चला तर आज पाहूयात आपण नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हार होणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. येवला, दिंडोरी, नांदगाव, सिन्नर, चांदवड, मालेगाव बाह्य. हे विधान सभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये मोडतात. नाशिक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते परंतु पक्ष फुटी नंतर शरद पवारांनी जास्त लक्ष नाशिक कडे घातले आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकिला शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजेच मशाल यांनी बाजी मारली. नाशिक म्हटलं की पहिला आठवतात ते म्हणजे छगन भुजबळ. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर याच छगन भुजबळ दादा भुसे नरहरी झिरवळ सुभाष कांदे यांचे आमदारकी 2024 ला धोक्यात येणार असल्याचे दिसत आहे .
चला तर पाहूया येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये महायुती बाजी मारते की महाविकास आखाडी सरस ठरते.
नाशिक येथे पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे दिंडोरी.
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ क्रमांक १२२ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिंडोरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. दिंडोरी हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – स. टी च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी सिताराम झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. नरहरी झिरवळ यांनी पक्ष फुटी नंतर अजितदादा पवार यांना साथ देण्याचा ठरविले सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांच्यात सक्रिय आहेत. झिरवळ यांच्या बद्दल बोलायचे झाले तर २००४ पासून ते २०१९ पर्यंत झिरवळ हेच आमदार राहिले आहे. फक्त २०९ मध्ये यांना हार पत्करावी लागली होती. नरहरी जिरवळ हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यावरती नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यामुळेच ते आता अजित दादा पवार यांना सोडून शरद पवार गट यांच्याकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत.
तर दुसरीकडे माजी आमदार धनराज महाले आणि रामदास चोरोस्कर हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी जोरदार तयारी चालू केली आहे परंतु हे दोघेही सारखे पक्ष बदलत असतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या तयारीकडे किती लक्ष देते हेही महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच पक्ष फुटी झाल्यामुळे येथे इच्छुकांची भरपूर गर्दी जमली आहे. त्यामुळे आता इथे नक्की गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरा मतदार संघ येतो तो येवला
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.येवला विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११९ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. येवला तालुका, २. निफाड तालुक्यातील लासलगांव आणि देवगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. येवला हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन चंद्रकांत भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. येवला हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो . सलग पाच टर्म छगन भुजबळ हे येवला येथे आमदार म्हणून निवडून आलेले आहे. चला तर पाहुयात छगन भुजबळ हे नक्की येवल्यामध्ये आले कसे? छगन भुजबळ हे पहिल्यांदा उभे राहिले होते ते मुंबईच्या माजगाव ताडेवाडी येथून परंतु येथे छगन भुजबळ यांचा पराभव झाला. त्यावेळी छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे बाळा नांदगावकर यांच्यात लढत झाली होती आणि बाळा नांदगावकर यांनी छगन भुजबळ यांचा येथे पराभव केला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी येवला या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि ते नाशिक येथील येवला येथून विधानसभा निवडणूक लढवू लागले आणि ते जिंकलेही. इथून पाठीमागील निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात कायम मराठा उमेदवार उभे होते तरीही छगन भुजबळ हे निवडणूक जिंकत होते
परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असं होण्याची चिन्ह कमी दिसत आहेत कारण संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की मराठा आंदोलनाला सर्वात जास्त विरोध केला असेल किंवा मराठा आंदोलनाबद्दल सर्वात जास्त विरोधी बोलले असतील तर ते म्हणजे छगन भुजबळ. या सर्व गोष्टी लक्षात घेता छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीसाठी ही इच्छुक होते परंतु हे सर्व वातावरण पाहून त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्यासाठी येणारे आगामी विधानसभा निवडणूक जड जाईल असेच दिसत आहे. तसेच भुजबळांच्या विरोधात शिवसेनाच इथून लढत देत असल्यानं आघाडीत ठाकरे गटाचे उमेदवार संभाजी पवार यांनाच ही जागा सुटेल, अशी शक्यता आहे.
आता पाहूया तिसरा मतदारसंघ तो म्हणजे सिन्नर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १२० आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिन्नर मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. सिन्नर तालुका आणि २. इगतपुरी तालुक्यातील टाकेद महसूल मंडळ यांचा समावेश होतो. सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर माणिकराव कोकाटे यांनी अजित दादा पवार यांना साथ दिली आहे. तसं पाहिलं तर सिन्नर हा विधानसभा मतदारसंघ नातेगोते आणि जातीवर आधारित असा राजकीय ओळख असणारा मतदारसंघ आहे. २०१९ ला माणिकराव कोकाटे यांनी लोकसभेला अपक्ष निवडणूक लढवली आणि मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती परंतु त्यांचा थोडयाफार फरकाने पराभव झाला होता. परंतु लोकसभेला मिळवलेल्या मतांमुळे त्यांना एक कॉन्फिडन्स आला होता त्यामुळे त्यांनी २०१९ ला विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले परंतु अपक्ष न लढता त्यांनी 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला.
२०१९ मध्ये माणिकराव कोकाटे यांचे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत झाली होती. माणिकराव कोकाटे यांनी लोकसभेचा वचपा विधानसभेमध्ये काढला आणि विधानसभा निवडणूक ते जिंकले. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे हे जिंकून आले आहेत. त्यामुळे असेही बोलले जाते की माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांना मदत केली आहे आणि राजाभाऊ वाजे यांना जिंकून देऊन माणिक राव कोकाटे यांनी आपला विधानसभेचा मार्ग मोकळा केला आहे. परंतु जरी राजाभाऊ वाजे येथून बाजूला झाले असले तरी नवीन चेहरा राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात लढण्यात इच्छुक आहे तो म्हणजे उदय सांगळे.त्यामुळे आता लढत नक्की कोणामध्ये होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे आणि पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे हे बाजी मारतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पाहुयात चौथा मतदारसंघ तो म्हणजे नांदगाव
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११३ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. नांदगाव तालुका आणि २. मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निंबायत), निमगांव आणि कळवाडी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे सुहास द्वारकानाथ कांदे हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये नांदगाव येथे छगन भुजबळ यांची पुत्र पंकज भुजबळ हे आमदार होते परंतु २०१९चे निवडणुकीमध्ये पंकज भुजबळ यांना शह दिला तो म्हणजे शिवसेनेचे सुहास कांदे यांनी.
2019 मध्ये सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांची विरोधात बाजी मारली. छगन भुजबळ यांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव होणे तेवढं सोपं नाही परंतु हा झालेला पराभव पंकज भुजबळ यांच्या जिव्हारी लागला. तर २०२४ मध्ये या विधानसभा ला अजित दादा पवार गड आणि शिंदे गट यांची युती असल्यामुळे आता नक्की ही जागा कोणाला भेटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गट तर पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये आहेत आणि यांची आता युती झाली आहे त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच होणार हे नक्कीच. त्यामुळे आता इथे नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाचवा मतदारसंघ येतो तो चांदवड.
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११८ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चांदवड मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांचा समावेश होतो. चांदवड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे राहुल दौलतराव आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. चांदवड हे देवी रेणुका माता आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कामामुळे ओळखला जातो. राहुल आहेर हे सलग दोन टर्म इथे आमदार राहिले आहेत. चांदवड मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा.
राहुल आहेर यांनी जलयुक्त शिवार, कारखानदारी, विविध विकास कामे यांच्या वरती भर दिले आहे त्यामुळेच हे सलग दोन टर्म येथे आमदार आहेत. राहुल आहेर हे मंत्री दौलतराव आहेर यांचे पुत्र आहेत. राहुल आहेर यांची विरोधात शिरीष कुमार कोतवाल हे कायम प्रयत्नशील राहिले आहेत परंतु राहुल आहेर यांच्या कामामुळे त्यांना चांदवड येथे चांगलीच लीड भेटते. त्यामुळे भाजपा विरुद्ध निगेटिव्ह वातावरण असतानाही राहुल आहेर यांच्या बद्दलचे वातावरण मात्र चांगले आहे त्यामुळे यावेळेसही राहुल आहेर यांना जिंकण्याची जास्त संधी आहे अशा चर्चा आहेत.
सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव बाह्य
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. मालेगाव (बाह्य) विधानसभा मतदारसंघ क्रमांक ११५ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (बाह्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगांव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, २१ ते २५ यांचा समावेश होतो. मालेगाव (बाह्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे दादाजी दगडु भुसे हे मालेगाव (बाह्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मालेगाव बाह्य हा विधानसभा मतदारसंघ हिरे यांचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु २००४ मध्ये या बालेकिल्लाला सुरू लावला तो म्हणजे शिवसेनेचे दादाजी भुसे यांनी. २००४ ते २०१९ असे दादा भुसे आमदार राहिले आहेत. दादा भुसे हे राज्यमंत्रीपद, पालकमंत्री असा कार्यभार सांभाळत आहेत . तसेच दादा भुसे यांनी केलेले काम यांच्यावर मतदार खुश आहेत.
त्यामुळे दादा भुसे हे सध्या सेफ झोन मध्ये आहे अशा चर्चा आहेत तरीही पुन्हा एकदा हिरे यांना संधी भेटणार का असा प्रश्न आहे. तर असे आहे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण. आता नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठे चेहरे असणाऱ्या आमदार केला सुरू लागणार असे चित्र दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद.