वाल्मीक कराड याचा दोनदा विवाह ज्योती जाधव दुसरी बायको
वाल्मीक कराड याचा दोनदा विवाह झाला असून त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर पुणे परिसरात मोठी संपत्ती असल्याचे समजते. त्याचबरोबर या ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती जाधवच्या नावावर पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये दोन आणि खराडी इथं एक फ्लॅट आहे. ज्योती जाधवला वाल्मीक कराडपासून दोन मुलं झाली असून त्यांच्या नावावरही संपत्ती खरेदी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला वाल्मीक कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहण्यास होता, असंही सांगितलं जात आहे. पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये सेक्टर आर 21, टॉवर 33, 17 वा मजल्यावर 7 नंबरचा एक फ्लॅट, तर आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा दुसरा फ्लॅट आणि Gera Greensville , फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी देखील करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड सुरूवातीच्या दिवसात ज्योती जाधवकडे राहायला होता, अशीही माहिती समोर आली होती.