Site icon

दत्ता गाडेनेच रेप केला तपासात माहिती उघड!


दत्ता गाडेनेच रेप केला तपासात माहिती उघड!
हा माझ्याशी वाईट वागला हो, स्वारगेटच्या पीडितेने दत्तात्रयकडे बोट दाखवत एकाला सांगितलेलं; तो म्हणाला, वाईट लोक असतातच, तू…
26 फेब्रुवारी 2025 रोजी एक घटना घडली. ती घटना घडली पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर.
स्वारगेट येथील बस स्थानकावर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका २६ वर्षीय मुलीवरती शिवशाही बस मध्ये अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. काही वेळातच या घटनेचे तपशील समोर यायला लागले. दत्तात्रय गाडे हा नराधम या सगळ्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे. त्यानं या २६ वर्षांच्या तरुणीला ताई म्हणत आवाज दिला, त्यानंतर तिला गोड बोलून एका बसमध्ये चढायला सांगितलं आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केले. पण या प्रकरणात नेमक्या काय अपडेट्स समोर आल्या आहेत,  आणि स्वारगेट आगारातल्या बसेसची नेमकी परिस्थिती काय आहे ? या सगळ्याची माहिती या व्हिडीओमधून घेऊ.
पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरट्याने स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला, ‘ताई कुठे जायचे आहे,’ अशी विचारपूस करून तिची दिशाभूल करून मोकळ्या बसमध्ये नेऊन दुष्कत्य केले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने सुरुवातीला कोणाला काही सांगितले नाही.  त्यानंतर ती गावाकडे जात होती. पण बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने तिने एका मित्रालाकॉल करून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर, त्याने तिला पोलिसांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर बलात्काराचा प्रकार समोर आला.
 पीडित तरुणी फलटणची असून, पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाली आहे. गावी जाण्यासाठी ती मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आली होती. ती फलाटावर बसची प्रतीक्षा करीत असताना आरोपी तिथे येरझाऱ्या घालत होता. काही वेळाने आरोपीने तरुणीशी ‘ताई कुठे जायचे,’ असे विचारून संवाद सुरू केला. आरोपीने ‘ताई’ म्हटल्याने तरुणीच्या मनात शंका आली नाही. फलटणला जायचे आहे, असे उत्तर दिल्यानंतर त्याने ‘फलटणची बस दुसरीकडे लागली आहे,’ असे सांगितले.
 मुक्कामी बसला उशीर झाल्याने ती दुसरीकडे उभी आहे, असे सांगून तरुणाने तिला दुसऱ्या बसकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्या बसजवळ गेल्यावर, आत अंधार असल्याने तरुणीने शंका उपस्थित केली. त्यावर ‘बसला उशीर झाल्याने प्रवासी झोपले आहेत,’ असे आरोपीने सांगितले. त्यानंतर त्याने तरुणीला बसमध्ये चढण्यास भाग पाडले. तिच्या मागोमाग बसमध्ये जाऊन त्याने दरवाजा लावून घेतला. नंतर त्याने जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी बसमधून निघून गेला आणि तरुणीही बाहेर आली.
घडलेल्या प्रकारामुळे तरुणी घाबरली होती. ती फलटणच्या बसमधून घरी जाण्यास निघाली. हडपसरपर्यंत गेल्यानंतर, तिने एका मित्राला फोनवर घडलेला प्रकार सांगितला; तेव्हा मित्राने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. तरुणी एसटीमधून हडपसरला उतरली. तेथून सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान स्वारगेट पोलिस ठाण्यात आली.
स्वारगेट येथे अत्याचारानंतर तरुणी घाबरलेली होती. घटनास्थळाजवळ तिने एका व्यक्तीला ‘हा माझ्याशी वाईट वागला,’ असे आरोपीकडे निर्देश करून सांगितले होते. तेव्हा त्रयस्थाने ‘अशा प्रकारचे वाईट लोक असतात. तू घरी निघून जा,’ असे सांगितले. तरुणीने संबंधिताला अत्याचाराचा प्रकार सांगितला नाही आणि त्यानेदेखील विचारपूस केली नाही; अन्यथा त्याच वेळी घटना समोर आली असती.
याठिकाणी आरोपीनं दोन वेळा तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. आरोपीनं पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत हे किळसवाणं कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीची ओळख पटवली आहे. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे.
अत्याचाराच्या या घटनेनंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यासह फलटण आणि इतर ठिकाणी लोकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता, आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याने कधी लूटमार, कधी दरोडा, कधी पोलीस बनून लोकांची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने वयोवृद्ध महिलांना देखील सोडलं नाही. तो एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करून त्यांची लूटमार करायचा.
आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील रहिवासी आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडे याने २०२९ साली कर्ज काढून एक कार घेतली होती. या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा. त्यांच्या गळ्यात सोनं दिसलं तर तो घरून डब्बा घ्यायचा आहे, असं सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा. या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा.
याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं आरोपी गाडेला अटकही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १२ तोळे सोनं जप्त केलं होतं. २०२० मध्ये शिरूरजवळील कर्डे घाटात जबरी लूटमार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाटपणे फिरत होता. त्याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे. तरीही तो असले कांड करत फिरायचा. स्टँडवर मुक्काम करायचा.
तो इनशर्ट आणि पायात स्पोर्ट शूज घालायचा. त्याच्या तोंडाला नेहमीच मास्क असायचा. स्थानकावरील लोकांना तो पोलीस असल्याचं भासवायचा. ज्यावेळी ही अत्याचाराची घटना घडली, त्यावेळी देखील आरोपी गाडे फॉर्मल शर्ट-पँट आणि शूज अशाच वेषात होता. त्याने पीडित तरुणीशी ताई म्हणून संवाद साधला, आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचं राजकीय कनेक्शन देखील समोर आलं आहे. तो एका बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे.
अत्याचाराचे प्रकरण समोर येताच वसंत मोरे शिवसैनिकांसह स्वारगेट स्थानकात पोहचले आणि सुरक्षा केबिनची तोडफोड केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तिकडे चार बस उभ्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटे पडलेली आहेत.  तेथे काही साड्या देखील पडलेल्या आहेत. याचा अर्थ काय घ्यावा. इथे जो प्रकार घडला आहे, तो दररोज होत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये येथील कर्मचाऱ्यांचा हात आहे. जर या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आहेत तर मग हे सुरक्षा कर्मचारी नेमकं काय करत आहेत? येथे असणारे कर्मचारी केबिन उघडायला आहेत का? असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केला. यानंतर एकच खळबळ उडाली.
दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version