राहुरी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जगभर प्रसिद्ध आहे. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. आज आपण पाहणार आहोत राहुरी येथे सध्याचे स्थितीला राजकीय चित्र काय आहे ? येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राहुरी येथे शिवाजीराव कर्डिले यांना जिंकण्याची संधी भेटणार का? प्राजक्त तनपुरे यांना दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी भेटणार का? राहुरी मध्ये राजकीय वातावरण सध्या कसे आहे? तसेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटी आणि शिवसेना फुटीमुळे राहुरी येथे काय बदल होणार? राहुरी मध्ये यावेळी शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये लढत रंगणार का? सुजय विखे नेमक्या कोणता मतदार संघात उभे राहणार ? या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आज आपण पाहणार आहोत.
राहुरी विधानसभा मतदारसंघ क्रमांक 223 आहे. राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या १. राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका २. अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ ३. पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना साथ दिली आहे. २०१९ मध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. त्यावेळीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे १,०९, २३४ मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे कर्डिले शिवाजी भानुदास यांचा २३,३२६ मतांनी पराभूत झाले होते. २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजप विरूद्ध शिवसेनेमध्ये अटीतटीचा सामना झाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे शिवाजी भानुदास कर्डिले ९१,४५४ मतांनी विजयी झाले होते. शिवसेना पक्षाच्या डॉ. उषाप्रसाद तनपुरे यांचा २५,६७६ मतांनी पराभव झाला होता. राहुरी येथे कायम तनपुरे घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. बाबुराव तनपुरे, प्रसाद तनपुरे आणि प्राजक्त तनपुरे अशी तिसरी पिढी सध्या राहुरी विधानसभेवर वर्चस्व गाजवत आहे. तनपुरे या कुटुंबियांना 2009 मध्ये चांगलाच धक्का बसला.
2009 मध्ये राहुरी या मतदारसंघाचे नव्याने पुनर्रचना झाली. राहुरी नगर पाथर्डी अशा तीन तालुक्यातील काही गावांचा मिळून राहुरी विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यावेळी प्रसाद तनपुरे यांनी नवीन जोडणाऱ्या गावांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे 2009 मध्ये प्रसाद तनपुरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2009 मध्ये भाजपकडून शिवाजीराव कर्डिले तर शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे हे निवडणूक रिंगणात होते. परंतु मतदारसंघ बदलल्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांना त्यांच्या नात्यागोत्यांचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांना शिवसेना आणि भाजप युतीची साथ मिळाली त्यामुळे कर्डिले यांचा 2009 मध्ये विजय झाला. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना तसेच सर्वच पक्ष युती न करता लढल्याने भाजपकडून शिवाजीराव कर्डिले तर शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या पत्नी उषा तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. 2014 मध्ये राहुरी येथे चौरंगी लढत झाली त्यामुळे येथे मत विभागणी झाली. या मत विभागणी चा फायदा शिवाजीराव कर्डिले यांना झाला. आणि 2014 मध्ये शिवाजीराव कर्डिले हे दुसऱ्यांदा आमदार झाले.
सलग दोन वेळेस झालेला पराभव हा मात्र तनपुरे यांना कुठेतरी बॅक फुटला घेऊन गेला होता. 2019 मध्ये मात्र तनपुरे यांनी जोरदार तयारी केली आणि ते पुन्हा एकदा जोमाने राहुरी या विधानसभा मतदारसंघांमधून 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातात बांधून मैदानात उतरले. सलग दोन टर्म पराभव झाल्याचा वचपा भरून काढायचा या जोमाने त्यांनी तयारी केली. 2019 मध्ये ही भाजपकडून शिवाजीराव कर्डिले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करत स्वतःचा गड पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. यामुळे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची हॅट्रिक करण्याचे स्वप्न अधुरेच राहून गेले. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राहुरी येथे पुन्हा एकदा भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे. परंतु महायुतीमध्ये अजित पवार गट यांचाही समावेश असल्यामुळे अजित पवार गट राहुरी या जागेवरती दावा करताना दिसत आहेत. कारण राहुरी येथे अजित पवार यांचा मोठा गोतावळा आहे.
तसेच राहुरी येथे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सुजय विखे हेही इच्छुक असल्याचे बोलले जात होते. परंतु सुजय विखे यांनी त्यांचा निर्णय बदलून त्यांना विधानसभा निवडणुकीची आता संगमनेर मधूनच लढायचे आहे असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजपकडून तरी शिवाजीराव कर्डिले यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु आता अजित पवार गट याबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे स्वतःचा उमेदवार उभा करणार की भाजप पक्षाचे उमेदवाराला मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुरी येथे निलेश लंके यांना पाहिजे तेवढे लीड मिळाले नाही. परंतु राहुरी येथे प्राजक्त तनपुरे यांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात निलेश लंके यांच्यासाठी प्रचार केला होता. राहुरी या विधानसभा मतदारसंघातील गावांचे विभाजन हे दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये होतं. एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर आणि दुसऱ्या लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी. त्यामुळे राहुरी तालुक्यातील गावांची लोकसभा निवडणुकीला मतांची विभागणी होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगले लीड मिळाले नसले तरीही विधानसभा निवडणुकीला चित्र मात्र वेगळं पाहिला भेटू शकते. तसेच शिवाजीराव कर्डिले यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली असल्याने मतदार संघात नवीन चर्चा रंगल्या आहेत. त्यामूळे शिवाजीराव कर्डिले हे भाजप कडून लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटात प्रवेश करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे मतदार संघातील काम चांगले आहे. तरी सुद्धा 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले. आणि प्राजक्त तनपुरे यांना संधी दिली. त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद ही मिळाले त्यांनी मंत्रीपदाचा योग्य वापर करून मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली.
प्राजक्त तनपुरे यांची राजकारण आणि सामाजिक जीवनात स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे त्यांचे विधानसभेच्या सभागृहातील बोलणे अगदी सुसंस्कृत होते . म्हणूनच राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने २०२३-२४ सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारासाठी प्राजक्त तनपुरे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला. राहुरीच्या मतदारांचा सध्याचा मूड पाहता प्राजक्त दादा तनपुरे यांनाच पसंती राहील असे दिसते. मात्र लोकसभेतील मतदारांनी घेतलेली भूमिका विसरून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत राहुरी मतदार संघातून भाजपला 11936 मताची आघाडी मिळालेली आहे. मिरी गटातील आणि वांबोरी गट, राहुरी शहर या भागातील मतदार कोणती भूमिका घेतात यावर राहुरी मतदार संघाचा आमदार ठरतो हा 2009 पासूनचा इतिहास आहे. जयंत पाटील आणि अजित दादा पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे 2014 मध्ये तनपुरे यांची तिकीट कट करण्यात आले होते. अजित दादा यांच्यामुळे 2014 ला तनपुरे यांची जागी शिवाजी गाडे यांना तिकीट दिले होते.तेव्हा तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर नाराज होते परंतु ते आता राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी शरद पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी फुटीनंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या मतदानावर परिणाम दिसणार आहे. तसेच अजित दादा प्राजक्त तनपुरे यांच्याविरुद्ध कोणते षडयंत्र वापरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी राहुरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राजक्त तनपुरे आता कशी फिल्डिंग लावणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी एकंदरीत वातावरण पाहता राहुरी येथे प्राजक्त तनपुरे यांचे पारडे जड दिसत आहे. परंतु राहुरी येथे सध्या नवीन नावाची चर्चा आहे तो म्हणजे रामचंद्र ऊर्फ राजू शेटे.
राहुरी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहणार अशा चर्चा भाजपच्या गटात आहेत. त्यामुळे राजू शेटे हे अपक्ष म्हणून उभे राहिले तर याचा परिणाम प्राजक्त तनपुरे यांच्या मतांवरती होणार आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आता येणारे आगामी विधानसभा निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्राजक्त तनपुरे यांच्याविरुद्ध भाजपचे शिवाजी कर्डिले तसेच अपक्ष म्हणून राजू शेटे अशी तिहेरी निवडणूकीची रंगत पहायला मिळू शकते. तर मंडळी राहुरी या विधानसभा मतदारसंघ येथील मतदारसंघाचा लेखाजोखा. तर मंडळी राहुरी येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा.