बुलडाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरही बुलडाणा जिल्ह्यात आहे. संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये इथे काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार निवडून आले.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे संजय रामभाऊ गायकवाड ६७, ७८५ मते मिळवून विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे विजय हरिभाऊ शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. बुलढाणा हा महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आणि बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी एक आहे. हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि इतर पाच विधानसभा (विधानसभा) मतदारसंघ आहे, उदा. बुलढाणा , सिंदखेड राजा , मेहकर , खामगाव आणि जळगाव (जामोद) ,बुलढाणा जिल्ह्यातील सातवा मलकापूर हा शेजारच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे बुलढाणा
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २२ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बुलढाणा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मोटाला तालुका आणि बुलढाणा तालुक्यातील पाडाळी, बुलढाणा ग्रामीण ही महसूल मंडळे आणि बुलढाणा नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. बुलढाणा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेना पक्षाचे संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. बुलढाणा तालुका आणि मोताळा तालुका मिळून बुलढाणा विधानसभा मतदारसंघ तयार होतो. बुलढाणा येथे जातीपातीचे राजकारण होतं तसेच उमेदवार कुठल्या भागातला आहे हे पाहिले जाते. २०१४ च्या आधी सलग दोन टर्म शिवसेनेचे विजयराज शिंदे हे बुलढाणा येथे आमदार राहिलेले आहेत . २०१४ मध्ये हर्षवर्धन सपकाळ निवडून आले होते . हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे उमेदवार होते
२०१९ मध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा पराभव झाला कारण त्यावेळेस शिवसेना भाजप युती मोदी लाट आणि वंचित फॅक्टर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम झाला त्यामुळे शिवसेनेचे संजय गायकवाड हे निवडून आले. संजय गायकवाड यांनी शिवसेना फुटी नंतर एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे . तसेच संजय गायकवाड यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे ते अनेक वेळा अडचणीत आले आहेत . तसेच संजय गायकवाड यांनी केलेल्या बंडामुळे कट्टर असलेले शिवसेनेचे शिवसैनिक आज ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं लोकसभा निवडणूक निकालातून दिसून आले आहे. त्यामुळे सध्या तरी संजय गायकवाड यांची आमदार धोक्यात आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. तसेच शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती असल्यामुळे भाजपमधून त्यांच्या आमदारकीला असणाऱ्या विरोध येत्या विधानसभेला अडचणीचा ठरू शकतो . तर विजय शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी मशाल हाती घेतली तर मतदारसंघातील मते ही महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात तर. तर संजय गायकवाड यांचे व्हायरल झालेले मानहानीचे व्हिडिओ तसेच महायुतीतील पक्षांतर मित्र पक्षांना दिलेले आव्हान आणि मराठा आरक्षणावरून निगेटिव्ह मध्ये जाणाऱ्या मतदान एकत्रित करून पाहिलं तर संजय गायकवाड यांना जिंकणं अवघड दिसत आहे. तर महाविकास आघाडी कडून जालिंदर बुधवंत हे शिवसेना ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी भेटण्याची शक्यता जास्त आहे तसेच डॉक्टर मधुसूदन सावळे ही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे तसंच काँग्रेस कडून जयश्रीताई शेळके यांची इच्छा आमदारकीला लढण्याची आहे त्यामुळे आता बुलढाणा मध्ये नक्की ही जागा कोणाला सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तसेच महाविकास आघाडी ह्याचा तिढा कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ तो म्हणजे मलकापूर मतदारसंघ
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २१ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मलकापूर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजेश पंडितराव एकाडे हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून मलकापूरची ओळख आहे. मलकापूर हे भाजपचं बालेकिल्ला मानला जायचा कारण 1995 पासून २०१९ पर्यंत आमदार चैनसुख संचेती हे निवडणूक लढत आले आहे आणि ते जिंकतही आले आहेत त्यांना हरवणे काँग्रेससाठी कठीण होते. काँग्रेसने येथील जागा जिंकण्यासाठी या अगोदरही भरपूर प्रयोग केले होते. परंतु काँग्रेसला फारसे इथे मिळालं नव्हते. परंतु २०१९ मध्ये काँग्रेस स्वतःची जागा येथे निवडून आणण्यासाठी यशस्वी ठरले . २०१९ ला भाजप लाट असताना देखील तसेच संचेती यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी फडवणीस अभिनेता गोविंदा असे मैदानात उतरले होते . परंतु मलकापूर येथील जनतेने २०१९ मध्ये राजेश एकडे यांना निवडून दिले आणि पंचवीस वर्षात पहिल्यांदाच नांदूर येथील असणारे राजेश इकडे यांना विधानसभेचे प्रतिनिधित्व करायला भेटले. त्यामुळे आता पुन्हा २०२४ मध्ये भाजप आपला गड खेचण्यासाठी प्रयत्न करेल . परंतु काँग्रेसही आता इथून पुढे स्वतःचा बालेकिल्ला बनवण्यासाठी जास्त प्रयत्नशील राहील. २०२४मध्ये राजेश एकडे यांना स्वतःचा विजय टिकून ठेवता येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चिखली
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. चिखली विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिखली मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक ही महसूल मंडळे आणि चिखली तालुक्यातील उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली, हटणी, कोलारा ही महसूल मंडळे आणि चिखली नगरपालिका यांचा समावेश होतो. चिखली हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले ह्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे श्वेता विद्याधर महाले ९३ हजार ५१५ मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे बोंद्रे राहुल सिद्धविनायक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
श्वेता महाले या ६८१० एवढ्या मताच्या फरकाने २०१९ मध्ये निवडून आल्या.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बोंद्रे राहुल सिद्धविनायक ६१५८१ मते मिळवून विजयी झाले. २०१९ पर्यंत चिखली हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून मानला जायचा परंतु २०१९ मध्ये काँग्रेसला चिखलीमध्ये सुरू लागला आणि २०१९ मध्ये प्रथमच भाजपने चिखली येथे कमल फुलवले. २००९ आणि २०१४ मध्ये भाजपच्या अंतर्गत बंडामुळे राहुल बोंद्रे हे सलाम दोन टर्म इथे आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ ला हे असेच वाटत होती की पुन्हा एकदा राहुल बोंद्रे हेच निवडून येतील परंतु भाजपची लाट आणि तूपकरांनी बंदरांच्या विरोधात आघाडी घेतल्यामुळे राहुल बोंद्रे यांचा पराभव झाला. २००४ नंतर प्रथमच भाजपला येथे यश आले. श्वेता महाले यांनी विविध प्रश्नांवर आंदोलन केली आहे तसेच विज बिल माफी ट्रान्सफॉर्मर आणि लोड शेडिंग मुळे त्रस्त असलेल्या न्याय देणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे यामुळे त्यांनी सतत सरकारचे लक्ष वेधले तसेच त्यांनी करोना काळात अकोला आणि बुलढाण्यात लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. करोना काळात ग्रामीण भागातील गरोदर महिलांना त्यांनी डाळिंब चिकू केळी पपई असे पॅकेट घरपोच पुरवले त्यामुळे श्वेता महाले या लोकप्रिय आमदार ठरल्या. त्यामुळे २०२४ मध्ये ही श्वेता महाले यांचे पार्ट जड दिसत आहे. तर महाविकास आघाडी कडून २०२४ मध्ये ही पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला जिंकण्यासाठी चांगलेच प्रयत्न करताना दिसतील. २०२४ मध्ये भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यात लढत होताना दिसेल. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतःचा बालेकिल्ला जिंकणार की पुन्हा एकदा भाजप येथे बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो सिंदखेड राजा
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २४ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिंदखेड राजा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगांव राजा आणि सिंदखेड राजा ही दोन तालुके, चिखली तालुक्यातील मेरा महसूल मंडळ आणि लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो. सिंदखेड राजा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी सिंदखेड राजा याची ओळख आहे . २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे ८१७०१ मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे डॉ. खेडेकर शशिकांत नरसिंगराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अवघ्या ८९३८ मतांच्या फरकाने जिंकून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे डॉ. खेडेकर शशिकांत नरसिंगराव ६४२३ मते मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित दादा पवार यांना साथ दिली. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघड गोष्ट झाली आहे ती म्हणजे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची. कारण शिवसेना फुटी नंतर शशिकांत खेडेकर यांनी शिवसेना शिंदे यांची साथ दिली त्यामुळे ते महायुतीत आले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर अजितदादा पवार यांना साथ देत राजेंद्र सिंगने हेही महायुतीमध्ये आले त्यामुळे आता सिंदखेडराजा येथील जागा नक्की कोणाला सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे परंतु तसे पाहिले तर सर्वात जास्त चान्सेस हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना येथील जागा सुटेल असे वाटत आहे.
शशिकांत खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शशिकांत खेडकर यांना असेच वाटत आहे की आता राजेंद्रसिंगने यांनी बंडखोरी करून पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे जावे जेणेकरून शशिकांत खेडकर यांची वाट मोकळी होईल. कारण तसेही अजित पवार गट यांचे आमदार पुन्हा एकदा परतीच्या वाटेवर आहेत अशा भरपूर चर्चा आहेत त्यामुळे पहिला नंबर हा राजेंद्रसिंग ने यांचा असावा असेच शशिकांत खेडेकर यांना वाटत आहे. त्यामुळे आता राजेंद्रसिंग ने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात प्रवेश करणार का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तसेच सिंदखेडराजाची जागा माहितीमध्ये कोणाला मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता पुढचं विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मेहकर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २५ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मेहकर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील सुलतानपूर, टिटवी, लोणार ही महसूल मंडळे आणि लोणार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. मेहकर हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. शिवसेना पक्षाचे संजय भास्कर रायमुलकर हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचे संजय भास्कर रायमुलकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनंत सखाराम वानखेडे यांचा ६२२०२ मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली.
२०१९ मध्ये मेहकर मतदारसंघातील निवडणूक शिवसेना व काँग्रेस अशी दुरंगी होती. या लढतीमध्ये शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा, तर काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. दुहेरी लढतीतही रायमुलकर यांनी आपला गड कायम ठेवला आहे. मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी १ लाख १२ हजार ३८ मतं मिळविली होती. तर काँग्रेसचे अॅड. अनंत वानेखेडे यांना ४९ हजार ८३६ मतांवर पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी ८० हजार ८६१ मते घेऊन त्यावेळी काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला होता.
शिवसेना फुटी नंतर संजय रायमुलकर यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ दिली आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक केला ही जागा कोणासाठी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि यावर्षीही शिवसेना शिंदे गट स्वतःचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढचा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव जामोद
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ क्रमांक २७ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव (जामोद) मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगांव (जामोद) ही दोन तालुके आणि शेगाव तालुक्यातील मानसगाव, शेगांव ही महसूल मंडळे आणि शेगांव नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव (जामोद) हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्ष पक्षाचे संजय श्रीराम कुटे हे जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. या मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे आहेत. २०१४ मध्ये बीबीएम पक्षाच्या बाळासाहेब तायडे यांचा ५९१९३ मतांनी पराभव झाला होता. २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे कुटे डॉ. संजय श्रीराम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ. स्वाती संदीप वाकेकर यांचा ३५२३१ मतांनी पराभव करून जागा जिंकली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा (खासदार) जागेवरून शिवसेनेचे नरेंद्र दगडू खेडेकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा २९४७९ मतांनी पराभव करून विजय मिळवला. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये असेच दिसत आहे की डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांचे पारडे जड राहणार आहे. कारण येथील मतदारांनी महायुतीला लोकसभेमध्ये विजयी करून दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही पुन्हा एकदा महायुतीला मते मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे खामगाव
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६ आहे . लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खामगांव मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुका आणि शेगांव तालुक्यातील जळंब, पहूरजिरा, माटरगांव ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो. खामगांव हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्ष पक्षाचे आकाश पांडुरंग फुंडकर पाटील हे खामगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. खामगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भावनिक वक्तव्यांना मतदारांनी प्रतिसाद देत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला खामगाव विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आकाश फुंडकर यांच्या स्वाधीन केला. २०१९ मध्ये, भारतीय जनता पक्षाचे आकाश पांडुरंग फुंडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश यांचा १६९६८ मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा (खासदार) जागेवरून शिवसेनेचे नरेंद्र दगडू खेडेकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा २९४७९ मतांनी पराभव करून विजय मिळवला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता असेच वाटत आहे की आकाश पांडुरंग फुंडकर यांचे पारडे जड राहणार आहे आणि ते पुन्हा एकदा तिसरी टर्म जिंकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर सध्या अशी आहे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ यांची स्थिती.
तर मंडळी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार हे तुम्ही कमेंट करून सांगा .