पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी रंगणार आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झालेली आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत ही उत्सुकता अधिक ताणली गेलेली आहे. त्यामूळे आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोसरी या विधानसभा मतदारसंघात नेमके काय खलबत्ते चालू आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ क्रमांक २०७ हा आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. भोसरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते १२, १९ ते ३०, ५९, ६०, ८० ते ८६ यांचा समावेश होतो.
भोसरी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे महेश (दादा) किसन लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ. हा पिंपरी-चिंचवडमधील शहरी भागामधला एक विधानसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमधील हा सर्वाधिक लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ आहे. महेश लांडगे यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात त्यांचे पारडे जड आहे. 2009 मध्ये हवेली विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र भोसरी विधानसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आला. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या भोसरीचे पहिले आमदार होण्याचा मान विलास लांडे यांना मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसने 2009 मध्ये मंगला कदम यांना तिकीट दिल्याने विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते भोसरी मधून निवडून आले. 2014 मध्ये विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून तिकीट देण्यात आले परंतु महेश लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले. 2014 मध्ये अपक्ष उमेदवार महेश लांडगे हे जिंकून आले. त्यामुळे सलम दोन टर्म अपक्ष आमदार म्हणून उमेदवार निवडून येत होते त्यामुळे भोसरी येथे अपक्ष उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ अशी ओळख बनू लागली होती. परंतु 2014 नंतर महेश लांडगे यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून महेश लांडगे यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा अपक्ष म्हणून विलास लांडे यांच्या मध्ये लढत झाली. परंतु 2019 मध्ये मतदारांनी आपला कौल महेश लांडगे यांना दिला. त्यामुळे महेश लांडगे हे जिंकून आले आणि त्यांनी भोसरी हा विधानसभा अपक्ष उमेदवारांना निवडून देतो अशी ओळख थोडी पुसटशी केली. महेश लांडगे यांनी त्यानंतर बैलगाडा शर्यत कुस्ती स्पर्धा तसेच त्यांनी केलेले आंदोलन विविध कार्यक्रम याचा एक ठराविक मतदार या मतदारसंघांमध्ये तयार होऊ लागला. त्यामुळेच त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला चांगले तगडे लीड दिल्याचं पाहिला भेटलं. परंतु आता ह्या सर्व गोष्टी घडत असताना महाविकास आघाडीतील शरद पवार गप्प बसतील ते शरद पवार कसले ? शरद पवारांनी 2024 ला भोसरी विधानसभा ही महाविकास आघाडीकडे कसा खेचून आणायचा यासाठी एक खेळ खेळले आहे. अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी आपण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
कारण भोसरीतून अजित दादा पवार गटातील अजित गव्हाणे हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे परंतु अजित पवार गट हा सध्या महायुतीत असल्यामुळे अजित गव्हाणे यांना समजले होते की विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे तिकीट भाजप पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये कापणार नाहीत. त्यामुळे अजित गव्हाणे यांना महायुतीत राहून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करताना जवळपास पंधराहून अधिक नगरसेवक सोबत नेले आहेत त्यामुळे अजित गव्हाणे यांची ताकद मोठी आहे हे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. तसेच विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाही पद्धतीमुळे भाजप आणि इतर पक्षातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचेही अजित गव्हाणे यांचं म्हणणं आहे. शिवाय गेली दोन टर्म म्हणजे दहा वर्ष महेश लांडगे हे भोसरी मध्ये आमदार आहेत परंतु भोसरीमध्ये पाहिजे तेवढे सुविधा किंवा कुठल्याही सुधारणा झाल्या नसल्याचे अजित गव्हाणे यांचे म्हणणे आहे.
परंतु आता या सर्व गोष्टींमध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट हेही दावा करण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये येथे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. तसेच रवी लांडगे यांनी या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवारांनी जशी खेळी खेळली आहे तशीच खेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट हे खेळत असताना दिसत आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचे नाव महाविकास आघाडी कडून सर्वाधिक चर्चेत येऊ लागले आहे. रवी लांडगे यांनी दोन अडीच वर्षांपूर्वीच भाजपला सोडचिट्टी दिली आहे परंतु त्यांनी अजून कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नव्हता परंतु ते आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत त्यांनी भोसरी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे.त्यामुळे आता पुन्हा एकदा भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडे रवी लांडगे यांच्यासारखा दुसरा तुल्यबळ उमेदवार नाही असे चर्चा रंगल्या आहेत.
कारण भोसरीत महाविकास आघाडीने रवी लांडगे यांच्याशिवाय अन्य कोणताही उमेदवार दिला तर भाजप सोबत फक्त लढत पाहायला भेटेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहे. येथे पाहिजे तशी अतिततेची लढत होणार नाही अशा चर्चा आहेत. त्यामुळे आता भोसरी या विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कारण महायुतीकडून महेश लांडगे हे उमेदवार फिक्स आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून अजित गव्हाणे तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून रवी लांडगे हे इच्छुक आहेत. त्यामुळे आता येथे महाविकास आघाडीमध्ये भोसरी ही जागा नक्की कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आता महाविकास आघाडीमध्ये एक उमेदवार द्यायचा म्हणजे अजित गव्हाणे यांची ताकद मोठी की रवी लांडगे यांची ताकद मोठी हे पक्ष पाहूनच त्यानंतरच उमेदवार येथे दिला जाईल. तसेच इथे आता एक शक्यताही निर्माण होत आहे ती म्हणजे जर महाविकास आघाडी कडून अजित गव्हाणे किंवा रवी लांडगे यापैकी एकाला तिकीट भेटले तर यातील एक जण पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढू शकतो. सहाजिकच त्याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही बसणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून नक्की कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचा असा प्रश्न महाविकास आघाडी यांना पडला आहे. त्यामुळे आता भोसरी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी मधील नेमका कोणत्या पक्षाला भेटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्यानुसार येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातील एका उमेदवाराला येथे तिकीट भेटेल. परंतु येथे जर महाविकास आघाडीने एकत्र येऊन काम केले तर भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा पराभव करणे महाविकास आघाडीला सोपे जाईल. कारण जर भोसरी येथे अजित गव्हाणे आणि रवी लांडगे यांनी एकत्र येऊन काम केले तर याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल अशा चर्चा आता रंगू लागले आहेत. तर महेश लांडगे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले विलास लांडे हे अजूनही अजित पवार गटात आहेत. महायुतीत अजित पवारांच्या प्रवेशानंतर तेथे अनेक गणित बदललेले आहेत अनेक भाजप अजित पवारांवर नाराज असल्याचे उघडपणे बोलले जात. परंतु कट्टर विरोधक असताना एकमेकांशी जुळवून घेण्याची किमया मागील काही वर्षात लांडगे आणि लांडे यांना करावी लागले आहे. मात्र निवडणुकीच्या आधी विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करतील किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करतील असे चर्चा तेथील कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच आता अजित गव्हाणे यांच्या व्यतिरिक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सुलभा उबाळे, रवी लांडगे हेही येथे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून येथे कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्यामुळे आता भोसरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये तुम्हाला कोण आमदार व्हावा असं वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.