Site icon

बीड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात अटीचा निवडणूक ठरलेला मतदार संघ म्हणजे बीड मतदार संघ. लोकसभा निवडणुकीत  बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून बजरंग आप्पा सोनवणे हे मैदानात होते . याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आणि ते जिंकले परंतु पंकजा मुंडे का हरल्या ह्यालाही भरपूर फॅक्टर आहेत. चला तर पाहूयात आपण लोकसभा मध्ये पंकजा मुंडे कसे हरले आहेत आणि याचा परिणाम आता विधानसभेवरती काय होणार आहे . मनोज जरांगे यांचे उपोषण चालू होते मराठा आरक्षण आणि ओबीसी असं थोडंसं वातावरण पेटलेलं होतं. त्यातच पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं आणि ते विधान होतं उपोषण करून आरक्षण भेटत नाही ह्याचच परिणाम कुठेतरी लोकसभेला पाहायला मिळाला आणि याची संधी बजरंग सोनवणे यांना भेटली. चला आता पाहू या बीडमध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत .
बीडमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आहेत . दोन मतदारसंघ हे भाजपचे आहेत आणि एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदान मोजण्यात आलं. त्यावेळेस असं निदर्शनास आलं पंकजा मुंडे यांना ज्या ठिकाणी भाजप यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना मते कमी मिळाले आहेत. पंकजा मुंडे यांना सर्वात जास्त मते हे परळी विधानसभा,  आष्टी विधानसभा,  माजलगाव विधानसभा या ठिकाणी जास्त भेटले आणि हे सर्व विधानसभा हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे आहे . चला तर सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ पाहू तो म्हणजे परळी विधानसभा मतदार संघ .परळी या विधान सभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे आहेत.२०१९ मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती .तर इथेही पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागली होती.
 आता ह्या वेळेस  जर पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक जिंकल्या असत्या तर धनंजय मुंडे यांचा मार्ग सोपा झाला असता परंतु आता परळी मधून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत धनंजय मुंडे उभे राहणार की पुन्हा एकदा संधी पंकजाताई यांना भेटणार? कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांची महायुती आहे. त्यामुळे यामध्ये कोणालातरी एकाला जागा भेटणार आहे.  तसे एकंदरीत पाहिलं तर असच दिसून येत आहे की पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना विधानसभेसाठी परळी मधून तिकीट  भेटेल. कारण पंकजा मुंडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही हे जाहीर केले आहे . धनजंय मुंडे यांचं परळीतील पारडं जड असलं तरी शरद पवारांनी त्यांचा उमदेवार येथे दिला तर विधानसभेचा निकालही फिरु शकतो. सध्या महाविकास आघाडीकडून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करतायत.. तर बबन गित्ते यांच्याही नावाची इथं  चर्चा होतेय.
दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई
गेवराई येथे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे आहे लक्ष्मण पवार हे भाजप पक्षाचे आहेत . २०१९  मध्ये लक्ष्मण पवार विरुद्ध विजय शिव पंडित अशी लढत होती . परंतु लक्ष्मण पवार हे २०१९ मध्ये जिंकले होते यावर्षी लक्ष्मण पवार यांना भाजपकडून तिकीट मिळेल परंतु ह्या वेळेस ची गणित थोडीशी वेगळी आहे त्यामुळे लक्ष्मण पवार यांना ही जागा जिंकणे कठीण जाणार आहे . कारण आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंकजाताई मुंडे यांना गेवराई येथून कमी मते भेटली होती.  कारण इथे मराठा आरक्षण फॅक्टर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे लक्ष्मण पवार यांना २०१९ विधानसभा निवडणूक थोड्याफार फरकाने जड जाणार आहे.  महायुतीकडून आमदार लक्ष्मण पवार यांना तिकीट भेटेल परंतु महाविकास आघाडी कडून अजूनही संभाव्य उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे इथेही निवडणूक ह्या वेळेस अतिथटीची होताना दिसणार आहे.
तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ
माजलगाव येथे विद्यमान आमदार हे प्रकाश सोलंके आहेत प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत. २०१९ मध्ये प्रकाश सोळंके यांच्या विरोधात रमेश आडसर अशी लढत होती.  २०१९ मध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय अवघ्या बारा हजार मतांनी झाला होता.  त्यामुळे इथेही अतिथटीची निवडणूक झाली होती.  तसेच आपण पाहिला असेल की प्रकाश सोळंके यांचे मराठा आरक्षणावेळी घर जाळण्याचा प्रकार झाला होता आणि त्याचा काहीसा परिणाम लोकसभेवर जाणवलेला होता. त्यामुळे ह्याच गोष्टीचा परिणाम विधानसभेमध्ये होईल असं वाटत आहे . त्यामुळे यावेळेसप्रकाश सोळंके यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचं दिसत आहे .  तर रमेश आडसकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्यांनी जर का तुतारी वाजवली तर तुतारी चिन्हावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
चला तर पाहुयात आता चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ
आष्टी येथे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची उमेदवार आहेत.  २०१९ मध्ये बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात भीमराव धोंडे अशी लढत झाली होती आणि यामध्ये बाळासाहेब आजबे हे जिंकले होते. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तीस हजार मतांची आघाडी आष्टी विधानसभेनं मिळवून दिली होती. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथून जिंकण्याचे जास्त संधी आहे . तरी तिकीट कुणाला मिळतंय, यावर इथलं गणित अवलंबून असणार आहे कारण इथे सुरेश धस हेही विधानसभेसाठी उत्सुक आहेत अशी चर्चा रंगली आहे
चला तर पाहूया पाचवा विधानसभा मतदारसंघ तो आहे केज .
केज येथे विद्यमान आमदार नमिता मुंदडा या आहेत. नमिता मुंदडा या भाजप पक्षाच्या आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवल होते.  पण  अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नमिता मुंदडा जिंकल्या होत्या. परंतु २०१९  मध्ये सर्व गोष्टी आता बदललेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार नमिता मुंदडा यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवतील तसेच शरद पवार यांच्या सहानुभूतीमुळे पृथ्वीराज साठे यांचे यावेळेस पारडे जड राहण्याची शक्यता आहे.  कारण आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना चांगलीच लीड केज मधून मिळाली आहे. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता असेच दिसत आहे की पृथ्वीराज साठे यांना ही निवडणूक सोपी जाईल.
चला तर पाहूया सहावा मतदारसंघ तो म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ
बीड या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आहेत संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे उमेदवार आहेत. २०१९ मध्ये संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली . संदीप क्षीरसागर यांचा अवघ्या १९९४ मतांनी विजय झाला होता.  परंतु आता २०२४ मध्ये संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे काका पुतण्या एक होतील अशा चर्चा रंगल्या आहेत. तसेच शिरसागर या घराण्याचा पहिल्यापासूनच बीड विधानसभा मतदारसंघावरती वर्चस्व राहिलेला आहे त्यामुळे यावेळेसही संदीप क्षीरसागर हे बाजी मारतील असे दिसून येत आहे . तर २०२४ मध्ये अशा घडामोडी घडत आहेत बीड विधानसभा मतदारसंघात .तुम्हाला काय वाटतं बीड या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा

Exit mobile version