विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसात राजकीय समीकरण बदलले आहेत तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेले या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भंडारा जिल्ह्याची ओळख ही नेते मंडळींचा जिल्हा अशी आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल अशा नेतेमंडळींचा हा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. साकोली, भंडारा आणि तुमसर असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा क्षेत्रात साकोली येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भंडाऱ्यात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर तुमसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे हे आमदार आहेत.
भंडारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. महाविकास आघाडीला भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचे आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये येथे चुरशीची लढत पाहायला भेटणार आहे. कारण भंडारा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक आणि काँग्रेस पक्ष एक आमदार असे उमेदवार इथे आहेत. चला तर पाहूया मग भंडारा जिल्ह्यामध्ये नक्की काटो की टक्कर कोणांमध्ये होणार आहे.
भंडारा जिल्ह्यामधील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघ .भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहर हा तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भंडारा या जिल्ह्यातील प्रमुख शहर असल्यामुळे जिल्ह्याची सर्व प्रमुख मुख्यालये याच शहरातच आहेत. भंडारा विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६१ आहे. भंडारा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील भंडारा व पवनी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. भंडारा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. शिवसेना शिंदे गट पक्षाचे नरेंद्र भोजराज भोंडेकर हे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष पक्षाचे नरेंद्र भोजराज भोंडेकर एक लाख एक हजार 717 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे अरविंद मनोहर भालाधारे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 23,677 मते. एवढे होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अवसरे रामचंद्र पुनाजी 83,408 मते मिळवून विजयी झाले. बसपा पक्षाचे गाढवे देवांगाना विजय यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 36,832 मते एवढे होते. भंडारा विधानसभा मतदारसंघ येथे 2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र लढले होते तर शिवसेना व भाजप हे महायुती मधील पक्ष एकत्र लढले होते. 2019 मध्ये अपक्ष म्हणून नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते . ते आता सध्या शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडून आले आहेत
डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवली होती. तब्बल पंचवीस वर्षानंतर भंडारा येथे काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे आता याचा परिणाम येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवरती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीकडून विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नाव जवळपास फिक्स आहे. परंतु इथे महाविकास आघाडी कडून ही जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार यावरून कोणत्या उमेदवाराला येथे तिकीट भेटणार हे ठरणार आहे . त्यामुळे ही जागा नक्की कोणत्या पक्षाला भेटणार हे पहाने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली दिसत आहे. त्यामुळे आता भंडारा या विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र भोंडेकर निवडून येणार की येथे महाविकास आघाडीचा उमेदवार याला संधी भेटणार हे पहाने महत्त्वाचे ठरणार आहे . तर मंडळी तुम्हाला काय वाटते भंडारा येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.
आता पाहुयात दुसरे विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे साकोली
साकोली विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६२ हा आहे . साकोली मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश होतो. साकोली हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ फाल्गुनराव पटोले हे साकोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्याविरुद्ध भाजप पक्षाचे परिणय फुके अशी लढत झाली होती. काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले 95,208 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे डॉ.परिणय रमेश फुके यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 6,240 मते. एवढी होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काशीवर राजेश लाहानू 80,902 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे सेवकभाऊ निर्धान वाघाये यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 25,489 मते. एवढी होती.
2009 मध्ये नाना पटोले या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. पण 2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी भाजपविरोधात बंड पुकारलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला. साकोली मतदारसंघातील साकोली, लाखानी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांपैकी लाखांदूर हा नाना पटोलेंचा प्रभाव असणारा तालुका मानला जातो. या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलं असून उद्योगांचं फारसं अस्तित्त्वं नाही. साकोली विधानसभा मतदारसंघावर गेली अनेक वर्षं भाजपने आपला वरचस्मा राखलेला होता. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांचे उमेदवारी जवळपास इथून फिक्स आहे. परंतु महायुतीकडून येते भाजप पक्षाकडून पुन्हा एकदा परिणय फुके यांना संधी देणार की येथील स्थानिक असणारा नवीन चेहऱ्याला माहिती संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं साकोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.
आता पाहुयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तुमसर. तुमसर विधानसभा मतदारसंघ क्रमांक ६०आहे . तुमसर मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. तुमसर हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू माणिकराव कारेमोरे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तुमसर विधानसभेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा 7,700 पराभव केला होता. या निवडणुकीत राजू कारेमोरे यांना 87,190 मते मिळाली होती. तुमसर विधानसभा मतदारसंघात धान्य उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. आंतरराज्यीय बावनथडी धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. गेल्या २३ वर्षांपासून १५ पेक्षा गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. विरोधक या प्रश्नावरून नेहमीच आक्रमक दिसतात. तर ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असला तरी या भागात गेल्या पाच वर्षात पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातील बेरोजगार तरुण दरवर्षी मोठ्या शहराकडे पलायन करत असल्याचं दिसतं. त्यामुळे आज या विधानसभा क्षेत्रात विविध योजना राबविल्या गेल्या असल्या तरी अजूनही अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. भारतीय जनता पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या तुमसर – मोहाडी विधानसभा मतदारसंघाचं १९९५ ते २००९ पर्यंत भाजप आमदार म्हणून मधुकर कुकडे यांनी सलग १५ वर्षे नेतृत्व केलं.. मात्र २००९ मध्ये मधुकर कुकडे यांना काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी पराभूत केलं . मात्र २०१४ साली पुन्हा तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या चरण वाघमारेंनी जिंकला. या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोट्यात येणार असून याठिकाणी राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
याठिकाणी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनीही दावेदारी केली असून काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी मागील काही दिवसांपासून विधानसभा क्षेत्रात मतदारांपर्यंत पोहोचून काँग्रेसचा अजेंडा समजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच येथे इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे असल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राहणार आहे. त्यामुळे साकोली, भंडारा आणि तुमसर या विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत होणार आहे. तर मंडळी असा आहे भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा लेखाजोखा. तर मंडळी भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार व्हावा असा तुम्हाला वाटते या मला कमेंट्स करून कळवा.