नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडून आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गणपती उत्सव. विधानसभा निवडणूक ह्या काही महिन्यांवर येऊन ठेपले आहेत. आज आपण पाहणार आहोत कोकण येथील विधानसभा मतदारसंघ तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ.
राजापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६७ आहे. राजापूर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा ही दोन तालुके आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. राजापूर हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी हे याच मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आले आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा त्यांनी निसटता पराभव करून राजन साळवी पुन्हा एकदा निवडून आले होते.परंतु आता येणारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा राजन साळवी यांचे नाव चर्चेत आहे परंतु आता या जागेसाठी आता काँग्रेस पक्ष येथे दावा करत आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस मधील अविनाश लाड यांना ही येणारी आगामी विधानसभा निवडणूक ही लढवायचीच आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेस पक्षाने राजन साळवी यांच्यावरती नाराजी दाखवले आहे.
त्यामुळे आता राजापूर लांजा ही जागा आपल्याकडे हवी असा हट्ट काँग्रेस पक्षाने केला आहे. तसेच राजापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आणि रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तरीदेखील राजापूर या मतदारसंघावर ती महायुती मधून भाजप या पक्षाने येथे दावा केला आहे. तरी देखील किरण सावंत यांनी भेटीगाठी तसेच पक्षप्रवेश कार्यक्रम हे चालूच ठेवले आहे. परंतु भाजपने केलेल्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गटांमध्ये येथे अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदार संघातून किरण सामंत यांचे नाव चर्चेत होते मात्र महायुतीमधील नेत्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी नारायण राणे यांचे नाव जाहीर केलं आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आणि राणे खासदारही झाले. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महायुतीला फटका बसला आहे.
येथे शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्रमांक एकची मत मिळाले आहे. तर किरण सावंत यांनी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बरीच तयारी चालू केली आहे. किरण सामंत हे राजापूर लांजा येथे दौरे करून येथील प्रश्न समजून घेत आहे तसेच विकास कामांसाठी हे पाठपुरावा करत आहे. किरण सामंत यांनी काही पूल पाटबंधारे रस्ते यांसारखे विकासाची कामे मंजूर केले आहेत. किरण सामंत यांनी सांगितले आहे की महायुतीतून मला जर तिकीट मिळाले तर मी नक्कीच जिंकून येईल त्यामुळे येथे मला तिकीट मिळावा यासाठी मी तयारी करत आहे. तर महाविकास आघाडी बद्दल बोलायचं झालं तर येथे सलग तीन टर्म आमदार राहिल्यानंतर आता चौथ्या टर्म साठी सज्ज असलेले राजन साळवी यांचे नाव चर्चेत आहे परंतु महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव ठाकरे यांची जागा असलेले राजापूर विधानसभा मतदारसंघ येथे मात्र काँग्रेस पक्ष दावा करत आहे.
काँग्रेस पक्षाकडून अविनाश लाड हे इथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. अविनाश लाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेस पक्ष हे राजन साळवे यांच्या वरती नाराज आहे कारण संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे रिफायनरी प्रकल्पाच्या विषयात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या बदलत्या भूमिकेवर सर्वजण जाहीरपणे भाष्य करत आहेत. तर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठमान आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची या भूमिकेवरती सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून नक्की ही जागा कोणाला सुटणार आणि राजन साळवे यांना पुन्हा एकदा संधी भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच महायुतीकडून शिवसेना शिंदे गट यांना ही जागा भेटणार का व किरण सावंत यांचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी असा आहे राजापूर लांजा येथील येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचा लेखाजोखा. तर मंडळी राजापूर लांजा येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.