जळगाव जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


     आज आपण पाहणार आहोत खानदेशी या नावाने ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे जळगाव. जळगाव जिल्हा येथे ११  विधानसभा मतदारसंघ येतात. जळगाव शहर,  जळगाव ग्रामीण,  अमळनेर,  एरंडोल,  चाळीसगाव,  पाचोरा , भुसावळ,  मुक्ताईनगर,  रावेर,  जामनेर, चोपडा हे विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये येतात. जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त करून कापूस म्हणजेच पांढरे सोने व केळी असे पिके जळगाव येथे घेतली जातात. केळीच्या पिकासाठी भारतात प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आता राज्याच्या राजकारणातही गाजताना दिसतोय.
जळगाव जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भुसावळ. भुसावळ विधानसभा मतदारसंघाची एक ओळख आहे ते म्हणजे येथे एक रेल्वे जंक्शन आहे येथून परराज्यात केळीची मोठी वाहतूक केली जाते. तसेच भुसावळ येथे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड म्हणूनही भुसावळ ओळखले जाते. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक 12 आहे. भुसावळ मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याचा समावेश होतो. भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC उमेदवारांसाठी राखीव आहे.भारतीय जनता पक्षाचे संजय वामन सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे संजय वामन सवकरे 81,689 मते मिळवून विजयी झाले.
अपक्ष पक्षाचे डॉ. मधु राजेश मानवतकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यांच्या विजयाचे अंतर  53,014 मत एवढी होत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सवकरे संजय वामन 87,818 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळते राजेश धनाजी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर  34,637 मते एवढे होते.  भुसावळ येथे संजय वामन सावकारे हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महा युतीकडून भाजपचे संजय सावकारे यांना उमेदवारी भेटेल तर महाविकास आघाडी कडून येथे कोणाला उमेदवारी भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रावेर
मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध, गुर्जर, धनगर, माळी, कोळी, आदिवासी अशा विविध समाजांच्या मतदारांचा समावेश असलेला रावेर विधानसभा मतदारसंघ.  या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राजकीय समिकरणं विरुद्ध टोकाची पाहायला मिळतात.  एकनाथ खडसे, गिरीश महाजन असे भाजपचे तगडे नेते या मतदारसंघात प्रभावी ठरतात.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. रावेर विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११ आहे. रावेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल, भालोद, फैजपूर ही महसूल मंडळे आणि यावल, फैजपूर ही नगरपालिका आणि रावेर तालुक्यातील रावेर, खिरोदा, खानापूर ही महसूल मंडळे आणि रावेर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी अशी लढत होती. यामध्ये काँग्रेस पक्षाचे चौधरी शिरीष मधुकरराव 77,941 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  यांच्यातील विजयाचे अंतर15,609 मते एवढे होते . 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी झाले.
त्यांनी काँग्रेस पक्षाच्या शिरीष चौधरी यांचा पराभव केला. 2014 चा झालेला पराभव काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरून काढला होता.  रावेर येथे विद्यमान आमदार काँग्रेसचे पक्षाचे असल्यामुळे महाविकास आघाडी कडून रावेर ही जागा काँग्रेसला देण्यात येईल त्यामुळे महाविकास आघाडी कडून रावेर येथे पुन्हा एकदा सिरीज चौधरी यांना उमेदवारी भेटेल अशी चर्चा आहे तसेच महायुतीकडून हरी भाऊ जावळे यांना उमेदवारी भेटू शकते.
तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर येथून भाजप पक्षाच्या रक्षा खडसे ह्या खासदार झाले आहेत परंतु रावेर येथील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या विरोधी टोकाच्या भूमिका घेतात त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा रावेर येथे काही परिणाम होईल असे दिसत नाही तसेच एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजप प्रवेश रखडला गेला आहे तर रक्षा खडसे यांना आता  मंत्रिपदरी भेटले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार कोणाच्या पारड्यामध्ये जास्त मते टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव शहर
 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ हा कामगारवर्गबहुल भाग असलेला मतदारसंघ. जळगाव महानरपालिकेचे पूर्ण क्षेत्र या मतदारसंघात येते. त्यामुळे महानगरपालिका नगरसेवक, स्थानिक राजकारण, आघाडी-बिघाडी अशा सर्व गोष्टी मतदारसंघातील जय पराजयास कारणीभूत ठरतात.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १३ आहे. जळगाव शहर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील फक्त जळगाव महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे सुरेश दामू भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजप पक्षाचे सुरेश दामू भोळे हे सलग दोन टर्म येथे आमदार म्हणून राहिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे सुरेश दामू भोळे (राजुमामा) 1,13,310 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अभिषेक शांताराम पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सुरेश दामू भोळे (राजुमामा) 88,363 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे सुरेशकुमार जैन यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  या मतदासंघावर भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. त्यातही भाजप नते,  गिरीश महाजन यांचा बराचसा प्रभाव या मतदारसंघावर पाहायला मिळतो.  शिवसेना पक्षाचे सुरेश जैन हे गेली 35 वर्षे आमदार होते. त्यामुळे 2014 पूर्वी जळगाव शहर हे शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला होता. परंतु 2014 आणि 2019 मध्ये हा बालेकिल्ला भाजपने त्यांच्या हातात घेतला.  त्यानंतर जळगाव शहर येथे भाजपचे वर्चस्व राहू लागले.  परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाएतीकडून पुन्हा एकदा सुरेश भोळे यांना उमेदवारी भेटणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण जळगाव शहर येथे एकनाथ शिंदे या जागेवरती दावा करू शकतात.  तरी ते महाविकास आघाडी कडून अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही. परंतु महाविकास आघाडीमध्ये जळगाव शहर ची जागा कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . कारण इथे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा होता. तर या अगोदर सलग 35 वर्ष शिवसेनेने येथे राज्य गाजवलेले आहे . त्यामुळे आता ही जागा कोणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . त्यामुळे आता महायुती व महाविकास आघाडी कडून इथे कोणाला तिकीट भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पाचोरा
पाचोरा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  पाचोरा विधानसभा मतदारसंघ क्रमांक १८ आहे. पाचोरा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुका (कुऱ्हाड महसूल मंडळ वगळून) आणि भडगाव तालुक्यातील कोळगाव, भडगांव आणि गोंडगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पाचोरा हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेना पक्षाचे किशोर आप्पा पाटील हे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे किशोर आप्पा पाटील विरुद्ध अपक्ष अमोल पंडितराव शिंदे अशी लढत झाली होती.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे किशोर अप्पा पाटील 75,699 मते मिळवून विजयी झाले. अपक्ष  पक्षाचे अमोल पंडितराव शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  विजयाचे अंतर फक्त 2,084 मत होती.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे किशोर अप्पा पाटील 87,520 मते मिळवून विजयी झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिलीप ओंकार वाघ यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेना फुटी नंतर किशोर आप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे पाचोरा येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाएतीकडून किशोर आप्पा पाटील यांना उमेदवारी भेटेल.  तर महाविकास आघाडी कडून कोणत्या नवीन चेहऱ्याला इथे उमेदवारी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  तसेच पाचोरा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गट हा पक्ष कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच पाचोरा या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला भेटेल.
आता पाहुयात पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जामनेर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९ आहे. जामनेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्ष पक्षाचे गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जामनेर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  जामनेर येथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व आहे. त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.  मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी तालुक्यात गिरीश महाजन यांची ‘वोटबँक’ मजबूत करून ठेवली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे गिरीश दत्तत्राय महाजन 1,14,714 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संजय भास्करराव गरुड यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
 2014 च्या निवडणूकीत गिरीश महाजन यांनी 1,03,498 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिंगबर केशव पाटील यांचा पराभव केला होता. एकंदरीत जामनेर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता येथे गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे.  तसेच ते निवडूनही येत आहेत त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनाच उमेदवारी भेटेल.  तर आता महाविकास आघाडी कडून गिरीश महाजन यांच्या विरोधात कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे . तसेच इथे महाविकास आघाडीला एकदा तरी निवडून येण्यासाठी संधी भेटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया सहावा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मुक्ताईनगर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २० आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिरडी, सावदा ही महसूल मंडळे आणि सावदा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो.  मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एकनाथ खडसे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.  गेली अनेक वर्षे एकनाथ खडसे हे या मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते .  2014 च्या विधानसभा निवडणुकीत खडसे हे 85657 मते मिळवत विजयी झाले होते.
युती सरकारमध्ये ते महसूलमंत्री आणि इतर जवळपास 12 मंत्रालयाचा कारभार पाहात होते. मात्र दरम्यानच्या काळात भोसरी येथील भूखंड घोटाळा चर्चेत आला आणि खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे 2019 मध्ये भाजप या पक्षाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारले. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे या भाजप पक्षाकडून तर अपक्ष म्हणून चंद्रकांत निंबा पाटील अशी लढत झाली.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष पक्षाचे चंद्रकांत निंबा पाटील 91,092 मते मिळवून विजयी झाले. तर भाजपा पक्षाचे खडसे रोहिणी एकनाथराव यांचा अवघ्या 1957 मतांनी पराभव झाला. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तर एकनाथ खडसे हेही भाजप पक्षामधून बाहेर पडले होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या सून बाई रक्षा खडसे या रावेर या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच त्यांना यावेळी मंत्री पदही मिळाले आहे  त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजप प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. तर आता रोहिणी खडसे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून निवडणूक लढवणार की त्या  भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात सातवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अमळनेर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघ  क्रमांक १५ आहे. अमळनेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुका आणि पारोळा तालुक्यातील बहादरपूर आणि शेळावे ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अमळनेर हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील 93,757 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे शिरिशदादा हिरालाल चौधरी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे शिरिशदादा हिरालाल चौधरी 68,149 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एकमेव आमदार अशा आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निवडून आलेले आहेत.  परंतु राष्ट्रवादी फुटी नंतर अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिली. त्यामुळे अनिल पाटील यांना मंत्री पदही भेटले. अनिल पाटील हे पहिल्यांदाच आमदारही झाले आणि पहिलाच आमदारकी त्यांना मंत्री पद भेटले. परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल पाटील यांना आपले आमदारकी टिकवता येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  कारण येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून शरद पवार या जागेवरती दावा करू शकतात त्यामुळे शरद पवार अनिल पाटील यांचा काटा काढण्यासाठी नक्कीच चांगल्या नवीन चेहऱ्याला संधी देणार आणि त्यांना पाठबळही देणार. त्यामुळे अनिल पाटील यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकी टिकवता येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहुयात आठवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव ग्रामीण
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ  क्रमांक १४ आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो.  जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे गुलाबराव रघुनाथ पाटील 1,05,795 मते मिळवून विजयी झाले. अपक्ष  पक्षाचे अत्तरडे चंद्रशेखर प्रकाश यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे पाटील गुलाब रघुनाथ 84,020 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे देवकर गुलाबराव बाबुराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
जळगाव ग्रामीण हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु 2014 मध्ये येते शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे निवडून आले कारण 2014 च्या आधी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाबराव देवकर यांची प्रतिमा जळगाव ग्रामीणमध्ये चांगली होती परंतु त्यांना घरकुल घोटाळ्यामध्ये कारागृहात जावा लागले.त्यामुळे गुलाबराव देवकर हे कारागृहातूनच निवडणूक लढवत होते. परंतु 2009 मध्ये गुलाबराव देवकर यांचा इथे पराभव झाला याचाच फायदा शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील यांनी घेतला.  2014 मध्ये गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांचे विषयी आक्रमक प्रचार करून शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे विजय झाले. त्यामुळे जळगाव ग्रामीण हा आता शिवसेनेचा बालेकिल्ला बनायला लागला आहे. परंतु शिवसेना फुटी नंतर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यामुळे आता येतील शिवसेना मतदार यांच्यावती नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
तर आता इथे महायुतीकडून शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडी कडून येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे कोणाला नवीन संधी देणार हे पहा महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहूया पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे एरंडोल
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  एरंडोल विधानसभा मतदारसंघ क्रमांक १६ आहे.
एरंडोल मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील एरंडोल तालुका, भडगांव तालुक्यातील आमडदे हा महसूल मंडळ आणि पारोळा तालुक्यातील चोरवड, तामसवाडी, पारोळा ही महसूल मंडळे आणि पारोळा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो. एरंडोल हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेना पक्षाचे चिमणराव पाटील हे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. एरंडोल विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, कालांतराने हा मतदारसंग जनता दल, शिवसेनामार्गे हा मतदारसंघ युतीच्या छायेत आला.  मात्र 2014 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आणला. परंतु 2019 मध्ये एरंडोल हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेना या पक्षाच्या ताब्यात गेला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे चिमनराव रुपचंद पाटील 82,650 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अण्णासाहेब डॉ. सतीश भास्करराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. परंतु शिवसेना फुटी नंतर चिमणराव पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना साथ देण्याचे ठरविले.  त्यामुळे येथील कट्टर शिवसेना सैनिक चिमणराव पाटील यांच्यावती नाराज असल्याचे चर्चा आहेत तसेच आता चिमणराव पाटील यांचे वय जास्त झाले आहे त्यामुळे ती आता ही निवडणूक लढवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहूया पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चोपडा
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघ क्रमांक १० आहे. चोपडा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील किनगांव, साकळी ह्या महसूल मंडळे यांचा समावेश होतो.  चोपडा हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. शिवसेना पक्षाच्या लताबाई सोनवणे ह्या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे लताबाई चंद्रकांत सोनवणे 78,137 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जगदीशचंद्र रमेश वाळवी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सोनवणे चंद्रकांत बळीराम 54,176 मते मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पाटील माधुरी किशोर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. लता सोनवणे ह्या चोपडा येथून पहिल्यांदाच आमदार झाल्या होत्या शिवसेना फुटी नंतर लता सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ देण्याचे ठरवले. यामुळे येतील कट्टर शिवसैनिक यांच्यावती नाराज असल्याचा बोलले जात आहे.  त्यामुळे आता लता सोनवणे यांना पुन्हा एकदा चोपडा येथून आमदार होण्याची संधी भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया पुढचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चाळीसगाव
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  चाळीसगांव विधानसभा मतदारसंघ क्रमांक १७ आहे. चाळीसगांव मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील फक्त चाळीसगांव तालुक्याचा समावेश होतो. चाळीसगांव हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे मंगेश चव्हाण हे चाळीसगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे मंगेश रमेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशमुख राजीव अनिल यांचा 4287 मतांनी पराभव करून जागा जिंकली. चाळीसगाव हा विधानसभा मतदारसंघभाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2014 मध्ये ही चाळीसगाव येथे भाजप पक्षाचे उमेदवार निवडून आले होते.  2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथून भाजप पक्षाने नवीन चेहरा म्हणून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. मंगेश चव्हाण यांना भेटलेल्या पहिला संधीमध्ये त्यांना भाजपचा बालेकिल्ला राखण्यात यश आले.  त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा मंगेश चव्हाण यांनाच उमेदवारी भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच चाळीसगाव विधानसभा मतदार  मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा आमदार बनण्याची संधी देणार का हे पान महत्त्वाचे ठरणार आहे.
तर मंडळी असा आहे जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांचा लेखाजखा.
तर तुम्हाला काय वाटते जळगाव जिल्ह्यामधील कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगा .

Leave a Comment