एसटी महामंडळ भाडेवाढ कशी असणार?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे आता महाग झाले आहे. कारण, एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे.
यामुळे एस.टी.चा प्रवास किमान दोन रुपयांनी वाढला आहे.
या भाडेवाढीमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे.
सोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून, या दोन्ही वाहनांच्या दरात 3 रुपयांची वाढ होणार आहे.
रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून अंमलात येणार आहे.
या भाडेवाढीमुळे साध्या बसचे एका टप्प्यासाठीचे दर ८.७० वरून १०.०५ रुपयांवर, एसीचे दर २२ वरून २५.३५ रुपयांवर पोहोचले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून नागरिकांवर विविध सवलतींची खैरात झाली होती.
परंतु नवे सरकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचे चटके बसू लागले आहेत.
चला तर पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांनी भाडेवाडीचा निर्णय का घेतला आहे?
हा निर्णय घेतल्यामुळे आता एसटी महामंडळाला कोणता फायदा होणार आहे?
तसेच महिलांसाठी हाफ टिकीट योजना चालू राहणार आहे का?
चला तर मुद्द्याचं बोलू.
मुद्दा क्रमांक १) एसटी महामंडळ यांनी भाडेवाडीचा निर्णय का घेतला?
महामंडळाने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये भाडेवाढ केली होती.
सध्या एसटीला प्रति किलोमीटर 3.41 याप्रमाणे महिन्याला अंदाजे दोन कोटींचा तोटा होत आहे.
त्याबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्ट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल, डिझेल तसेच ‘सीएनजी’च्या दरात झालेली वाढ, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी एस.टी.ची 15 जून 2018 रोजी 18 टक्के, तर 26 ऑक्टोबर 2021 रोजी 17.17 टक्के भाडेवाढ झाली होती.
एसटी कडून सध्या सहा किलोमीटर अंतराच्या एका टप्प्यानुसार भाड्या करणे केली जाते.
तर अपघाती विम्याच्या हप्त्याची रक्कम आदीप्रमाणेच पहिल्या टप्प्याच्या भाड्यामध्ये आकारले जाणार आहे ही रक्कम एक रुपया असेल.
मुद्दा क्रमांक २) एसटी महामंडळाला कोणता फायदा होणार आहे?
सध्या एस.टी.ला दिवसाला 28 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
भाडेवाढीनंतर त्यात 4 कोटी रुपयांची वाढ होईल, असा अंदाज आहे. म्हणजेच दिवसाला 32 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होईल.
मुद्दा क्रमांक ३) सर्वात जास्त भुईदंड हा कोणाला पडणार आहे?
सामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार आहे.
एस.टी.ने दररोज सुमारे 55 लाख प्रवासी प्रवास करतात.
त्यात महिला प्रवाशांची संख्या 20 लाख आहे.
महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
तसेच, पाच लाख ज्येष्ठ नागरिक आणि 9 लाख 50 हजार शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवासात 100 टक्के सवलत आहे. म्हणजेच, दररोज सुमारे 15 लाख प्रवासी मोफत प्रवास करतात.
सोबतच, 20 लाख महिला अर्ध्या तिकिटात प्रवास करतात.
यामुळे 20 लाख प्रवाशांना या भाडेवाढीचा भुर्दंड पडणार आहे. हे 20 लाख प्रवासी पुरुष प्रवासी आहेत.
मुद्दा क्रमांक ४) महिलांना महिलांना हाफ तिकीट असणार की नाही ?
एस टी महामंडळाने भाडे वाढीचा निर्णय घेतला आहे परंतु महिलांसाठी एकनाथ शिंदे सरकारने हाफ तिकीट देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला होता.
तो निर्णय तसाच राहणार आहे.
महिलांना अजूनही हाफ तिकीटाच असणार आहे. त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही.
मुद्दा क्रमांक ५) रिक्षा आणि एसटी यांची जुने भाडे कसे होते आणि आता नवीन किती झाले आहे?
एसटीमधून प्रवास करता प्रति टप्पा 6 किमीसाठी भाडं आकारलं जातं. साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे, ते आता 11 रुपये असेल.
जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचंही भाडं सारखंच असेल.
निम आरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील.
शिवशाही (एसी) बसंच भाडं 12.35 वरुन 16 रुपये झालं आहे.
तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे.
तसंच शिवनेरीचं (एसी) भाडं 18.50 ऐवजी 23 रुपये असणार आहे .
तर शिवनेरी स्लिपरचं भाडं 28 रुपये असणार आहे.
रिक्षाचे पहिले भाडे हे 23 रुपये होते ते आता 26 रुपये झाले आहे.
साधी टॅक्सीचे पहिले भाडे हे 28 रुपये होते ते आता 31 रुपये झाले आहे.
कूल कॅब चे पहिले भाडे हे 40 रुपये होते आता ते 48 रुपये झाले आहे.
तर मंडळी अशी ही एसटी महामंडळ रिक्षा साधी टॅक्सी आणि कुलकॅब यांच्या भाड्यामध्ये वाढ झालेली आहे.
तर मंडळी एसटी मंडळाने जो निर्णय घेतला आहे भाडेवाडीचा तो योग्य आहे का हे आम्हाला कमेंट्स करून कळवा

