प्रतिनिधी – अशोक बडे
ऊस, आले,द्राक्ष यांचे उत्पादन घेणारा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली दत्त देवस्थान औदुंबरपैलवानांचा तालुका म्हणजे पलूस. महाराष्ट्रातील पहिला कुस्ती आखाडा बांबवडे अशी सर्व ओळख असणारा पलूस कडेगांव मतदार संघात राजकीय वर्तुळात काय चाललय याचा ठोक ताळा पाहू.
पलूस कडेगाव मतदार संघाचा आढावा सध्याची स्थिती पाहिली तर काँग्रेसचे विश्वजीत कदम विरुद्ध भाजपकडून संग्राम सिंह देशमुख अशीच लढत होईल अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. आणि जनतेलाही अशीच लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघाच्या इतिहासात डोकावले तर असे दिसून येते की एकेकाळी हा मतदार संघ दुष्काळाने होरपळलेला अशी ओळख होती. 1995 मध्ये स्वर्गवासी पतंगराव कदम यांना पराभूत करून *अपक्ष* लढलेले स्वर्गवासी संपतराव अण्णा देशमुख आमदार झाले. त्यावेळी महायुती सरकारकडून त्यांना मंत्रिपदाची संधी होती. ही संधी त्यांनी नाकारली आणि मंत्रीपदाच्या बदल्यात कडेगाव पलूस साठी टेंभू योजनेची मागणी केली. त्यावेळच्या सरकारने मागणी मान्य केली. 2009 पर्यंत मतदार संघात हिरवी सृष्टी निर्माण झाली. देशमुखांच्या दूरदृष्टीमुळे मतदार संघाचे चित्र बदलले दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम झाला. सामान्यांच्या खिशातील उत्पन्न वाढू लागले. 1996 ला संपतराव अण्णा देशमुख यांचे अकाली निधन झाले. आगामी पोट निवडणुकीत त्यांचे पुतणे श्री पृथ्वीराज देशमुख आमदार झाले. नंतरच्या सण 1999 ते 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकात स्वर्गवासी पतंगराव कदम निवडून आले. मात्र सर्व निवडनुकामध्ये पतंगराव कदम साहेबांना विजयी तेवढा सोपा गेला नव्हता. नेहमी अटीतटीचाच सामना पाहायला मिळाला.
2018 ला पतंगराव कदम साहेबांचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध आमदार झाले. पलूस कडेगांव मतदारसंघाच्या सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत संग्राम देशमुख यांची कणखर तयारी असतानाही शिवसेनेच्या हट्टापायी त्यांना माघार घ्यावी लागली. तत्कालीन शिवसेना उमेदवार संजय विभुते यांना केवळ 9000 मते मिळाली तर नोटाला 20 हजार मते मिळाली. नोटाला मिळालेली मते पाहून विश्वजीत कदम यांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल. विश्वजीत कदमांच्या नेतृत्वातील पाच वर्षात झालेल्या विकास कामाबाबत जनतेत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच्या उलट संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषदेतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असे जनतेतून बोलले जाते. यामध्ये पलूस कडेगाव मतदारसंघातील टेंभू योजने पासून वंचित असणाऱ्या गावांसाठी संग्राम शिवाय देशमुख यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा विशेष महत्त्वाचा आहे. पलूस – कडेगाव मतदार संघात सध्या तरी अटीतटीचा सामना किंवा काटे की टक्कर अशी स्थिती आहे. विधानपरिषद सदस्य श्री अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनीही महाविकास आघाडीकडून उभा रहावे अशी जनतेतून मागणी होत आहे. *मात्र मात्र* महाविकास आघाडीने लाड यांना उमेदवारी न दिल्यास. लाड यांनी दूरदृष्टी असलेले संग्राम देशमुख यांना पाठिंबा द्यावा असे जनतेतून बोलले जात आहे. या लढाईत विश्वजीत कदम अपराजित राहतील की संग्राम देशमुख यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.