गोंदिया जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


गोंदिया’ शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग  व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलताना दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ असून या ठिकाणी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक ह्या अत्यंत चुरशीच्या पाहायला भेटणार आहेत.
आज आपण पाहणार आहोत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया , मोरगाव अर्जुनी,  तिरोडा  देवरी या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. गेल्या दोन वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या पक्ष फुटीचा परिणाम गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे आता इथे महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रफुल्ल पटेल हे करत आहेत.
चला तर पाहुयात सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे गोंदिया
गोंदिया  हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६५ आहे. गोंदिया मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. गोंदिया तालुक्यातील कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया ही महसूल मंडळे आणि गोंदिया न.पा. क्षेत्राचा समावेश होतो. गोंदिया हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार विनोद संतोष अग्रवाल हे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गोंदिया विधानसभेसाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला.  या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 मते मिळाली होती.  तर भाजपचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मते मिळाली होती. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल हे मोठे नाव होते.  2004 पासून ते गोंदियाचे आमदार होते.1975 ते 1985 ते भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते.  1985 ते 1992 अग्रवाल भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.  2004 पासून ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. मात्र 1 ऑक्टोबर 2019 रोजी गोपालदास यांनी भाजपात प्रवेश केला आणि येथील राजकारणात वेगळेच वारे वाहू लागले. परंतु या वेळेस आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया विधानसभेसाठी येथे इच्छुकांची गर्दी वाढू लागले आहे
भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पंकज रहांगडाले जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय ठोंबरे तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेले गोपालदास अग्रवाल इच्छुक आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार रमेश कुथे पंकज जाधव हे इच्छुक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन केतन तुरकर यांच्या नावाच्या चर्चा आहेत तर काँग्रेस कडून राजकुमार पटले अमर वराडे राजू ठक्करलेले हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.  परंतु आता दोन वर्षांपूर्वीच्या पक्ष फुटी नंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे गोंदिया येथील जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  तसेच गोंदिया येथील विद्यमान आमदार हे अपक्ष असल्यामुळे त्यांच्या विरोधात नक्की कोणता नवीन चेहरा उभा करायचा असाही प्रश्न महाविकास आघाडी आणि महायुतीला पडलेला आहे. त्यामुळे गोंदिया येथे आता कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोंदिया येथून महायुतीच्या उमेदवाराला खूपच कमी मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे आता महायुती उमेदवारासाठी गोंदिया येथील निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाहीये.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघ
आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघ :
आमगांव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६६ आहे. आमगांव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. देवरी, २. सालेकसा आणि ३. आमगांव या तालुक्यांचा समावेश होतो. आमगांव हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहसराम मारोती कोरोटे हे आमगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमगाव-देवरी मतदारसंघातून काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा ८ हजार मताने पराभव केला होता. या निवडणुकीत आमदार कोरोटे यांना 88 हजार 265 इतकी मत मिळाली होती.  तर भाजपचे संजय पुराम यांना 80 हजार 845 मते मिळाली होती. मागील वर्षी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सहसराम कोरोटे यांनी आमगावःदेवरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते, पूल, दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षणासाठी मिळणार्या विद्यावेतनात वाढ, आमगाव नगरपरिषदेची निवडणूक, आदिवासींना वनहक्क कायद्याचा लाभ, पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेत मतदानाचा अधिकार आणि भत्त्यात आदि विविध विषयांवर प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून सहसlराम करोटे यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे  परंतु काँग्रेसमध्येच गडचिरोलीची मूर्ती खासदार नामदेव किरसाण यांचे चिरंजीव दुष्यंत कीर्तन यांच्या नावाचे देखील चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे तसेच महाविकास आघाडी मध्ये अजूनही भरपूर लोक इच्छुक आहेत . तर भाजपकडून माजी आमदार संजय पुराम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया येथून नामदेव किर्तन यांना जिंकून देण्यात करोटे यांचा मोठा वाटा आहे.  त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून तरी असंच वाटत आहे की आमगाव येथे सहसराम करोटे यांचे पारडे सध्यातरी जड आहे. तर मंडळी आमगाव येथे कोण आमदार हवा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा.
आता पाहुयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मोरगाव अर्जुनी
 अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६३ आहे.  अर्जुनी मोरगाव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. सडक-अर्जुनी तालुका, २. अर्जुनी मोरगांव तालुका आणि ३. गोरेगांव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अर्जुनी मोरगाव हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 साली झालेल्या अटातटीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी विजय मिळवला होता.  त्यांनी भाजपचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा 718 मताने पराभव केला होता.  या निवडणुकीत मनोहर चंद्रिकापुरे यांना 72 हजार 400 मते मिळाली होती.  तर भाजपचे राजकुमार बडोले यांना 71 हजार 782 मते मिळाली होती. अर्जुनी मोर विधानसभा मध्ये अजित पवार गटाचे सध्या आमदार आहेत.
.मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे नेते जर सोडले तर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यानी भाजपाला सहकार्य केले नाही हे  सत्य आहे.  आता नेमकी विधानसभा उमेदवाराच्या रेस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडुन आ. मनोहर चद्रिकापुरे याचा दावा प्रबळ आहे. तर दानेश साखरे नगरसेवक , जि. प सदस्य यशवंत गणविर, सुगत चद्रिकापुरे, अजय लांजेवार हे स्पधैत आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मध्ये काँग्रेस ने मुसंडी मारल्याने पक्षाचे मनोधैर्य उंचावले आहे. मग आता पण आमदार मनोहर चद्रिकापुरे यांना जागा मिळणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहे.  चद्रिकापुरे यांच्या बद्दल लोकांना मध्ये वेगळे बोलले जात आहे.  २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती.  ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला आली होती.  युतीमुळे मत विभाजन टळले. व राष्ट्रवादी काँग्रेस चे मनोहर चद्रिकापुरे निवडून आले. गोंदिया जिल्हाचे मताब्बर नेते खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटाचे आहेत. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड, डाॅ. भारत लाडे आनंद जाभुळकर, नगरसेवक अतुल बन्सोड, केतन मेश्राम, चंद्रशेखर ठवरे, अनिल दहिवले, हे उमेदवार स्पर्धेत आहेत. तर भारतीय जनता पक्षा कडुन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,पोमेश्वर रामटेके रत्नदिप दहिवले. हे भाजप पक्षा कडुन दावा करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी यावेळेस हायव्होल्टेज लढत पाहावयास मिळणार आहे.  या ठिकाणी माजी मंत्री राजकुमार बडोले हे भाजपकडून इच्छुक असून सध्या महायुतीमध्ये असलेले अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे देखील या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चंद्रिकापूर यांनी देखील जनसंपर्क दौरे सुरू केले असून ते देखील निवडून लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ आघाडीत कोणाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे.  काँग्रेसकडून हरीश बनसोड, डॉ. अजय लांजेवार, दिलीप बनसोड, अनिल दहिवले इच्छुक आहेत.  यावेळेस आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे लढले नाही तर त्यांचे चिरंजीव डॉ. सुगत चांद्रिकापुरे या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत.  तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दानेश साखरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मिथुन मेश्राम हे इच्छुक असून त्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.त्यामुळे आता अर्जुनी मोरगाव येथे महाविकास आघाडी कडून नक्की जागा कोणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते इथे आमदार महाविकास आघाडीचा असावा की महायुतीचा हे आम्हाला कमेंट करून कळवा.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघ
तिरोडा विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६४ आहे.  तिरोडा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. तिरोडा तालुका आणि तिरोडा नगरपालिका, २. गोंदिया तालुक्यातील गंगाझरी महसूल मंडळ आणि ३. गोरेगांव तालुक्यातील गोरेगांव महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो. तिरोडा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे विजय भरतलाल रहांगडाले हे तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांना 26 हजार मताने धूळ चारली होती.  या निवडणुकीत विजय रहांगडाले यांना 76 हजार 482 तर रविकांत बोपचे यांना 50 हजार 590 इतकी मते मिळाली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिरोडा गोरेगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप पक्षाने आघाडी घेतली आहे त्यामुळे भाजप पक्षाला इथे उभारी मिळाले आहे.  परंतु तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यशैलीवर अनेक भाजप नेते आणि मतदार नाराज असल्याची चर्चा आहे. तरीसुद्धा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपने घेतलेली आघाडी म्हणजे भाजपसाठी एक चांगली बाब आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत भोसले हेमागील दहा वर्षापासून या विधानसभा मतदारसंघांमध्ये सतत जनसंपर्क ठेवत आहेत त्यामुळे रविकांत भोसले यांचा मागील दहा वर्षापासून जनसंपर्क चांगला तगडा बनला आहे. येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून ही जागा भाजपसाठी जाईल हे फिक्स आहे तर महाविकास आघाडी कडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यावरती दावा करू शकतात. तर आता महायुतीमध्ये महाविकास आघाडी शरद पवार गट यांची उमेदवार रविकांत बोचपे यांच्याविरुद्ध महायुतीकडून भाजपचा चेहरा कोण असणार यावरती सध्या चर्चा रंगल्या आहेत.  तसं पाहायला गेलं तर तिरोडा गोरेगाव विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला येथून जास्त मताधिक्य मिळाले आहे. परंतु येथील विद्यमान आमदारांवर या विधानसभा मतदारसंघांमध्ये नाराजी आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीला आमदार विजय रहांगडले यांना पुन्हा एकदा उमेदवारी भेटेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. जरी भाजपने यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली तरी मतदार यांना मतदान करणार का हा देखील प्रश्न महायुती पुढे सतावत आहे. त्यामुळे येथे जरी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जास्त मताधिक्य मिळाले असले तरी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला त्यांना जास्त मते मिळतीलच असे नाही त्यामुळे महायुतीला येथील निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही. तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार विजय रहांगडले यांच्यासह माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रंगले, जिल्हा परिषद सभापती संजय टेंबरे भाजपा विभाग जिल्हा अध्यक्ष ओम कटरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते धर्मेंद्र तुरकर माजी नगराध्यक्ष सोनाली ताई देशपांडे ही नावे सध्या महायुतीकडून चर्चेत आहे. परंतु या सर्वांमध्ये तसे पाहिले तर विद्यमान आमदार विजय रहांगडले यांचा पारडे जड आहे. तर महाविकास आघाडी कडून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांचे चिरंजीव रविकांत बोपचे इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र कटरे गोरेगाव तालुक्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष ढेमेंढरे माजी आमदार दिलीप बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर मंडळी तुम्हाला तिरोडा गोरेगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार व्हावा असे वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा. तर मंडळी असा आहे गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा. तर मंडळी तुम्हाला काय वाटते गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून कळवा.

Leave a Comment