सप्तरंगचा 38 वर्धापन दिन 13 ऑक्टोबरला होणार साजरा

अहिल्यानगर –  येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. अरूण कदम हे मागील 45 वर्षांपासून महाराष्ट्राच्या हौशी संगभूमीवर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत आहेत.

सदर पुरस्कार रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सायं 5 वा. अहमदनगर येथील यश ग्रॅड हॉटेलच्या सभगृहामध्ये सप्तरंग थिएटर्सच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सप्तरंग महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे व संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रातील हौशी नाट्यक्षेत्रात 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी कार्यरत असलेल्या एकाच व्यक्तीला मसप्तरंग नाट्यगौरव पुरस्कारफ देण्यात येतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव किंवा शिफारसी मागविल्या जात नाहीत. अहमदनगर जिल्ह्याबाहेरील नाट्यकलावंतास हा पुरस्कार देण्यात येतो. विश्वस्त मंडळाकडून बहुमताने पुरस्कार्थीची निवड करण्यात येते.

अरूण कदम हे बृहन्मुबंई महानगर पालिकेतून कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी जागतिक रंगभूमीच्या इतिहासावर ‘नाटक – नाटक’ नावाचा ग्रंथ लिहीला आहे. त्यांना आजतागायत मराठी व हिंदी भाषेत 80 हून अधिक नाटके करण्याचा अनुभव आहे. हौशी नाट्यसृष्टीत लेखक, नेपथ्यकार, प्रकाश योजना आणि अभिनेता म्हणुन गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मटा सन्मान, झी गौरव पुरस्कार व रोटरी क्लब ऑफ इंडिया तर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त झाला आहे. महापालिकेच्या कलावंतांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मनवंतर कला अकदामी’चे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी राज्य भरात होत असलेल्या शासनाच्या व विविध संस्थांच्या नाट्य स्पर्धांचे परिक्षण केले आहे.
या निमित्ताने संस्थेच्या 38 वर्षांच्या वाटचालीची माहिती देणार्‍या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त कलाकारांनी प्रशिक्षण व अभिनयाचे धडे घेतले आहेत. आज पर्यंत मराठी, हिंदी व बाल राज्यनाट्य स्पर्धांमध्ये संस्थेला 170 हून अधिक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
सप्तरंगच्या या वर्धापन दिन समारंभ प्रसंगी नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व विविध ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेल्या कलावंतांच्या सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे यांनी दिली. या समारंभात अहमदनगरच्या नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे असे अवाहन सप्तरंगच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी केले आहे.

 


By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *