प्रेमात अडसर ठरत होता नवरा, पत्नीने असा काढला काटा, पण Google Pay मुळे झाला भांडाफोड.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील रहिवासी आणि पनवेल(जि.रायगड) येथे रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत असणार्या पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची हत्या 1 जानेवारी रोजी करण्यात आली होती.
या हत्येचे मुख्य कारण हे उलगडत नव्हते. परंतु या हत्याचे मुख्य कारण काय आहे हे गुगल पे वरून केलेल्या 24 रुपयांच्या पेमेंट मुळे समजले आहे. विजय चव्हाण हे मूळचे अमळनेर गावचे होते. तर ते पनवेल रेल्वे पोलीस स्टेशन वर कार्यरत होते. ते घनसोली येथे राहत होते. परंतु 31 डिसेंबरच्या रात्री असं त्यांच्यासोबत काय झालं की त्यांचा मृतदेह हा घनसोली रेल्वे मार्गावर पडलेला होता. चला तर पाहूया अवघ्या 24 रुपयांच्या गुगल पे चा पेमेंट करून हत्येचा सुगावा कसा लागला. या हत्यामध्ये सूत्रधार कोण आहे ? आणि विजय चव्हाण यांची हत्या का करण्यात आली?
विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत होते तर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे भूषण ब्राह्मणे यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय यांच्या सोबत ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन केले. त्यानुसार सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. विजय चव्हाण मद्याच्या अमलाखाली गेल्यानंतर ब्राह्मणेने तिथे येऊन रात्री ११.३० च्या सुमारास गळा दाबून त्यांची हत्या केली.
हत्येनंतर, आरोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी १ जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला .यादरम्यान ब्राह्मणे आणि त्यांची पत्नी पूजा रेल्वे ट्रॅकशेजारीच तब्बल चार तास थांबले. सकाळी घणसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकण्यात आला होता. मोटरमनच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवली आणि रेल्वे व वाशी पोलिसांना माहिती दिली, ज्यामुळे मारेकऱ्यांचा तपास सुरू झाला. विजय चव्हाण यांची हत्या झाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. तपासासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. पाच दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले.
विजय चव्हाण यांच्या ‘गुगल पे’ वरून अंडाभुर्जी हातगाडीवर २४ रुपयांचे ऑन लाईन पेमेंट केले असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाण सोबत त्याचा मेव्हणा असल्याचे दिसून आले होते. त्याचा मेव्हणा व पत्नीचा मामेभाऊ याने दारू पाजली. पिल्यानंतर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावरून मेव्हण्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांना केला. विजय चव्हाण यांच्या पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर भूषण ब्रह्मणे यांनी त्यांच्या भावांसोबत मिळून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपींमध्ये पूजा चव्हाण, भूषण ब्रह्मणे (२९), प्रकाश चव्हाण (२३) आणि प्रवीण पनपाटील (२१) यांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व आरोपींना अटक केली आहे.
याबरोबरच प्रकाश आणि चव्हाण यांची पत्नी पूजा यांच्यात फोनवरून वारंवार संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यानंतर प्रकाश राहत असलेल्या द्रोणागिरी येथील इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रकाश रात्री १.३० च्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे दिसले.
पोलिसांनी पत्नी पूजा चव्हाणची चौकशी करून हत्येमागचा उद्देशही जाणून घेतला. पत्नीने सांगितले की, चव्हाण यांच्या व्यसनाधीनतेला ती कंटाळली होती. तसेच ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडेही जात होते. तसेच जवळीक साधत असताना ते कधी कधी हिंसक होऊन मारहाण करत असाही दावा पत्नीने केला. ही बाब प्रियकर ब्राह्मणेला सांगितल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांना संपविण्याचा घाट घातला.
तर मंडळी आज कोणत्याही प्रकारची हत्या केली तरी पोलिसांना त्याचा सुगावा लागतोच.