यांना राजकीय अनुभव आता आमदारकी लढवताना उपयोग ठरेल.