पिंपरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Pimpri Vudhansabha Assembly Election


नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडले आहेत आणि आता वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे.  आता सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे विधानसभा निवडणूक. आपल्या तालुक्याचा आमदार कोण होणार आपल्या गावाचा आमदार कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागले आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटी नंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला काय होणार याची उत्सुकता सगळ्यांची सीगेला गेली आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये बऱ्याच जागा रिकाम्या दिसत आहेत त्यामुळे उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या लोकांना आपल्याला एक संधी भेटणार का ही उत्सुकता त्यांना लागून राहिली आहे. आता सर्वजण वाट पाहत आहे ती फक्त कधी एकदा विधानसभा निवडणूक जाहीर होते. परंतु विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच विधानसभा निवडणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात पक्षांनी प्रयत्न चालू केले आहेत. त्यामध्ये पक्ष फुटी नंतर विभागला गेलेल्या पक्षांमधील काही आमदार आता पुन्हा घरवापसी करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. त्यातीलच एक आमदार ते म्हणजे अण्णा बनसोडे. जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत यांनी मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतली व माध्यमांमध्ये त्यांनी विविध विधाने केली ती म्हणजे अजित दादा पवार आणि शरद पवार हे एकत्र आले तर मला खूप आनंद होईल. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मी अजित दादांकडे मागणी करणार आहे की पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाऊयात अशी विधाने केली आहेत अण्णा बनसोडे यांनी. चला तर पाहुयात नक्की पिंपरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये काय चालू आहे?
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ क्रमांक २०६  आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. पिंपरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते १८, ३१ ते ३७, ५२, ५४ ते ५८, ६१ ते ६६. ७४ ते ७९, ८७ ते ९० सीएमई ९९९ यांचा समावेश होतो. पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा दादू बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे हे येथे दोन टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत. 2009 आणि 2019 अशा टर्म हे इथे आमदार म्हणून राहिलेले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा दादू बनसोडे यांनी ऍड. शिवसेनेचे चाबुकस्वार गौतम सुखदेव १९८०८ मतांनी विजयी झाले.
पिंपरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांना साथ दिली. चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला असा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच विकसित भाग या मतदारसंघात येतो. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 72 झोपडपट्ट्या आहेत, यापैकी 50 च्या आसापास याच मतदारसंघात येतात. त्यामुळेच मुस्लीम-दलित बहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचा ही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे. 2009 मध्ये मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे अर्थात युतीचे उमेदवार गजानन बाबर हे विजयी झाले आणि ते खासदार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा स्थानिक असताना देखील मतदारांनी त्यांना नाकारलं.
त्यामुळे 2009 च्या पिंपरी विधानसभेत सर्वांना असेच वाटत होती की आमदारही युतीचाच होईल परंतु झाले उलटेच विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे येथे निवडून आले आणि तिचे उमेदवार अमर साबळे यांचा पराभव झाला. त्यानंतर 2012 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली यात पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून आले. त्यामुळे लोकसभेला युतीला देणारा मतदार विधानसभा आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकू लागलेला दिसू लागला. असे चित्र असल्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सहज निवडून येईल अशी आशा महाविकास आघाडीला होती परंतु 2014 मध्ये पिंपरी ते झाले उलटेच. मतदारांनी 2014 मध्ये काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेत आलेले गौतम चाबुकस्वार यांना आपली मते दिली आणि यांना निवडून दिले त्यामुळे येथे अण्णा बनसोडे यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला येथे लागलेला सुरंग हा 2017 च्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिला. या धक्क्यातून सावरणासाठी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळ खेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी चिंचवड शहर अनेक वर्ष धबधबा राखणारे अजित पवार यांची पुत्र पार्थ पवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना अशा होती की पिंपरी या विधानसभा मतदारसंघातून येथून त्यांना चांगली लीड भेटेल परंतु पार्थ पवार हे 41 हजार 294 मतांनी पिछाडीवर राहिले. आणि पुन्हा एकदा श्रीरंग बारणे हे जिंकून आले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र मतदारांनी पुन्हा एकदा अण्णा बनसोडे यांना मते दिली तेही अशी चर्चा आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांनी आतील गोटातून मदत केली. त्यामुळे येथे पुन्हा एकदा अण्णा बनसोडे यांना जिंकून येण्याची संधी मिळाली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी विधानसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर अण्णा बनसोडे यांनी अजितदादा पवार यांची साथ दिल्यामुळे येथील मतदार अण्णा बनसोडे यांच्या वरती नाराज असल्याचं दिसत आहेत. तसेच मध्यंतरी झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांचे शिवीगाळ करतानाचे ऑडिओ व्हायरल झालेले दिसत आहेत. तसेच अण्णा बनसोडे यांचे पुत्र यांचे सीसीटीव्ही फुटेज या सगळ्यांमुळे अण्णा बनसोडे यांचे इमेज ला मोठा दणका बसलाय त्यात झोपडपट्टी पुनर्वसन चा प्रश्न प्राध्याधिकरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न विधिमंडळातील निष्क्रियता हे सगळं विद्यमान आमदार साहेबांच्या अंगलट येऊ शकतं .
तसेच मध्यंतरी अण्णा बनसोडे हे शिंदे गटातील आमदारांशी संपर्कात असल्याचे चर्चाही रंगल्या होत्या.  त्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्तेही यांच्यावरती नाराज असलेले दिसत आहेत. त्यामुळे आता हा सगळा इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडे साठी मत मागायला जायचं कसं असेही चर्चा चालू आहेत त्यामुळे आता बनसोडे यांची उमेदवारी सध्या रेड झोन मध्ये आलीये. तर आता महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून सीमा सावळे अमित गोरखे रिपब्लिकन पार्टी कडून चंद्रकांता सोनकांबळे असे नावांची चर्चा चालू आहे.  तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून माजी आमदार गौतम चाबुकस्वार ही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महा युती अशी निवडणूक चांगलीच अतिततेची पाहायला मिळणार आहे. तसेच अजित दादा पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी मात्र आता यावेळी नवा पक्ष नवा चेहरा मंत्रिपदावर जाण्याची जास्त शक्यता आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पिंपरी या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

Leave a Comment