खेड आळंदी हा तालुका पुणे नाशिक हायवेवर वसलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी गणेशाची देवी निमगाव दावडीचा खंडोबा अशी तीर्थक्षेत्र येथे आहेत. आळंदी हेदेवस्थान तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. आळंदी येथे देशभरातून भाविक येत असतात. खेड आळंदी येथे भुईकोट भोरगिरी आणि देव तोडणे किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ 2009 ला नव्याने अस्तित्वात आला. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ सध्या खूपच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी भेटणार का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत येथे होणार का? शरद पवार गट खेड आळंदी येथे कोणता नवीन चेहरा रिंगणात उतरवणार? चला तर पाहूया खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की चाललंय काय?
आज आपण पाहणार आहोत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ येथे राजकीय वातावरण सध्या कसे आहे? खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघ क्रमांक 197 आहे. खेड आळंदी मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा समावेश होतो. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर दिलीप मोहिते पाटील यांनी अजित दादा पवार यांना साथ दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते 96,866 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे सुरेश नामदेव गोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 33,242 मते. एवढी होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे गोरे सुरेश नामदेव 1,03,207 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 32,718 मते. एवढी होती. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.
2014 मध्ये खेड आळंदी मतदारसंघांमध्ये बदलाचे वारे फिरले आणि दिलीप राव मोहिते पाटील यांचा पराभव होऊन शिवसेनेचे सुरेश गोरे हे निवडून आले. परंतु 2014 नंतर खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघांमध्ये बरीचशी उलथा पालट झालेली पाहायला भेटली. त्यामध्ये केंद्रात आणि राज्यात भाजप सेना सत्तेत आल्यानंतर या मतदारसंघात भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची बांधणी भाजपाने केली आणि दोन नगरपरिषद, दोन जिल्हा परिषद गटात एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. तर पुढील काळात माजी पालकमंत्री गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात भरघोस विकास कामे भाजपाने राबविली. त्यात शिवसेनेचे आमदार गोरे कमी पडताना दिसत होते. त्यातच मराठा आंदोलनाची ठिनगी पडली ओबीसी नेतृत्वातुन आमदार गोरे खेडचा गड राखत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण राजगुरुनगर येथील मराठा आंदोलन झालेल्या हिंसक आंदोलनाचे सूत्रधार करत कारवाईला सुरु झाली होती. त्यातच आमदार गोरे यांचा एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या सर्व गोष्टींचा फायदा दिलीपराव मोहिते पाटील यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला.
परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला येथील वातावरण आणखीच वेगळं पाहायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर दिलीप मोहिते पाटील यांनी अजितदादा पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे शरद पवारांनी यांनी ठरवलं आहे की बंड केलेल्या आमदारांना पाडायचे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेड आळंदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढाव पाटील यांना पाहिजे तेवढे लीड मिळालेले नाही. लोकसभा निवडणूक मध्ये अमोल कोल्हे हे येथून आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे साहजिकच असंच दिसत आहे की दिलीप मोहिते पाटील यांचे आमदारकी आता धोक्यात आली आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी अजित दादा यांना साथ दिली खरी परंतु आता दिलीप मोहिते पाटील आणि सुरेश गोरे हे महायुतीत असल्यामुळे एकत्र आले आहेत त्यामुळे ते महायुतीची ताकद वाढली आहे. पण आता विधानसभेला तिकीट कोणाला भेटणार हा मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे.
तर महाविकास आघाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे चांगला चेहरा नसल्याचे अनिकेत देशमुख यांचे लक्षात आले. तसेच यावर्षीही महायुतीकडून अनिकेत देशमुख यांना तिकीट भेटणार नाही हेही लक्षात आले
त्यामुळे भाजप पक्षाचे अतुल देशमुख यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येणारे आगामी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध अतुल देशमुख अशी होईल अशा चर्चा रंगल्या आहेत. सध्याचे वातावरण पाहता शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीचे वारे आहे . राष्ट्रवादी पक्षाचा जुना मुस्लिम आणि दलित मतदार हे शरद पवारांच्या बाजूने आहे. हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला दिसून आले आहे. त्यामुळे अतुल देशमुख यांची वाट सोपी वाटत वाटत आहे तर दिलीपराव मोहिते पाटील यांना ही निवडणूक जड जाणार आहे असे दिसत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी अतुल देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवून त्यांची ताकद दाखवून दिली होती. मतदारसंघातील ग्रामपंचायत सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सर्व पातळ्यांवर राजकीय खेळी अतुल देशमुख हे करत असतात. तसेच अतुल देशमुख यांचा खेड आळंदी येथे जनसंपर्क तगडा आहे. हे सर्व पाहता असेच दिसत आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल देशमुख यांना गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे. परंतु भाजपकडून शरद बुट्टे पाटील अक्षय जाधव तर ठाकरे गटाकडून बाबाजी काळे हे इच्छुक आहेत. या मतदारसंघातील विकास कामांबद्दल बोलायचे झाले तर मतदारसंघात चाकण चौकातील ट्राफिक, सांडपाणी आणि शहरी विकास काम हे प्रश्न सतावत आहेत
या मतदारसंघात उभी राहिलेली उद्योगनगरी आणइ वाढतं शहरीकरण यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्या आहेत. तर खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत आपल्याला येथे पाहायला भेटेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अतुल देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून दिलीप मोहिते पाटील अशी अतितटीची लढत येथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मंडळी खेळ आळंदी येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटते.
हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.