Site icon

काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण?


काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण?
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. खूपच कमी जागांवरती काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्यासाठी तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी घेतला होता. तसेच भरपूर जण नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा असे बोलत होते.
त्यामुळे काँग्रेस पक्षातील तरुण चेहरा म्हणून सतीश पाटील यांचे नाव चर्चेत होते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी ते उत्सुक होते परंतु नाना पटोले या पदावर कायम राहिले होते.  परंतु विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांचा राजीनामा घ्या असा जोर धरू लागल्यामुळे सतेज पाटील यांना विचारण्यात आले परंतु त्यांना आता प्रदेशाध्यक्ष होण्यात रस नाही.  त्यामुळे सतेज पाटील यांच्या नकारानंतर आमदार अमित देशमुख यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विचारणा करण्यात आली होती मात्र त्यांनीही प्रदेशाध्यक्षपद इतक्यात नको अशी भूमिका घेतली. अमित देशमुख आणि सतीश पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या इच्छुक नसल्याचं पक्षश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविले.
त्यामुळे आता ओबीसी चेहरा हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करावा असा विचार चालू आहे. तर आता काँग्रेस पक्षाकडून कोण नवीन प्रदेशाध्यक्ष होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण हवा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version