नांदेड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


नांदेड हा  जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु आताच काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आता नांदेड येथील बालेकिल्लाला सुरूग लागणार  परंतु लोकसभा निवडणुकीला तिथे काहीसा फरक जाणवला नाही. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला. कॉंग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी लोकसभा जिंकली. अशोक चव्हाण हे काँग्रेसचा चेहरा भाजपात गेल्याने सर्व संपले असे वाटत असताना  पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालं.  त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र असेल? नांदेड  नेमके कोणते ९ चेहरे आमदारकी खेचून आणतील  ? विधानसभेला नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस टिकणार की भाजप येणार हे याची आपण सविस्तर चर्चा करु.
नांदेड मध्ये कंधार, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण,  मुखेड, देगलूर, नायगाव,  भोकर,  हदगाव, किनवट या विधानसभा मतदारसंघाचा समवेश होतो. नांदेडचा पहिला विधानसभा मतदारसंघ  येतो तो म्हणजे कंधार विधानसभा मतदारसंघ. कंधार येथे श्यामसुंदर शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. तशी तर कंदार हे विधानसभा मतदारसंघ केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. २००४ नंतर  प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपली राजकीय पाळमुळे इथे रोवली.  सलग दोन टर्म ते कंधारचे आमदार राहिले त्यानंतर २०१९ ला प्रताप पाटील चिखलीकर लातूर मधून खासदार झाले त्यामुळे त्यांची कंधारीतील जागा रिकामी झाली . त्यानंतर कंधार ही जागा चिखलीकर पाटील यांना वाटत होतं की आपल्या मुलाला मिळावी परंतु २०१९ मध्येही युती असल्याने ही जागा शिवसेनेला सुटली आणि शिवसेनेच्या एडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे विरुद्ध शामसुंदर शिंदे यांच्यात लढत झाली . या जागेसाठी शिंदे आणि चिखलीकर यांच्यात बरेच वाद झाले शेवटी शिंदे यांनी शेकाप कडून जागा लढवण्याचे ठरवले आणि २०१९  मध्ये श्यामसुंदर शिंदे यांनी शेकाप कडून जागा लढवली आणि ते जिंकलेही तसेच आता २०१९ मध्ये कंधार या जगासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे चर्चा आहेत. त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांची पुत्र प्रवीण पाटील पुरुषोत्तम धोंडगे दिलीप धोंडगे या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.
जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ येतो तो नांदेड उत्तर
बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर चे विद्यमान आमदार आहेत सध्या ते शिवसेना शिंदे गटात आहेत. २०१९ मध्ये बालाजी कल्याणकर आणि काँग्रेसचे डीपी सावंत यांच्यामध्ये लढत झाली होती आणि बालाजी कल्याणकर यांनी बाजी मारली होती. २०१९ मध्ये नांदेड उत्तर मध्ये बालाजी कल्याणकर हा शिवसेनेकडून नवीन चेहरा देण्यात आला होता तर काँग्रेस कडून दोन टर्म जिंकलेले सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु  नवीन चेहरा असला तरीही शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी येथे बाजी मारली होती. वंचित आणि एम आय एम चा आहे या मतदारसंघात प्रभाव असल्याने येथे मत विभाजन होऊन सावंतांना फटका बसल्याचं बोललं जात होतं त्यानंतर आता अशोक चव्हाणांचे मित्र अशी ओळख राहिलेले डीपी सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर बालाजी कल्याणकर हेही शिवसेनेतील शिंदे गटाकडे गेल्यामुळे तेथील शिवसैनिक नाराज असल्याची बोलले जाते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला बालाजी कल्याणकर यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.  या मतदारसंघात दलीत, मुस्लीम निर्णायक संख्येने आहेत.  नव्यानं वाढणारं शहर म्हणून या मतदारसंघाकड पाहीलं जातं.  मात्र पाणीटंचाई आणि रस्त्यांची येथे भासत असूनही सध्याचे विद्यमान आमदार या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा सूर आहे. तसेच महायुतीकडून इथे बरेच जण इच्छुक आहेत त्यामुळे आता ही जागा कोणाला भेटणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर महाविकास आघाडीकडून येथे काँग्रेसला जागा भेटेल अशी शक्यता आहे.
तिसरा मतदारसंघ येतो तो दक्षिण नांदेड
मोहन हंबर्डे हे नांदेड दक्षिण येथील विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसच्या पक्षाचे उमेदवार आहेत .नांदेड दक्षिण म्हणजे अर्धनांडर शहर सिडको हडको आणि सोनखेड्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ आहे. २०१९  मध्ये राजश्री पाटील आणि मोहन हंबर्डे यांच्यात लढत झाली होती. राजश्री पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती परंतु भाजपमधील नाराजी असल्यामुळे त्यावेळी येथील मत काँग्रेसच्या पथ्यावर पडले होते अशी चर्चा आहे. राजश्री पाटील यांची यवतमाळ लोकसभेची अपयशी लढत यामुळे शिंदे गटात असणारे पाटील बॅकफूटला गेले आहेत.  पण तरिही लोकसभेतून माघार घेणं मान्य केल्यामुळे ते महायुतीचे दक्षीण नांदेडचे उमेदवार असतील, असं बोललं जातंय. तर दुसरीकडे स्टँडिंग आमदार हंबर्डेच पुन्हा या मतदारसंघातून आघाडीकडून लढत देतील, अशी चिन्हं आहेत.
चौथा  विधानसभा मतदारसंघ मतदार संघ येतो तो म्हणजे मुखेड
मुखेड ते तुषार राठोड हे विद्यमान आमदार आहेत . २०१९  मध्ये तुषार राठोड यांच्या विरोधात भाऊसाहेब पाटील यांची लढत झाली होती परंतु तुषार राठोड यांनी बाजी मारली होती.  परंतु विरोधक भाऊसाहेब पाटील यांचे निधन झाल्यामुळे आता हनुमंत पाटील हे निवडणूक मैदानात येतील अशी चर्चा आहे. तर मुखडे ते बोलायचं झालं तर गावची गाव भकास झालेली पाहायला भेटतील तसेच स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे पाणीटंचाई इथे ना कसला रोजगार आहे ना कुठलं धरण आहे त्यामुळे आता तुषार राठोड हे बॅक फुटला जातील अशी चर्चा आहे. मुखडेपे लिंगायत बंजारा आणि इतर समाज कोणाच्या पाठी उभा राहतो यावरही इथे निकाल राहणार आहे.
पाचवा मतदारसंघ आहे तो देगलूर
देगलूर येथे जितेश अंतापुरकर हे विद्यमान आमदार आहेत देगलूर हा अनुसूचित जातींसाठी राखीव असणारा विधानसभा मतदारसंघ आहे . २०१९ मध्ये रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते मात्र त्यांचा करुणा काळात मृत्यू झाला त्यामुळे पोट निवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापुरकर निवडून आले. परंतु आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने दलगुरू मध्ये काही प्रमाणात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे ते आता विद्यमान आमदार कोणत्या पक्षाकडून लढणार हा ही प्रश्न आहे.  तसेच पोटनिवडणुकीमध्ये जितेंद्र अंतापूरकर यांच्या विरोधात साबणे यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे आता ते पुन्हा एकदा ते इच्छुक असल्याचं बोलले जातं सामने हे भाजपचे उमेदवार आहेत. परंतु आता ते शिंदे यांच्या अत्यंत जवळचे ही मानले जातात त्यामुळे आता जितेंद्र अंतापूरकर यांना ही विधानसभा निवडणूक थोडी अवघड जाईल अशी शक्यता आहे.
सहावा मतदारसंघ येतो तो नायगाव
नायगाव येथे विद्यमान आमदार राजेश पवार आहेत. राजेश पवार हे भाजपचे उमेदवार आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये नायगाव येथे वसंतराव चव्हाण हे आमदार होते. परंतु २०१९ च्या मोदी लाट मध्ये भाजपचे राजेश पवार यांनी बाजी मारली. परंतु २०२४ या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये सध्या भाजपला दणका देत खासदार झालेले वसंत चव्हाण यांची पाळंमुळं याच नायगावमध्ये राेवली गेली आणि लोकसभेच्या निकालातून वसंत चव्हाण यांनी थेट दिल्ली गाठत जिल्ह्यातील वारं फिरलंय.  येत्या विधानसभेला ते नायगावमधून आपल्या मुलाच्या तिकीटासाठी शब्द मागू शकतात.  तर दुसरीकडे भाजपचे राजेश पवार हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे.  त्यात भास्करराव खतगावकर, गंगाधर कुंटूरकर व बापूसाहेब गोरठेकर या तिघांची भूमिका काय राहील, यावरही इथला निकाल प्रभावित राहणार आहे
सातवा आहे भोकर विधानसभा
भोकर् विधानसभा येथे पहिली ओळख म्हणजे स्वर्गीय शंकरराव चव्हाण या नावाने ओळखला जायचा कारण भोकरे येथे शंकरा चव्हाण यांची जुनी ओळख आहे त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी त्यांचा वारसा कायम पुढे ठेवला 2014 ला त्यांची लोकसभा निवड झाल्याने त्यांची पत्नी आणि अमित चव्हाण खासदार आणि आमदार एकाच घरात असूनही अशोक चव्हाण यांना मतदारसंघ याचा जास्त विकास करता आला नाही. अशोक चव्हाण यांनी 2024मध्ये लोकसभा निवडणुकीला भाजप मध्ये प्रवेश केला त्यामूळे येथील काँगेस कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे गणितही बदलले दिसतील.
आठवा विधानसभा मतदारसंघ आहे हदगाव .
हदगाव येथे नागेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. नागेश पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. २०१९  मध्ये नागेश पाटील आष्टीकर आणि माधवराव पाटील यांच्यात लढत झाली होती याच्यामध्ये नागेश पाटील यांनी बाजी मारली होती.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागेश पाटील आष्टीकर उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोली मध्ये निवडून आले
आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा एकदा माधवराव पाटील येथे निवडणूक लढवताना दिसतील परंतु आता ठाकरे काय भूमिका घेतो हे पहाने महत्त्वाचे ठरणार आहे.
शेवटचा मतदारसंघ आहे किनवट
नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदीवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख आहे.  किनवट येथे भीमराव केराम हे  विद्यमान आमदार आहेत. २०१९  पर्यंत प्रदीप नाईक हे तीन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते परंतु २०१९ मध्ये भीमराव के राम यांनी प्रदीप नाईक यांचा पराभव केला. भीमराव के राम हे भाजपचे उमेदवार आहेत. सध्याचे चित्र किनवट येते अशी आहे की भीमराव के राम यांचे कामाकडे दुर्लक्ष झालेले दिसते त्यामुळे मतदार यांच्यावरती नाराज आहेत.  त्यामुळे आता भीमराव कॅरम यांना २०१९  मध्ये पुन्हा एकदा संधी भेटणार का हे पहा महत्त्वाचे ठरणार आहे आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे आणखी काय परिणाम होणार आहे हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद

Leave a Comment