मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जिल्हा तो म्हणजे जालना .लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनामुळे रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचा गड असं मानला जाणाऱ्या जालन्याला लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुंग लागला आणि काँग्रेसने तेथे आपला पंजा उमटवला. काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले. जालना जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. जालना, परतुर, भोकरदन, घनसांगवी, बदनापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यामध्ये येतात. जिल्ह्यातील कोणते पाच आमदार सध्या आमदारकीच्या अगदी जवळ आहेत? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर वर्क आऊट होईल का? याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. चला तर सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ पाहुयात तो म्हणजे जालना.
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. जालना विधानसभा मतदारसंघ क्रमांक 101 आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जालना मतदारसंघात जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील वाघरुळ जहागीर, रामनगर, जालना (ग्रामीण) ही महसूल मंडळे आणि जालना नगरपालिका यांचा समावेश होतो. जालना हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कैलास किसनराव गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जालना हे शहर बियाणे आणि स्टील यासाठी जागतिक पातळी वर ओळखले जाते . 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर सलग सहा निवडणुकी पैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे निवडून आले तर चार वेळेस अर्जुन खोतकर हे निवडून आले. 2014 मध्ये अर्जुन खोतकर हे अवघ्या 294 मतांनी निवडून आले होते . परंतु 2019 ला शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होऊनही खोतकर यांना जिंकता आलं नाही तिथे बाजी मारली ते म्हणजे काँग्रेसचे किसनराव गोरंट्याल यांनी..2024 मध्ये आत्ताच झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर असेच वाटते की पुन्हा एकदा 2024 मध्ये काँग्रेस बाजी मारेल म्हणजेच कैलास गोरंट्याल यांना पुन्हा एकदा निवडून येण्याची संधी भेटेल.
आता पाहुयात दुसरा मतदार संघ तो म्हणजे परतुर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. परतूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 99 आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परतूर मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. परतूर २. मंठा ही तालुके आणि ३. जालना तालुक्यातील नेर महसूल मंडळ यांचा समावेश होतो. परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे बबनराव दत्तात्रय लोणीकर हे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. बबनराव लोणीकर हे 1999 पासून भाजपकडून उमेदवारी मिळवत आहेत आणि 1999 पासून ते परतुर येथे आमदार आहेत. 2019 मध्ये बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध सुरेशकुमार जेथलिया अशी लढत होती आणि 2019 मध्ये बबनराव लोणीकर यांनी बाजी मारली. बबनराव लोणीकर 2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत. 2024 मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत परतुर करांना पाहिला भेटेल. बबनराव लोणीकर यांच्या विरोधात पुन्हा एकदा सुरेश कुमार अशी लढत पाहिला भेटेल. परंतु 2024 मध्ये बबनराव लोणीकर यांची वाट दिसते तितकी सोपी नाहीये. कारण बबनराव लोणीकर काही ना काही कारणास्तव चर्चेत आलेले आहेत.त्या चर्चा म्हणजे बनावट पदवी , आयपीएस अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी , राजेश टोपे यांच्यावर केलेली शिवीगाळ तसेच तहसीलदार मॅडम यांना हीरोइन म्हणणे या सर्व गोष्टी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले आहेत. तसेच बबनराव लोणीकर यांची धडपड चालू आहे ती म्हणजे स्वतःच्या मुलाला लॉन्च करण्याची. कदाचित मुलाला लॉन्च करण्यासाठी बबनराव लोणीकर हे माघार घेऊन ते त्यांच्या मुलाच्या तिकिटासाठी दावा करू शकतात. याचाच फायदा 2024 मध्ये काँग्रेसला होऊ शकतो. तसेच सुरेश कुमार जेथलिया यांना शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची ताकद मिळाली. तर सुरेश कुमार घेतल्या यांना ही निवडणूक सोपी जाईल असेही चर्चा आहेत परंतु ही निवडणूक बबनराव लोणीकर यांना जड जाईल.
आता पाहुयात तिसरा मतदारसंघ तो म्हणजे भोकरदन
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघ क्रमांक १०३ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भोकरदन मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. जाफराबाद तालुका आमि २. भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगांव (रेणूकाई), सिपोराबाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे संतोष रावसाहेब दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भोकरदन हा विधान सभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण इथे भोकरदन मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात 40 वर्ष रावसाहेब दानवे यांनी संघर्ष केला आहे. भोकरदन येथे रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष रावसाहेब दानवे हे विद्यमान आमदार आहेत. भोकरदन येथे आमदारकीसाठी दानवे विरुद्ध दानवे असा संघर्ष पाहायला मिळतो तो संघर्ष म्हणजे चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे. 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांनी विधान सभा निवडणुकीला त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांना चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात उभे केले होते. परंतु निर्मला दानवे यांचा पराभव 1739 मतांनी झाला आणि येथे राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी बाजी मारली.
त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी 2014 मध्ये त्यांचे पुत्र संतोष दानवे यांना विधानसभा निवडणुकीला पुन्हा एकदा चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले . 2014 मध्ये मात्र संतोष दानवे यांचा विजय 6750 मतांनी झाला. त्यानंतर 2019 मध्येही संतोष दानवे यांनी चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले आणि 2019 मध्ये संतोष दानवे यांनी बाजी मारली. लोकसभा निवडणुकीला रावसाहेब दानवे यांना उभे करून त्यांना भोकरदन मधून मोठी मिळून द्यायचे आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वतः उभे राहायचे असे राजकारण दानवे कुटुंबाचं चाललं होतं. परंतु 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा चांगलाच पराभव झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलन फॅक्टर याची झळ बसली. त्यामुळे आता भोकरदन येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये संतोष दानवे यांना 2024 मध्ये पुन्हा एकदा लीड मिळणार की त्यांनाही या आंदोलनाचा फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याच गोष्टीमुळे दानवे कुटुंब आता टेन्शनमध्ये आले आहे. त्यात दुसरीकडे चंद्रकांत दानवे म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट यांना याचा फायदा मिळण्याची जास्त संधी आहे.
आता पाहुयात चौथा मतदारसंघ तो म्हणजे घनसांगवी
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघ क्रमांक १०० आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घनसावंगी मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. घनसावंगी तालुका, २. जालना तालुक्यातील विरेगांव आणि पाचणवडगांव ही महसूल मंडळे आणि ३. अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश भैय्या अंकुशराव टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत . घनसांगवी हा विधानसभा मतदार संघ राजेश टोपे यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो कारण घनसांगवी हा मतदारसंघ 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे. घनसांगवी येथे अनेकांनी राजेश टोपे यांच्या विरोधात उभे राहून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाच्याही प्रयत्नाला यश आले नाही. घनसांगवी येथे राष्ट्रवादीचे राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेचे हिकमत उडान अशी लढत होत आली आहे. सध्या हिकमत उडान हे ठाकरे गटात आल्याने आता विधानसभेसाठी ते शिंदे घटक जातील असे जोरदार चर्चा चालू आहेत. कारण घर सांगवी येथे धनुष्यबाणविरुद्ध तुतारी अशी पाहायला मिळणार आहे त्यामुळे उडान हे ठाकरे गटात असल्याने त्यांना इथे संधी मिळणार नाही. त्यामुळे हिकमत उडाण हे शिवसेना शिंदे गटात जातील अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे राजेश टोपे यांना यावर्षीही घनसांगवी येथे आपला विजय टिकवण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहुयात पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे बदनापूर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १०२ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बदनापूर मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. बदनापूर तालुका, २. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि राजूर ही महसूल मंडळे आणि २. अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड, धनगर पिंपरी, अंबड ही महसूल मंडळे आणि अंबड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. बदनापूर हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाचे नारायण तिलकचंद कुचे हे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २००९ ला हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला. यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे संतोष सांबरे निवडून आले. पण २०१४ ला युती आणि आघाडी स्वतंत्र लढल्याने शिवसेनेच्या सांबरेंचा पराभव होऊन भाजपचे नारायण कुचे निवडून आले . २०१९ लाही राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना शह देत पुन्हा एकदा भाजपच्याच नारायण कुचे यांनी मैदान मारलं. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे हे याच बदनापूर मतदारसंघातून खुप पिछाडीवर गेले. त्यामुळे बदनापूर विधानसभेच्या निकालाचा कल या वेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलाय, असं म्हणता येईल. त्यात संतोष सांबारे यांनी शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केल्यामुळे यंदा महाविकास आघाडीकडून ते विधानसभेच्या रिंगणात दिसतील, हे स्पष्ट आहे. शरद पवार गटाकडून बबलू चौधरीही इच्छुकांच्या यादीत असल्याने आघाडीला बदनापूरमध्ये बंडाचा फटका बसू शकतो, असं सध्याचं वातावरण आहे. तर हे होते जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ मराठा आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या विधानसभेलाही जालन्यात निर्णायक ठरु शकतो. आता याचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला सहन करावा लागेल, हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे
जालन्यात यंदा कोण महायुती की महाविकास आघाडी तुम्हाला काय वाटतं? हे आम्हाला कमेंट करून सांगा