Site icon

गेवराई विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Gevrai Beed Assmbly Election


गोदावरी नदीच्या काठावर वसलेला मतदारसंघ तो म्हणजे गेवराई. गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्यामध्ये मोडतो. बीड जिल्हा म्हटलं की आता आठवतं ते म्हणजे आंतरवाली सराटी. आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण या प्रश्नाची ठिणगी पेटली. अंतरवाली सराटी हे गाव गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रभाव गेवराई मतदार संघावरती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवरती जरांगे फॅक्टर दिसून येणार का? भाजप पक्षाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना हॅट्रिक साधता येणार का? गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार? चला तर पाहूया गेवराई या विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की चाललंय काय?
गेवराई विधानसभा मतदारसंघ क्रमांक २२८ आहे. गेवराई मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. गेवराई तालुका, २. माजलगांव तालुक्यातील तालखेड महसूल मंडळ, ३. बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि पेंडगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण पवार विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा पराभव केला होता. पवार यांना 99 हजार 625 मते मिळाली होती तर पंडित यांना 92 हजार 833 मते मिळाली. यामध्ये सहा हजार 792 मताने पवार विजयी झाले होते. 1962 पासून ते आज पर्यंत तब्बल 62 वर्ष पवार आणि पंडित या घराण्याची सत्ता गेवराई या विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे.  फक्त 1972 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरा सोळंके यांना पवार आणि पंडित या घराण्यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध लढवण्याची एक संधी दिली होती.  त्यानंतर गेवराई येथील सत्ता फक्त पंडित आणि पवार या घराण्यांकडेच राहिलेली आहे.
 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पंडित घराण्यातील चुलते पुतणे एकत्र आले होते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित यांना तिकीट मिळाले होते तर अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादीतच असल्यामुळे त्यांना त्यांचे चुलते बदामराव पंडित यांचा प्रचार करावा लागला होता. बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. 2014 च्या विधानसभा निवडणूक मध्ये दोन्ही पंडित एकत्र येऊन त्यांनी ताकद लावली परंतु बाजी मारली ती भाजप पक्षाचे लक्ष्मण पवार यांनी. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती असल्यामुळे येथील जागा भाजप पक्षाचे उमेदवार लक्ष्मण पवार यांना सुटली त्यामुळे शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमरसिंह पंडित हे निवडणुकीला उभे होते. त्यामुळे 2019 मध्ये येथे तिहेरी लढत पाहायला मिळाली. परंतु पुन्हा एकदा 2019 मध्ये बाजी मारली ती भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार यांनी.
मागच्या काही वर्षांमध्ये पवार कुटुंबातील तीन पिढ्यात तीनदा आमदारकीही पवार घराण्याकडे आलेली आहे. यामध्ये सर्वात अगोदर शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती.  2014 ला देखील लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली आणि 2019 मध्ये सुद्धा हीच परंपरा लक्ष्मण पवार यांनी चालू ठेवली. आता तीच परंपरा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणामध्ये बराच बदल झालेला दिसत आहे. बीड जिल्हा असो किंवा गेवराई तालुका असो येथे राजकारणामध्ये बरीच मोठी उलथापालत होण्याचे कारण आहे ते म्हणजे मराठा आंदोलन.
कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्याने पंकजाताई मुंडे यांना नाकारत महाविकास आघाडीचे उमेदवार बाप्पा सोनवणे यांना मोठे लीड दिले आहे.  गेवराई या विधानसभा मतदारसंघांमधून देखील बप्पा सोनवणे यांना चांगले मिळाले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांची आमदारकी धोक्यात आले आहे का असा प्रश्न सर्वांना पडत आहे. तसेच आता येणारे आगामी विधानसभा निवडणूक लक्ष्मण पवार लढवणार का हा ही प्रश्न सर्वांना पडत आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार यांनी पंकजाताई मुंडे यांना पाहिजे तसे लीड मिळून देता आलेले नाही.  त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्तेही लक्ष्मण पवार यांच्यावरती नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
तसेच लक्ष्मण पवार हे आजारी असल्याकारणाने ते ही निवडणूक लढवणार नाही अशा देखील चर्चा चालू आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर अजितदादा पवार यांना साथ देणारे अमरसिंह पंडित यांना पुन्हा एकदा महायुतीकडून इथे तिकीट भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडी कडून येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे इच्छुक असल्याचे बोलले जाते. बदामराव पंडित यांनी गेवराई येथे 1995 1999 आणि 2009 या तीन वेळा येथे नेतृत्व केलेले आहे. परंतु या अगोदर गेवराई या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्षाने कधीही निवडणूक लढवलेली नाही. आणि बदामराव पंडित हे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत त्यामुळे आता गेवराई येथे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट यांना जागा भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघ येथे 2004 नंतर शिवाजीराव पंडित यांच्या घरात गुलाल उधळलेला दिसत नाहीये.
त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव पंडित यांची पुत्र अमरसिंह पंडित हे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता येणारे आगामी विधानसभा ही तरी आपण जिंकावी असं त्यांना वाटत आहे त्यामुळे त्या दृष्टीने ते तसे प्रयत्नही करताना दिसत आहेत. साखर कारखाना विविध शैक्षणिक संस्था स्थानिक सहकारी सोसायटी बाजार समिती यावर अमरसिंह पंडित यांचा प्रभाव आहे. ही सर्व घराणे गेवराई विधानसभा मतदारसंघांमधून ऍक्टिव्ह मोड मध्ये असतानाच येथे मात्र आता नवीन नावाची चर्चा चालू झाले आहे ते नाव आहे पूजा मोरे. पूजा मोरे यांची पार्श्वभूमी कशी तयार झाली हे पाहू.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची महाजनादेश यात्रा अडवून देवेंद्र फडवणीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार पूजाताई यांनी केला होता. पूजा मोरे ह्या शरद पवार पक्षांच्या किसान आघाडीच्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. शेतकरी प्रश्नांवर त्यांनी मोठमोठी आंदोलने केलेली आहेत. पूजा मोरे ह्या 21 व्या वर्षी गेवराई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. पूजा मोरे ह्या कायम  शेतकऱ्यांसाठी काम करत असतात. शेतकरी कामगार ऊस तोडी कामगार यांना कोणती अडचण आली तर त्या त्यांच्या कामासाठी कायम हजर असतात. त्यामुळे आता गेवराई या विधानसभा मतदारसंघांमधून महिला उमेदवार म्हणून पूजा मोरे या नावाची चर्चा चांगलीच होताना दिसत आहे. पूजा मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून तिकीट भेटेल अशा चर्चा देखील रंगले आहे. त्यासाठी गेवराई हा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनाही जागा मिळाली पाहिजे. तसेच खूप वर्षांपासून येथे फक्त पंडित आणि पवार या घराण्याचं राजकारण असल्यामुळे गेवराई येथील मतदारही नवीन चेहरा शोधत आहेत. त्यामुळे गेवराईतून जर पूजा मोरे यांना उमेदवारी भेटली तर महाविकास आघाडी कडून पूजा मोरे ह्या उमेदवार असतील. तसेच गेवराई येथे जे काही मराठा आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये हे पूजा मोरे ह्या मोठ्या प्रमाणात सक्रिय होत्या. त्यामुळे त्यांचा विचार शरद पवार नक्कीच करतील अशा देखील चर्चा आहेत. तसेच मनात जरांगे यांचा देखील पाठिंबा पूजा मोरे यांना भेटू शकतो. त्यामुळे पूजा मोरे यांचे पारडे गेवराई मध्ये जड राहणार आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघ विकासाबद्दल बोलायचे झाले तर  रेल्वे,  पाणी प्रश्न, एमआयडीसी असा कोणताही औद्योगिक सपोर्ट नाहीये. तसेच गेवराई येथे ऊसतोड मजुरांचा आकडा हा वाढतच चालला आहे त्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात येथे सतावत आहे.
गेवराई मतदारसंघात ओबीसी फॅक्टरचा देखील जोरात परिणाम होईल. या मतदारसंघातील निवडणूक विकासकामावर न होता ती जातीवर होईल, असेच इथले वातावरण आहे. तर मंडळी गेवराई या विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदरीतच पूजा मोरे, विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित, लक्ष्मण पवार यांच्या पत्नी गीता पवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेवराई येथे आगमी विधानसभा निवडणुक ही भाजप किवा  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी होईल .तर मंडळी गेवराई येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.
मराठा आरक्षण प्रश्नाची ठिणगी जिथे पेटली ते आंतरवाली सराटी गाव गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या GEVRAI ASSEMBLY ELECTION सीमेवर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव गेवराई मतदारसंघावर आहे. लोकसभेत खा.बजरंग सोनवणे यांना बीड पाठोपाठ सर्वाधिक लीड देणारा गेवराई मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर 1962 पासून ते आजपर्यत म्हणजेच तब्बल 62 वर्ष आलटून पालटून पवार आणि पंडित घराण्याची सत्ता आहे. त्यापुर्वी फक्त एकदा म्हणजे 1972 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांना पवार आणि पंडितांनी पुढाकार घेऊन गेवराई विधानसभेवर बिनविरोध पाठवले होते. म्हणजेच गेवराईत पवार आणि पंडित घराण्याबाहेर कधी सत्ता गेलीच नाही, अशी एकंदरीत इथली स्थिती आहे. परंतु यावेळी पवार आणि पंडित दोन्ही प्रस्थापित घराणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने हादरून गेली आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्नाची प्रस्थिापितांना प्रचंड डोकेदुखी झालेली आहे. या आंदोलनाने लोकांचा मुडही पूर्णतः बदललेला दिसत आहे. प्रस्थापित घराण्यावर सामान्य जनतेचा रोष असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे यंदा सामान्य मतदार प्रस्थापितांना झटका देणार की पुन्हा एक चान्स देणार याबद्दल गेवराईत प्रचंड चर्चा सुरू आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव करत आमदारकीच्या चाव्या पंडित कुटुंबाकडून पवार कुटुंबाकडे शिफ्ट केल्या… इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पंडित चुलते-पुतणे एकत्र आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित हे उमेदवार होते आणि अमरसिंह पंडित हेही राष्ट्रवादीमध्ये असल्या कारणाने त्यांनी चुलते बदमराव पंडितांचा प्रचार केला. खरंतर गेवराईच्या इतिहासामध्ये बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित हे कडवे विरोधक म्हणून ओळखले जायचे. मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही पंडित एकत्र आले तरीही भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा तब्बल 60 हजार मतांनी पराभव केला होता… मागच्या पन्नास वर्षात पवार कुटुंबातील तीन पिढ्यात तीनदा आमदारकी आली. यात सर्वात आधी शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली. त्यानंतरच्या काळामध्ये माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव केला होता आणि 2014 ला लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडितांचा पराभव करत परंपरा कायम ठेवली..
लोकसभेला प्रस्थापित Pankaja Munde यांचा धुव्वा, गेवराईचा निकाल असा लागेल। Georai Vidhan Sabha
मात्र 2019 ला राजकारण आणखीन अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचलं…अमरसिंह पंडित राष्ट्रवादीकडून तर युतीत ही जागा भाजपचे स्टॅंडिंग आमदार लक्ष्मण पवार यांना सुटल्याने शिवसेनेच्या बदामराव पंडितांनी अपक्ष मैदानात उतरत गेवराईची निवडणूक इंटरेस्टिंग ठरवली… पण शेवट सरशी मारली ती भाजपच्या लक्ष्मण पवारांनीच… सध्या बदामराव ठाकरे गटात आहेत तर विजयसिंह पंडित यांनी अजितदादांना साथ दिलीय… त्यामुळे इथे आपसूकच शिवसेना ठाकरे गटविरुद्ध भाजप, बदामराव पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार अशी लढत होणार अस दिसत असताना विजयसिंह पंडितांकडे बंड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही… पण या सगळ्यात पवार आणि पंडित यांची नावं बाजूला सारून एका नव्या नावाची चर्चा मतदारसंघात होतेय, आणि ते नाव म्हणजे पूजा मोरे…
गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित BADAMRAO PANDIT हे इच्छुक आहेत. 2019 मध्ये बदामराव पंडित तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. 1995, 1999 आणि 2009 साली त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेवराईची जागा कधीच ठाकरेंच्या शिवसेनेने लढवलेली नाही. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीत शरद पवार गटाचा दावा आहे. मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या पुजाताई मोरे यांनी या जागेवर आपला दावा ठोकला आहे. पुजाताई मोरे या शरद पवार पक्षाच्या किसान आघाडीच्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. शेतकरी प्रश्नावर त्यांनी मोठ मोठी आंदोलने केली होती. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दबदबा राज्यात होता. अशावेळी पुजाताई मोरे यांनी फडणवीसांची महाजनादेश यात्रा अडवून फडणवीसांविरोधात राज्यभरात वातावरण तयार केले होते
पुजाताई मोरे यांच्यारूपानेपहिल्यांदाच महिला उमेदवार रिंगणातपुजाताई मोरे POOJA MORE ह्या बीड जिल्ह्याच्या राजकारणातील अगदीच कमी वयाच्या राजकारणी आहेत. 21 व्या वर्षी त्या गेवराई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या. गेवराई विधानसभेत पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून पुजाताई मोरे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. त्यामुळे महिला वर्गाची पसंती पुजाताईंना मिळू शकते. अत्यंत सामान्य घरातील या तरुणीने दुचाकी असो की एसटी बस गेली सात वर्ष गेवराईचा ग्रामीण भाग पिंजून काढलेला आहे. कोणी सोबत आले तर ठिक नाहीतर एकटीने अख्खा मतदारसंघ पायदळी घातलेला आहे. विशेष म्हणजे गेली 62 वर्ष हा मतदारसंघ पवार-पंडितांच्या दहशतीखाली आहे. ही दहशत झुगारून पुजाताई मोरे गावोगाव जावून लोकांना बोलतं करीत आहेत. गेवराईच्या कुठलाही कोपर्‍यात जा त्यांनी आपली छाप तिथे सोडलेली आहे. इतकच नाहीतर राज्य पातळीवर देखील त्यांनी विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले होते. ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने या भागात आहेत. त्यामुळे राज्यातील विविध कारखान्यांकडे येथील शेतकर्‍यांची ऊसाची बीले थकित असतात. पुजाताई मोरे अशा शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सदैव हजर असतात. मुळ चळवळीचा त्यांचा पिंड असल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठलाही बडेजावपणा नसतो. अगदी सहजपणे त्या सामान्य माणसांमध्ये मिसळून जातात. अंगभूत धाडसीपणा, वर्क्तृत्व, शिक्षण ही सगळी त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यै आहे. त्यामुळे गेवराईत त्यांच्या बाजुने मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे. विशेष म्हणजे त्या स्वतः मुळच्याच कुणबी मराठा आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झालेल्या पहिल्या मराठा क्रांती मोर्चापासून त्या मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या सोबतही त्या काम करताना दिसतात. गेवराईमध्ये पवार आणि पंडित या प्रस्थापित घराण्याबाहेरील सामान्य चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाकडून अनेकजण जायंट किलर म्हणून समोर आले. अगदी त्याच पध्दतीची संधी पुजाताई मोरे यांच्याकडे आहे. लोक प्रस्थापित घराबाहेरील नवा चेहरा शोधतायत. आणि नेमका तोच नवा चेहरा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. मनोज जरांगे पाटलांनी प्रस्थापितांना पाडा असा ईशारा केला तरी पुजाताई मोरे अलगद विधानसभेवर जातील. स्वतः कुणबी मराठा असल्याने गेवराईत अनेक ओबीसी देखील त्यांच्या सोबतीला आहेत.
 मराठा आरक्षणाचा जोर वाढला की ओबीसी आरक्षण बचावचे कार्यकर्तेही दंड थोपटून मैदानात उतरत आहेत. विशेष म्हणजे महायुती, महाविकास आघाडी आणि मनोज जरांगे पाटील या तिन्हीकडच्या इच्छुकांमध्ये मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे ओबीसीकडून एकाच उमेदवाराचा विचार झाला तर ओबीसी फॅक्टरचा बोलबाला राहील.
आ. लक्ष्मण पवार यांनी 2014 आणि 2019 असा सलग दोनवेळा विजय मिळवलेला आहे. यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. लोकसभा निवडणुकीतही लक्ष्मण पवार LAXMAN PAWAR हे पंकजाताई मुंडे PANKAJA MUNDE यांच्या प्रचारात फारसे सक्रीय दिसले नाहीत. त्यामुळे पंकजाताई मुंडेंचे कार्यकर्ते लक्ष्मण पवारांना सहकार्य करण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. गेवराईत अशाही चर्चा आहेत की यावेळी आ. लक्ष्मण पवार ब्रेक घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या जागी बाळराजे पवार यांच्या पत्नी गिताभाभी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लक्ष्मण पवार यांनी मतदारसंघात रस्त्याची दर्जेदार कामे केली ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु मराठा आरक्षणाचा रोष भाजपा पक्षावर जसा आहे त्याचप्रमाणे आ.लक्ष्मण पवार यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. तो रोष टाळण्यासाठी देखील गीताभाभींना पुढे केले जाण्याची शक्यता आहे.
गेवराई विधानसभेत 2004 नंतर शिवाजीराव पंडित SHIVAJIRAO PANDIT यांच्या घरात विजयाचा गुलाल पडलेला नाही. 2019 मध्ये विजयसिंह पंडित यांचा अवघ्या 6792 मताने आ. लक्ष्मण पवार यांनी पराभव केलेला होता. त्यामुळे यंदातरी आपल्या पदरात विजयी गुलाल पडावा, यासाठी विजयराजे पंडित झपाटून कामाला लागलेले आहेत. साखर कारखाना, विविध शैक्षणिक संस्था, स्थानिक सहकारी सोसायट्या, बाजार समिती यावर विजयसिंह पंडित गटाचा प्रभाव आहे. परंतु माजलगाव तालुक्याचा भाग असलेला परंतु गेवराई विधानसभेत असलेला टाकरवण आणि तालखेड जिल्हा परिषद गट तसेच बीड तालुक्याचा भाग असलेला परंतु गेवराई विधानसभेत असलेला पिंपळनेर आणि बहीरवाडी असे चार जिल्हा परिषद गट त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. कारण या चारही जिल्हा परिषद गटावर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. जरांगे पाटील विजयसिंह पंडितांच्या बाजुने जमवून घेतील ही शक्यता अगदीच दुर्मिळ आहे. परंतु विजयसिंह पंडित यांच्याकडे त्यांच्या हक्काचा 30 हजार मतांचा गठ्ठा आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. आर्थिक बाजू भक्कम आहे. तरूण तडफदार आहेत. वर्क्तृत्वशैलीही जोरदार आहे. अभ्यासू आहेत. त्यामुळे यंदाच्या प्रमुख लढतीमध्ये विजयराजे असतील.
भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
 बीडमध्ये लोकसभेला जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला… जिल्ह्यातील प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारखा सर्वसामान्य विस्थापित घरातला चेहरा खासदार झाला… या सगळ्यात मोठा वाटा हा मराठा आरक्षणाचा होतच, पण त्याहून जास्त होता तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा… भाजपच्या ताब्यात असलेल्या या गेवराईने बजरंग बाप्पांच्या बाजूने तब्बल 40 हजारांहून अधिकचं लीड दिलं… हा आकडा दाखवून देतोय की भाजपचे विद्यमान आमदार असणाऱ्या या मतदारसंघात यंदा शरद पवारांची तुतारी वाजणार हे कन्फर्म आहे… पण ही तुतारी पवार – पंडित या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांकडून न वाजवली जाता एका सर्वसामान्य शेतकरी मुलीकडून वाजवली जाण्याची शक्यता आहे… गेवराईत सध्या चर्चेत आलेली ही तरुणी आहे तरी कोण? पंडित आणि पवार याच राजकीय कुटुंबांनी वर्चस्व गाजवलेल्या गेवराईत निवडून येणं या नव्या चेहऱ्यासाठी शक्य आहे का? त्याचाच घेतलेला आढावा…
बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, लक्ष्मण पवार…. तीच तीच नाव गेवराई विधानसभा मतदारसंघात लढत देतात.. निवडून येतात… इतिहासात मागच्या चाळीस वर्षात गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचे वर्चस्व राहिलं…
पंडित आणि पवार या दोन राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाचा राजकारणाला आता गेवराईची जनताही कंटाळलेली दिसतेय… म्हणूनच लोकसभेला प्रस्थापित मुंडेंना डावलून गेवराईनं बजरंग बाप्पांच्या पारड्यात निर्णायक लीड टाकलं… अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा म्हणावा असा प्रतिष्ठित चेहरा मतदार संघात नसताना हा गॅप भरून काढत पूजा मोरे यांनी बजरंग बाप्पांचं अगदी जीव तोडून काम केलं… तसं शिवसेना आणि भाजप अशीच कायम गेवराईची आमदारकीची लढत राहिल्याने यंदा मात्र बजरंग बाप्पांना इथून लीड मिळाल्याने तुतारीकडून पूजा मोरे यांचं नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत येतय… मराठा क्रांती मोर्चात केलेलं आक्रमक भाषण, फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणे ते पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण तडफदार चेहरा म्हणून पूजा मोरे यांचं नाव समोर आलं.. मात्र विधानसभेच्या आधीच शरद पवार गटात प्रवेश करत राष्ट्रवादीच्या किसान आघाडीच्या त्या प्रमुख आहेत… लोकसभेच्या निमित्ताने बजरंग बाप्पांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांनी गेवराई मतदार संघात काम केलं… इतकच काय तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातही त्या सर्वात जास्त फ्रंटला आहेत… त्यामुळे गेवराईची जागा मविआमध्ये शरद पवार गटाला सुटली तर पूजा मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो…
रेल्वे, दुष्काळाच्या झळा, पाणीप्रश्न, एमआयडीसी आणि कोणताही औद्योगिक सपोर्ट नसणं, राक्षस भुवन – त्वरीता देवी यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा रखडलेल्या विकास आणि ऊसतोड मजुरांचा वाढलेला आकडा हे सगळे प्रश्न गेवराईसाठी भुषावह नक्कीच नाहीत… त्यामुळे गेवराईची जनता मतदारसंघासाठी नव्या चेहऱ्याचा विचार करू पाहतेय… त्यासाठीच शरद पवार गटाकडून पूजा मोरे यांच्या सोबतच अनेक तरुण राजकारणांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत… त्यामुळे पहिल्यांदाच पवार आणि पंडित हे दोन चेहरे वगळता मतदार संघाला तरुण तडफदार आमदार मिळण्याची यंदा संधी आहे… पण तिकीट वाटपाच्या खेळात जो प्रस्थापितांना डावलून तिकीट आपल्याकडे खेचून आणणार, तोच जिंकणार… असं सध्या गेवराईचं राजकीय वातावरण आहे…
त्यामुळे लोकसभेला मायनस मध्ये गेलेले लीड, रखडलेली विकास कामे आणि बेरोजगार हात या सगळ्यांचा विचार करता गेवराईची जनता जो उमेदवार खिशाला दाम – हाताला काम देईल, त्यालाच आपण निवडून देऊ, असा राजकीय स्टॅन्ड घेण्याच्या विचारात आहे… सध्या तरी महायुतीकडून भाजपचे स्टॅंडिंग आमदार लक्ष्मण पवार यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब होऊ शकतो… लोकसभेच्या निकालातून त्यांची आमदारकी धोक्यात दिसत असली तरी ‘ज्याचा आमदार त्याला सीट’ असा फॉर्म्युला ठरला तर पवार निश्चिंत होऊ शकतात… अजितदादा युतीत कायम राहिले, तर इथून अमरसिंह पंडितांना बंड करण्या वाचून पर्याय उरणार नाही… अर्थात यामुळे होणाऱ्या मत विभाजनाचा फायदा हा मविआला होऊ शकतो, असा अंदाज सध्या तरी बांधता येईल…
बाकी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट बदामराव पंडितांसाठी ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू शकते… त्यातही शरद पवारांनी मेरिटच्या बेसिसवर ही जागा आपल्याकडे वळवून इथून तरुण उमेदवाराला संधी दिली, तर कदाचित गेवराई विधानसभेला सर्वसामान्य कुटुंबातला नवा कोरा चेहरा आमदारकीच्या खुर्चीवर पाहायला मिळू शकतो… फक्त हे सगळं घडून येण्यासाठी ठाकरे गटानं ही जागा शरद पवारांसाठी सोडणं ही अट आहेच! म्हणूनच गोदावरी नदीच्या काठावरील गेवराईत यंदा आमदार कोण होतोय? लक्ष्मण पवार, अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, बदामराव पंडित, पूजा मोरे की आणखी कुणी? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? गेवराईचा पुढचा आमदार कोण? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

Exit mobile version