Site icon

छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात


छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते तो म्हणजे ‘छावा’. विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला.या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याशिवाय विकी कौशलची भूमिका आणि त्याचा अभिनय पाहुन नेटकरी त्याचं कौतूक करत आहेत. तर अभिनेत्री रश्मिका मंदांना देखील छावा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. छावा या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे.

एकीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनी दिग्दर्शकावर संताप व्यक्त केला आहे. छावा’चा ट्रेलर इतका दमदार असून, देखील नेटकरी त्यावर का चिडले आहेत,
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचं कारण काय आहे? चला तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
चला तर मुद्द्याचं बोलूया.
मुद्दा क्रमांक १) छावा या चित्रपटाच्या ट्रेलर वरती नेटकरी का चिडले आहेत?
या चित्रपटाची सुरुवात एका दमदार संवादाने होते. परंतु या संवादातून अतिशय महत्त्वाचा असलेला हिंदवी हा शब्द वगळण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज हे नृत्य करतानाचे दृश्य या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले आहे. यावरून अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
 ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल पाहायला मिळाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक आदरणीय योद्धा-राजा होते. त्यांना अशाप्रकारे नृत्य करताना दाखवून त्यांचा वीरतेचा वारसा कमी करण्याचा बॉलिवूडचा प्रयत्न असल्याचे, लोक म्हणत आहेत.
चला तर पाहुयात काय म्हणतात नेटकरी?
‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरवर एका नेटिझनने कमेंट करत लिहिले की, ‘संभाजी राजे नाचताना दाखवले गेले, तेव्हा मला त्या दृश्याचा तिरस्कार वाटला. बॉलिवूडला त्यांचा हा विकृत टच सगळीकडेच देण्याची गरज का भासते? आमचे राजा हे योद्धा आणि धर्माचे रक्षक होते, मनोरंजनासाठी नाचणारे नव्हते. हा त्यांचा अनादर आहे.’.
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून प्रेरित असलेली ही घोषणा ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या संवादात केवळ ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’,असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले. स्वराज्याची सर्वसमावेशक आणि एकात्म अस्मिता दर्शवणारा हिंदवी हा शब्द वगळणे, म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणूनबुजून पुसून टाकण्यासारखे आहे, असे लोक म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने आपला संताप व्यक्त करताना लिहिले की, ‘मी ‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ हीच घोषणा ऐकून मोठा झालो आहे. बॉलिवूडने त्यांचा उदारमतवादी अजेंडा पुढे ढकलण्यासाठी ते मुद्दाम काढून टाकले आहे. हे अजिबात चालणार नाही.’
मुद्दा क्रमांक २) चला तर पाहूया औरंगजेबाला आदर का दिला यावरून ही नेटकरी चांगलेच संतापले आहेत
ट्रेलरमध्ये मुघल सम्राट औरंगजेबला अनावश्यक आदर दिल्याबद्दल टीकाही झाली आहे. अक्षय खन्नाच्या ‘मुघल शहेनशाह औरंगजेब’च्या पात्राचा उल्लेख करणाऱ्या पोस्टरवर लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी असा युक्तिवाद केला की, त्याचे कॅप्शन सोपे ठेवता आले असते. एका नेटकऱ्याने प्रश्न केला की,’मुगल शहेनशाह औरंगजेब’ का लिहायचे? त्याला फक्त औरंगजेब म्हणणे पुरेसे नव्हते का? अशा पदव्या देऊन त्याचा गौरव का करता?’
एकंदरीतच ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर दमदार असला, तरी लोकांना त्यात या महत्त्वपूर्ण त्रुटी दिसल्याने आता त्यात बदल करण्यात यावे, अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.
याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी विकी आणि रश्मिकाला मराठीत न बोलताना पाहून नाराजी व्यक्त केली आहे. एक नेटकरी म्हणाला की ‘जेव्हा महत्त्वाच्या भूमिका या मराठी आहेत तर ते दोघं मराठी भाषेत न बोलता हिंदीमध्ये का बोलतात? हे पाहणं सहन होतं नाही .’ तर अनेकांनी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासोबत छावाची तुलना केली आहे. त्यांनी म्हटलं की ‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीर सिंगनं आणि प्रियांका चोप्रानं जे काम केलं त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. त्या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी देखील खूप मेहनत घेतली होती. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी दिग्दर्शकांवर टीका केली आहे.
तर मंडळी आता दिग्दर्शक काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून कळवा.

Exit mobile version