मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली.
शपथविधी सोहळ्यात एकुण ३९ मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली होती. यात ३४ कॅबिनेट तर ५ राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात आली. यात भाजपचे १९ मंत्री शिवसेनेचे ११ मंत्री तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण चर्चा आहे ती मंत्रिपद डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांची. कारण, अजितदादांपेक्षाही जास्तीचा राजकीय प्रवास अन् अनुभव असलेले नेते म्हणजे छगन भुजबळ. या भुजबळांना अगदी अजितदादाही पहिल्या फळीतले नेते मानतात. पण, त्याच भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू का देण्यात आला. त्याविषयीची कारणं जाणून घेऊयात.
चला तर पाहूया छगन भुजबळ यांना मंत्रिपद का दिले गेले नाही यांचा पत्ता नेमका कोणी कट केला?
शिवसेनेतून आपली कारकीर्द सुरू करणारे भुजबळ यांनी आतापर्यंत बरीच पद उपभोगली आहेत नगरसेवक पासुन ते थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल त्यांनी मारलेली आहे , शिवसेनेतील संबंध ताणल्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला पूढे जावून ते शरद यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये आले . अनेक पद पवारांनी त्यांना दिली , वर्षापूर्वी जेव्हा पक्षात फुट पडली तेंव्हां भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत गेले. पक्षाने त्यांना शिंदे सरकार मध्ये मंत्रीही केले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणजे सर्वात वयस्कर आमदारांपैकी एक असलेले आमदार, वयाची ८० ओलांडलेल्या भुजबळ यांनी आतापर्यंत मुंबई मधुन दोनदा आणि येवला नाशिक मधुन सलग चौथ्यावेळी ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत शिवाय २ वेळा ते विधानपरिषदेवर सुद्धा निवडून गेले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभेत पुन्हा निवडून आलेल्या भुजबळांना मात्र यावेळी मंत्रीपदापासुन दुर ठेवण्यात आले. पक्षाने वयाचा विचार करता नवीन उमद्या तरुणांना संधी दिली जाईल अन् ज्येष्ठ वयस्कर आमदारांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येईल असे सांगितलेले असताना सुद्धा भुजबळ नाराज अश्या चर्चां सध्या सुरू आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा आणि ओबीसींचे नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखले जायचे.
भुजबळ हे आघाडी असो किंवा महायुती ते कायम मंत्रीपद भूषवत आलेले आहेत.
त्यांना प्रशासकीय आणि मंत्र पदांचा अनुभव हा दांडगा आहे परंतु नुकत्याच पार पडलेल्या देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून मात्र पहिल्यांदाच छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर त्यांचा पत्ता कट का करण्यात आला हे आपण जाणून घेऊयात. छगन भुजबळ यांनी बऱ्याच वेळा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत.
त्यामध्ये आपल्याला ओबीसी ही त्यापेक्षा काही महत्त्वाचे नाही शाळेत सरस्वती फोटो लावण्यापेक्षा महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. यासारखी अनेक वादग्रस्त वक्तव्य भुजबळाने त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात केल्या आहे तसेच भुजबळ हे राज्याचे मंत्री असून देखील ते एका विशिष्ट समाजासाठी लढतात आणि त्याच्यासाठी काम करतात असा एक समाज मराठा समाजाचा झालेला आहे त्यामुळे अजितदादा सोबतच शिंदे आणि फडवणीस यांच्या सरकारची अडचण वाढत होती.
त्यामुळे छगन भुजबळ यांनी वादग्रस्त केलेली वक्तव्य त्यांना भोवली आहेत अशा देखील चर्चा चालू आहेत
मराठा आंदोलन म्हणून जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ या दोघांमधील संघर्ष संपूर्ण राज्याने पहिला आहे या संघर्षाची सुरुवात झाली होती ती म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये पोलीस यांनी लाठीचार्ज केला होता त्या वक्तव्यावरून.
कारण त्यावेळी मनोज जरांगे यांनी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले होते.
तर राजकारणातील इतर मंडळींनी म्हणून जरांगे यांना पाठिंबा दिला होता तसेच राज्यातील मराठा समाज ही जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसून आलेला होता.
यामुळे मागील काही काळात महायुतीच्या सरकारची बदनामी झाली होती.
जालन्यातील एल्गार सभेत भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तापताना दिसला होता.
या सर्व गोष्टींमुळे महायुतीला लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला दिसला.
तसं पाहिलं गेलं तर छगन भुजबळ यांनी देखील आता पंच्याहत्तरी ओलांडले आहे ते आता 77 वर्षांचे झाले आहेत.
कारण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून त्यांच्या वयाचा मुद्दा सांगून डावलण्यात आल्याचं कळतंय.
कारण आता नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्याच्या इथून अजित दादांनी वयाची 75 ओलांडलेल्या भुजबळान मंत्री पद ना कळवण्याचा कळतंय. हा निर्णय घेण्यासाठी अजित दादांसोबत यामध्ये भाजपचा देखील हात आहे अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत.
छगन भुजबळ हे मधल्या काळात ओबीसींचा चेहरा आणि नेतृत्व म्हणून प्रचंड चर्चेत आले होते.
त्यामुळे जळगाव मधील महायुतीतील काही नेत्यांना छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात नको होते कारण संजय गायकवाड या शिंदे यांच्या आमदाराने भुजबळांची मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी करण्याची मागणी देखील केली होती.
भुजबळांची राजकीय ताकद सर्वांनाच माहित आहे परंतु महाजन दादा भुसे नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे हे सर्व आमदार नाशिक भागातून म्हणजेच छगन भुजबळ यांच्या भागातून येतात.
त्यामुळे आता या भागातून कोकाट्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात अजित दादांनी संधी दिली आहे.
एकंदरीत भुजबळांच वर्चस्व कमी करण्यासाठी महायुतीतील नेत्यांनीच भुजबळांच्या मंत्र पदाला विरोध दर्शवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अशाही चर्चा आहेत की भुजबळ यांना केंद्रास संधी दिली जाऊ शकते त्यांना राज्याच्या राजकारणातून बाजूला करत भुजबळांच्या राजकीय अनुभवाचा वापर अजितदादा इतर राज्यातील पक्ष विस्तारासाठी करू शकतात अशी देखील चर्चा आहे.
तर मंडळी अशी काही कारणे आहेत जी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे आहे .