Site icon

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गेम कोण करतय? एकनाथ शिंदे यांना महायुती मधूनच डावलण्यात येत आहे का?


महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गेम कोण करतय? एकनाथ शिंदे यांना महायुती मधूनच डावलण्यात येत आहे का?
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरून थेट उपमुख्यमंत्री पदावर आलेल्या एकनाथ शिंदे यांना सत्तेतील मित्र पक्षांकडूनच अडचणी येत असल्याची चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणं बदलली असून, त्याचा फटका शिंदेंना बसत असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेनंतर राजकीय समिकरणं इतकी बदलली आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें राजकारणातून बाहेर फेकले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
त्यात आणखी भर पडत आहे ती म्हणजे पालकमंत्रीपद, जनता दरबार ते शिवसेनेतला ‘नवा उदय’अशा चर्चांनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर शिंदे यांचा नाराजीचा सूर सातत्याने चर्चेत राहिला.
तसेच एकनाथ शिंदे नाराज असले की ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरेगावला जातात अशा देखिल चर्चा रंगल्या.
तसेच एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या, संपर्क होत नाही, या चर्चांदरम्यानच गिरीश महाजन थेट त्यांच्या घरी जाऊन भेटले.
त्यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांचं समाधान झालं का, हा प्रश्न कायम राहिला.
 मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना फारसं महत्त्व मिळालं नाही.
 शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना संधी दिली नाही, गृहमंत्रीपद फडणवीसांकडेच राहिलं, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातंही भाजपने स्वतःकडेच ठेवलं.
 रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्णी लागली, आणि शिंदेंच्या उमेदवाराचा पत्ता कट झाला.
यामुळे आता एकनाथ शिंदे यांना महायुती मधूनच विरोध होत आहे का असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे.
 तसेच एकनाथ शिंदे यांना पाठीमागे खेचण्याचा देखील प्रयत्न हा माहिती मधूनच होत आहे का असा देखील प्रश्न पडत आहे.
चला तर एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत महायुतीमध्ये असूनही कोणत्या गोष्टी घडत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
चला तर मग मुद्दाच बोलूया
मुद्दा क्रमांक १) एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात फारसं महत्त्व मिळालं नाही का?
एकनाथ शिंदे यांनी प्रथम आपल्याला एक वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी केली होती.
परंतु ही मागणी भाजपने फेटाळली होती.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात गृहखात्याची मागणी केली होती.
परंतु गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले.
तर एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम) हे खाते दिले.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना गृह खाते दिले नाही म्हणुन ते नाराज होते.
मुद्दा क्रमांक २) एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात नवीन उदय होणार का?
उद्योग मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दावोस दौऱ्यावर गेले होते.
त्यावेळी विरोधकांनी शिंदे शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार अशी विधाने केली होती.
कारण एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीपासूनच नाराज होते.
तसेच एकनाथ शिंदे यांना गृह खाते देण्यात आले नाही म्हणून देखील ते नाराज होते.
तसेच उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.
कारण त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहे.
तसेच उदय सामंत यांची इतर राजकीय लोकांशी देखील चांगले संबंध आहेत.
त्यामुळे एकनाथ शिंदे तयार झाले नाही तर त्यांच्या जागेवर उदय सामंत यांना तयार करायचे.
तसेच उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचे देखील चर्चा झाली होती.
त्यामुळे एकंदरीतच शिवसेना एकनाथ शिंदे गटात नवीन उदय होणार का या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.
तसेच काल कॅबिनेट बैठक पार पडली यामध्ये एकनाथ शिंदे हे ऑनलाईन हजर होते.
यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
कारण एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे प्रत्येक ठिकाणी मागे का आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
मुद्दा क्रमांक ३) एकनाथ शिंदे गटाला दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदावरून देखील डावललं
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला पालकमंत्री पद हे रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे हवे होते.
ज्यावेळी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली त्यावेळी रायगडचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. तर नाशिक येथील पालकमंत्री पद हे भाजप पक्षाचे गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटातील भरत गोगावले यांचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले होते.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली.
कारण रायगड येथील पालकमंत्री पद हे शिवसेना एकनाथ शिंदे गटातील भरत गोगावले यांना पाहिजे होते.
तर नाशिक येथील पालकमंत्री पद आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटातील दादा भुसे यांना पाहिजे होते.
परंतु या दोन्ही ठिकाणची पालकमंत्री पद हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाले नाहीत त्यामुळे देखील एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
तर अजूनही नाशिक आणि रायगड या ठिकाणी कोणत्या गटाचे पालकमंत्री असतील हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही.
त्यामुळे आता येथील पालकमंत्री पद नक्की शिवसेना एकनाथ शिंदे गटाला भेटणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भेटणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यातच अजित पवार यांनी मंत्रालयात ठाण मांडला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली.
मात्र रायगडच्या शिवसेनेच्या दोन आमदारांना आणि एका मंत्र्याला भेट दिली नाही. शिंदेंवर दबाव वाढवण्यासाठीच हा नवा राजकीय डाव असल्याचं बोललं जातंय. यामुळे शिंदेंभोवतीचा तणाव वाढत आहे.
मुद्दा क्रमांक ४) भाजपचे जेष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक मध्ये ठाणे येथे भाजप शिंदे यांना आव्हान देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण ठाणे महापालिका आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाण्याची जबाबदारी भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्या खांद्यावर सोपवली आहे .
ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा नाईक यांनी मंगळवारी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील कार्यक्रमात नाईक यांनी ही घोषणा केल्याने ठाण्यात नाईक विरूध्द शिंदे असा सामना रंगणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
शिंदेसेनेकडून आगामी सर्वच निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले जात आहेत.
परंतु, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आता मंत्री नाईक यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे.
कारण नाईक आणि शिंदे यांचे यापूर्वीदेखील पटले नव्हते.
लोकसभा निवडणुकीत नाईक यांनी शिंदे यांच्या विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही नाईक यांच्या विरोधात ऐरोली मतदारसंघात अपक्ष म्हणून शिंदेसेनेचे विजय चौगुले हे रिंगणात उतरविण्यात आले होते.
 परंतु, शिंदेसेनेने चौगुले यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली नाही. त्यामुळे नाईक नाराज झाले.
तसेच ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे व नाईक यांच्यात रस्सीखेच होती.
अखेर पालघर जिल्ह्याची जबाबदारी नाईक यांच्यावर सोपविण्यात आली.
ठाण्यातील सत्काराच्या कार्यक्रमात नाईक यांनी आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल आणि ठाणे महापालिकेवर कमळ फुलवेल, असे जाहीर केले.
त्यासाठीच ठाण्याची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार घेण्याची घोषणा करून त्यांनी शिंदे यांनाच थेट आव्हान दिले.
शिंदे सेना आणि भाजप पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
तर एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीला उत्तर देत म्हटले महायुतीमधील प्रत्येक मंत्री हे जनतेसमोर जात आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने एखादा मंत्री काही करत असेल तर त्यात काहीच वावगे नाही.
भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतला, तर शिंदेसेनेचे मंत्री पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा. असे वक्तव्य ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केले आहे.
त्यामुळे या सर्व गोष्टींवरून एकंदरीत असं वाटत आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी महायुतीमध्ये एकमेकांविरुद्ध धुसपुस चालु आहे.
तसेच भाजपने ठाण्यात वेगळीच खेळी सुरू केल्यामुळे आता हे वाद किती वाढतात आणि शिंदे त्यातून कसे बाहेर पडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर मंडळी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे का असे तुम्हाला वाटते का हे आम्हाला कमेंट्स करून कळवा .

Exit mobile version