लाडकी बहिण योजना Update
डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पैशांकडे महिलांचे लक्ष आहे. या योजनेत काही महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचसोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचसोबत पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतल असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *