केज विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Kaij Assembly election


भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर केज येथून त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर केली.  त्यामुळे नमिता मुंदडा 2019 मध्ये विजयी झाल्या.  या निवडणुकीत मुंदडा यांना 1 लाख 23 हजार 433 तर पृथ्वीराज साठे यांना 90 हजार 524 इतके मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा 32,909 मतांनी पराभव केला. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यां केज विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होत्या. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना एक लाख 23 हजार 158 मत मिळाली होती तर पंकजा मुंडे यांना एक लाख 9360 मते मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग आप्पा सोनवणे यांना जवळपास 14 हजारांची आघाडी भेटली होती. त्यामुळे आता सध्या तरी येथे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या बाजूने वातावरण असल्याचं दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर पृथ्वीराज साठे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे त्यांनी केज मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे  आता काम सुरू केले आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी येथील निवडणूक लढणार असल्याचं पृथ्वीराज साठे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये महाविकास आघाडी कडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून पृथ्वीराज साठे यांना तिकीट भेटण्याची जास्त चान्सेस आहेत. तर महायुतीमध्ये असणाऱ्या भाजप पक्षाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनीही निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. 2019 मध्ये पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली होती परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत काही झालं तरी मी लढवणार आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची देखील भेट घेतलेली आहे.
तर महायुतीमधील भाजप पक्षाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यादेखील केज या विधानसभा मतदारसंघासाठी सध्या तयारी करत आहेत. त्यामुळे आता भाजप पेचात पडला आहे की नक्की तिकीट कोणाला द्यायचं. यावेळी नमिता मुंदडा यांना तिकीट दिलं तर संगीता ठोंबरे ह्या नाराज होऊन पक्षांतर करू शकतात. याचा फटका भाजप पक्षाला केज येथे बसू शकतो. त्यामुळे आता भाजप नक्की कोणाला तिकीट देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एकंदरीत वातावरण पाहता असेच दिसत आहे की भाजप नमिता मुंदडा यांना तिकीट जाहीर करू शकतात परंतु संगीता ठोंबरे यांच्या नावाची मागणी ही केज येथील भाजप पक्षाचे पदाधिकारी आणि मतदार करत आहेत. केज येथील विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर  केज विधानसभा मतदारसंघांमध्ये अंबाजोगाई आणि केज या दोन मोठ्या शहरांचा समावेश होतो, तुलनेने मोठ्या असलेल्या अंबाजोगाई शहरातले प्रश्न मात्र मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.
मांजरा धरण हे केज या मतदारसंघात आहे .परंतु मांजर धरणाचे पाणी लातूर शहराला पाणीपुरवठा करते. केज तालुक्यातील धनेगाव मध्ये असलेला मांजरा धरणाच्या पाण्याचा सगळ्यात जास्त फायदा हा लातूर जिल्ह्याला होतो. तर या धरणामध्ये ज्यांची जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही काही सुटलेले दिसत नाही. तसेच तेथील जवळील गावांना मात्र पाण्यासाठी कायमच मोठा संघर्ष करावा लागतो. अशा अनेक मागण्या केज या विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असताना दिसतात.  केज विधानसभा मतदारसंघांमध्ये वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असतं त्यानंतर मराठा समाज त्या खालोखाल मुस्लिम समाज ओबीसी यांचे एकगठ्ठा मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  एकंदरीत केज या विधानसभा मतदारसंघांमध्ये येणारी आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी विरुद्ध भाजप अशी अत्यंत चुरशीची लढत होताना दिसणार आहे. तसेच नमिता मुंदडा ऐवजी संगीता ठोंबरे यांना येथे भाजपकडून तिकीट मिळाले तर येथील निवडणूक ही आणखी रंगतदार होताना दिसणार आहे. तर मंडळी असा आहे केज या विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं केज या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Leave a Comment