रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Ratnagiri Jilha Assembly Election


आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे काय वातावरण आहे. रत्नागिरी हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहे आणि एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे. चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन शिवसेना शिंदे गट आणि उरलेले दोन शिवसेना ठाकरे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस एक विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिले तर पाचही विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड हे शिवसेना ठाकरे गट यांना मिळालेले दिसते. शिवसेना मध्ये जरी फूट पडले असली तरी रत्नागिरी येथील शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे असे दिसत. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे. चला तर मग पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचे पारडे जड राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे दापोली  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. दापोली विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६३ आहे. दापोली मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली ही दोन तालुके आणि खेड तालुक्यातील भरणे, आंबवली, खेड ही महसूल मंडळे आणि खेड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दापोली हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे योगेशदादा रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. योगेश कदम हे रामदास कदम यांचे पुत्र आहेत. योगेश कदम यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ दिली आहे. 1990 मध्ये सूर्यकांत दळवी हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर 2014 पर्यंत सूर्यकांत दळवी हे शिवसेनेचे आमदार येथे निवडून येत होते. परंतु 2014 मध्ये शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय कदम अशी लढत झाली आणि यामध्ये राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली.
परंतु राष्ट्रवादीला 2019 नंतरही हा विजय टिकवता आला नाही. 2019 मध्ये शिवसेनेचे रामदास कदम यांची पुत्र योगेश कदम यांचे विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय कदम अशी लढत झाली. योगेश कदम यांनी मागील निवडणुकीमध्ये बाजी मारली. दापोली विधानसभा मतदारांनी तरुण उमेदवाराला पसंती दिली. या तरुण असलेल्या उमेदवाराने दापोली  मतदारांचे स्वप्नही पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्यामध्ये त्यांनी गावाचे रस्ते पिण्याचे पाणी या योजनेचे काम केली. त्यामुळे दापोली येथील मतदार सध्यातरी योगेश कदम यांच्यावर खुश आहे असं म्हणायला अवघड ठरणार नाही.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता दापोली येथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळेल. तर योगेश कदम यांच्या विरुद्ध संजय कदम अशी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दापोली मध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट यांना चांगल्या लीड मिळाले आहे. त्यामुळे योगेश कदम यांना ही निवडणूक फारशी सोपी जाणार नाही.
आता पाहुयात दुसरे विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रत्नागिरी
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ  क्रमांक २६६ आहे. रत्नागिरी मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका आणि संगमेश्वर तालुक्यातील मामळे महसूल मंडळाचा समावेश होतो. रत्नागिरी हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे उदय रविंद्र सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उदय सामंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुदेश सदानंद मयेकर अशी लढत होती.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उदय रवींद्र सामंत 1,18,484 मते मिळवून विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुदेश मयेकर यांना 87 हजार 335 मते मिळाली.
उदय सामंत हे 2004 आणि 2009 या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोन टर्म आमदार झाले. परंतु 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उदय रवींद्र सामंत 93,876 मते मिळवून विजयी झाले. 2014 नंतर रत्नागिरी मध्ये शिवसेना वाढण्यात उदय सामंत यांचा मोठा हात आहे.  2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्या सामंत जिंकून येण्यासाठी यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अण्णा सामंत यांचा खूप मोठा हात आहे. कारण किरण  सामंत आणि अण्णा सामंत यांचा तगडा जनसंपर्क आहे.
परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी या विधानसभा मतदारसंघांमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगलीच लीड मिळाली आहे. त्यामुळे असेही चर्चा रंगले आहेत की उदय सामंत यांना आता यांच्यात घरातून विरोध होताना दिसून येत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बॅनरबाजी हे प्रकरणही समोर आले होते. त्यावेळेस हे असं बोलले गेले होते की उदय सामंत यांचे बॅनर त्यांचे बंधू यांनीच काढून टाकले आहेत. उदय सामंत हे स्वतः बदलाच्या काळात कॅबिनेट मंत्री पदावर होते. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उदय बने प्रदीप बंड्या साळवी तसेच राजेंद्र महाडिक यांची नावे उमेदवारीसाठी समोर आलेले आहेत हे सर्व झाले तरीही सध्या तरी उदय सामंत यांचे पारडे जड राहणार आहे.
आता पाहुयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लांजा -राजापूर  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६७ आहे. राजापूर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा ही दोन तालुके आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. राजापूर हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.
शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राजापूर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असे म्हणायला आता हरकत  नाही.  कारण सलग तीन टर्म इथे शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजन साळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत
शिवसेना फुटी नंतरही राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नाहीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे ठरवले आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांच्याविरुद्ध शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी अशी लढत झाली होती. यामध्ये राजन साळवी यांनी बाजी मारली. परंतु  2019 च्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांना मिळालेली मतं ही लक्षणीय होती. शिवाय कुणबी समाजाची मतं देखील निर्णायक ठरणार आहेत.
आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजन साळवी यांच्या बद्दल बोलायचे झाले तर राजापूर येथे यांच्या बद्दल नाराजीचा सूर आहे. मतदारसंघातील लोकांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना त्यांची आमदार म्हणून असणारी हजेरी मात्र त्यांच्याकरता प्लस पॉईंट आहे. पण, त्यांच्याकडून ठोस अशी कामं झाली आणि त्याबद्दल लोकांचं समाधान असं दिसून येत नाही. याकडे दुर्लक्ष केलं तरी राजकीय स्थितीचा अंदाज घेताना काँग्रेसला यापूर्वीच्या निवडणुकीत मिळालेली मतं आणि त्यांच्या मागे असलेली लोकं यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
 सध्या अविनाश लाड या ठिकाणी काही प्रमाणात का असेनात सक्रिय दिसून येतात.  मतदारसंघात  राजन साळवी यांच्याबद्दल नाराजीचा सूर जाणवतो. त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी असेल असं अजिबात म्हणता येणार नाही. सध्या शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे आता राजापूर विधानसभेची जागा नक्की कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यावरूनच येथे राजन साळवी यांना पुन्हा एकदा संधी भेटणार की अविनाश लाड यांना महाविकास आघाडी कडून तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात चौथा मतदारसंघ तो म्हणजे गुहागर
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ क्रमंक २६४ आहे. गुहागर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील १. गुहागर तालुका, २. खेड तालुक्यातील शिरसी, लावेल, धामानंद ही महसूल मंडळे आणि ३. चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरावटे, वाहाळ ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गुहागर हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2019 मध्ये शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेटकर सहदेव देवजी यांचा 26451 मतांनी पराभव करून जागा जिंकली. भास्कर जाधव हे शिवसेना फुटी नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार आहेत.  त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा भास्कर जाधव यांना तिकीट मिळण्याची संधी आहे. तर माहिती कडून भाजप तर्फे विनय नातू यांचे नाव चर्चेत आहे परंतु विनय नातू हे पाहिजे तेवढे सक्रिय दिसत नाहीयेत.
तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता येथे उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे येथे भास्कर जाधव विधानसभा निवडणुकीमध्ये लीड भेटणार का हाही प्रश्न आहे. परंतु भास्कर जाधव यांनी केलेली कामगिरी तसेच महाविकास आघाडी यांच्यासाठी असलेली सहानुभूती हे भास्कर जाधव यांना फायद्याचे ठरू शकते.
आता पाहुयात पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चिपळूण
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६५ आहे .चिपळूण मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्याच्या १. चिपळूण तालुक्यातील कलकवणे, शिरगांव, सावर्डे, चिपळूण ही महसूल मंडळे आणि चिपळूण नगरपालिका क्षेत्र आणि २. संगमेश्वर तालुक्यातील माखजन, कडवाई, फणसवणे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवरूख आणि आंगवली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.
चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम हे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. चिपळूण हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा.
परंतु 2019 विधानसभा निवडणुकी वेळी चिपळूण विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिंकले. शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम विरुद्ध शिवसेनेचे सदानंद चव्हाण अशी लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम यांनी बाजी मारली. तर 2019 नंतर सदानंद चव्हाण हे चिपळूण येथे फारसे सक्रिय दिसत नाहीयेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम हे घराघरात पोहोचले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे पाहिजे तेवढा तगडा उमेदवार नाही असे म्हणायला हरकत नाही तसेच शेखर निकम यांचे पाय चिपळूण मध्ये खोलवर आहेत त्यामुळे त्यांचा पराभव करणे येथे महाविकास आघाडीला तरी अवघड जाणार आहे त्यामुळे चिपळूण येथे सध्यातरी शेखर निकम यांचे पारडे जड राहणार आहे.
असा हा लेखाजोखा आहे रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघाबद्दल तर मंडळी तुम्हाला काय वाटते या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

Leave a Comment