धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींच्या अटकेसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सरकारवर दबाव टाकत असून, त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.

त्यामुळे एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय खोलात जात आहेत.
तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
 धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेऊन केली आहे.
त्यासंबंधी आवश्यक ते सर्व पुरावे सादर केल्याचा दावाही दमानिया यांनी केला.
अशाही परिस्थितीत जर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाहीतर तर अंजली दमानिया यांनी त्यांचा प्लॅन बी सांगितला
 कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही जाणार असा दावाही त्यांनी केला.
अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात असलेली सर्व कागदपत्रं आणि पुरावे सादर केल्याची माहिती दिली.
 त्यावर अजित पवार ते सर्व कागदपत्रं घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यावर एकत्रित बसून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दमानिया यांना दिल्याची माहिती आहे.
पण जर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच नाही तर अंजली दमानिया यांचा प्लॅन बी देखील तयार आहे. त्याची माहिती अंजली दमानिया यांनी स्वतः दिली
काय आहे अंजली दमानिया यांचा प्लॅन बी?
अंजली दमानिया यांच्याकडे अशी कोणती कागदपत्रे आहेत ज्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल?
चला तर मुद्द्याचं बोलूया
मुद्दा क्रमांक १) कोण आहेत अंजली दमानिया?
अंजली दमानिया एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
या अगोदरही अंजली दमानिया यांनी भरपूर राजकारणी लोकांचे घोटाळे बाहेर आणले होते.
असं म्हणतात की अंजली दमानिया यांच्या तावडीतून अगदी एकनाथ खडसे देखील सुटले नव्हते.
कदाचित यांच्यामुळे एकनाथ खडसे यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता.
मुद्दा क्रमांक २) धनंजय मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला नाही तर अंजली या दमानिया यांच्याकडे प्लॅन बी काय आहे?
अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना, राजश्री मुंडे वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे एकत्रित व्यवसाय कसे करतात किंवा यांचे एकत्रित व्यवसाय कसे आहेत, त्यांच्या कंपन्यातून आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कशा पद्धतीने ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये बसते याची माहिती त्यांनी दिली आहे.
या सर्व माहितीची कागदपत्र देखील अंजली दमानिया यांनी गोळा केलेली आहे.
कंपनी संबंधित सर्व बॅलन्स शीट आणि इतर गोष्टी दमानिया यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
यावेळी अंजली दमानिया यांनी भारतीय राज्यघटना कलम 102 (1) (A) आणि 191 (1) याचा दाखला दिला. तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाचाही संदर्भ दिला. त्याचा आधार घेत लाभाचे पद या नियमावलीनुसाल धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होऊ शकते असा दावा दमानिया यांनी केला.
मुद्दा क्रमांक ३) धनंजय मुंडे हे लाभाच्या पदाचे बळी ठरणार आहेत का?
अंजली दमानिया यांच्या मते, धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यवसायिक भागिदार आहेत. त्यांच्या कंपनीला सरकारच्या मालकीच्या महाजेनको कंपनीकडून आर्थिक लाभ मिळतो.
त्याचे सर्व बॅलेन्सशीट, पैशांचे ट्रान्झेक्शन दमानिया यांनी अजित पवारांसमोर मांडले आहेत.
 तसेच त्यावर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडच्या सह्या असल्याची गोष्टही त्यांनी निदर्शनास आणली आहे.
नेमक्या याच गोष्टीचा आधार घेऊन धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल असा दावा दमानिया यांनी केला. निवडणूक आयोगाने मनात आणले तर ही गोष्ट तात्काळ होऊ शकते असा दावाही त्यांनी केला.
मुद्दा क्रमांक ४) काय आहे लाभाचे पद नियमावली?
भारतीय राज्यघटनेचे कलम 102 (1) (A) आणि 191 (1) या अन्वये एखाद्या आमदार किंवा खासदार किंवा मंत्री, सभागृहाने कायद्याद्वारे घोषित केलेल्या कार्यालयाव्यतिरिक्त, सरकारच्या माध्यमातून स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी कुठलाही आर्थिक नफा मिळवत असेल तर त्याला लाभाच्या पद या नियमावलीनुसार अपात्र ठरवण्यात येते.
कुठलाही आमदार आणि मंत्री स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी सरकारच्या माध्यमातून कुठलाही आर्थिक नफा मिळवू शकत नाही, असं ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचं पद या नियमात म्हटलं आहे. त्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाचा अध्यादेशही आहे.
अंजली दमानिया यांनी सरन्यायाधीशांना पत्र देखील लिहिले आहे.
यामध्ये त्यांनी आरोप केले आहेत की जर निवडणूक आयोगाने मुंडेंचे आमदारकी रद्द केली नाही तर सरन्यायाधीशांनी सुमोटो याचिका दाखल करावी आणि ऑफिसच्या तरतुदीनुसार मुंडेंची आमदारकी रद्द करावी.
अंजली दमाने यांनी या पत्रामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
तसेच जर सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावरही कारवाई झाली नाही तर आपण मुंडेंच्या विरोधात रिट पिटीशन दाखल करणार असल्याची माहिती दमानिया यांनी दिली आहे. सगळेच आज काल या पद्धतीने काम करतात पदाचा गैरवापर करतात.
ते थांबवण्यासाठी देशातील सर्वच यंत्रणांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
तसेच ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली अशा गोष्टींना महाराष्ट्रात थारा मिळू नये.
 अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे जे पुरावे सादर केले आहेत त्यामुळे त्यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावाच लागेल यात शंका नाही असे देखील त्यांनी सांगितल आहे.
तसेच त्यांनी राजीनामा नाही घेतला तर प्लॅन बी तयार केल्याचं सांगितलं आहे.
तर आता हे कागदपत्रे घेऊन अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत मीटिंग करणार आहे.
आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचे की नाही ते ठरवणार आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते या सर्व गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *