वाशिम जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


  1. जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव आहे. काँग्रेसचे सुरेश इंगळे वगळता मागील 25 वर्षापासून हा मतदारसंघ भाजपचा गड राहिला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या 4 वरुन 3 करण्यात आली.  पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करुन नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला.  पूर्वापार कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात 2 वेळा भाजपचे विजयराव जाधव यांनी प्रतिनिधित्व केले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त तीन विधानसभा मतदारसंघ येतात.  रिसोड कारंजा आणि वाशिम यातील मतदारसंघांचा समावेश वाशिम जिल्ह्यामध्ये होतो. वाशिम जिल्हा राजकारणासाठी गुंतागुंतीचा आहे असं बोललं जातं वाशिम येथे भाजपचे दोन तर काँग्रेसचे एक आमदार असे वाशिम जिल्ह्यामध्ये येतात.
चला तर पाहुयात पहिला विधानसभा मतदारसंघ वाशिम
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  वाशिम विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३४ आहे. वाशिम मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि वाशिम ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो.  वाशिम मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर आणि वाशिम नगर पालिकांपैकी वाशिम शिवसेनेकडे तर, मंगरुळपीर भारिप बहुजन महासंघाकडे आहे. या दोन शहरांमध्ये सध्या रस्त्याची कामे झाली आहेत.  मात्र, औद्योगिक वसाहत, मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना, तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.  या दोन तालुक्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. वाशिम हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – एस . सी च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाचे लखन सहदेव मलिक हे वाशिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. लखन सहदेव मलिक हे सलग चार टर्म आमदार राहिलेले आहेत.  सर्वात कमी शिक्षण म्हणून लखन मलिक यांची ओळख आहे . वाशिम हा विधानसभा मतदारसंघ १९९० पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु १९९० मध्ये वाशिमला सुरुंग लागला.  १९९०मध्ये भाजपकडून लखन मलिक यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आमदार भीमराव कांबळे अशी लढत झाली आणि इथे भीमराव कांबळे यांचा फक्त ३९०७ मतांनी पराभव झाला .त्यानंतर सलग तीन टर्म येथे भाजपचे वर्चस्व राहिले.
परंतु इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळाल्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवारांकडे पाहिले जायचं.  परंतु दहा वर्षानंतर लखन मलिक हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि २००४  ची निवडणुकीसाठी त्यांनी भरपूर काम केले.  २००४  मध्ये त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून तिकीट मिळेल अशा वरती त्यांनी ही सर्व कामे केले परंतु भाजपने त्यांना तिकीट नाकारले. आणि मोतीराम तूपसंडे यांना त्यांनी उमेदवारी दिली.  याचा राग लखन मलिक यांनी मनात ठेवून भाजपची बंडखोरी केली आणि त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याची ठरवली आणि येथे लखन मलिक २००४ साली  जिंकून आले.  हे सर्व पाहता भाजपने २००९  मध्ये लखन मालिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित केली.  २००९  मध्ये लखन मलिक यांनी बाजी मारली. यानंतर २०१४ आणि २०१४  या विधानसभा निवडणुकांमध्ये लखन मलिक यांनी बाजी मारली त्यामुळे आता ते सलग चार टर्म आमदार आहेत.  परंतु लखन मलिक यांची ओळख सर्वात कमी शिक्षण अशी आहे त्यामुळे येथे वाशिम या विधानसभा मतदारसंघाचा विकास फारसा झालेला दिसत नाही.  परंतु लखन मलिक हे सहज जनमानसात मिसळतात आणि अत्यंत साधी राहणे आणि उच्च विचारसरणी या सर्व गोष्टींमुळे लखन मलिक हे पुन्हा पुन्हा जिंकून येतात.  येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लखन मलिक यांच्या विरोधात शशिकांत पेंढारकर बहुजन वंचित आघाडीचे सिद्धार्थ देवळे व काँग्रेसच्या रजनी राठोड यांचे आव्हान असणार आहे. परंतु साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सर्व गोष्टींमुळे पुन्हा एकदा लखन मलिक यांच्याच पारडे येथे जड दिसत आहे.
आता पाहू या  दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कारंजा या मतदारसंघात मराठा 40 टक्के, मुस्लिम आणि दलित प्रत्येकी 10 टक्के मतदान आहे.  तसेच या मतदारसंघातील मानोरा कारंजा तालुक्यात बंजारा समाजाचेही प्राबल्य आहे.  एकूण मतदानापैकी तब्बल 18 टक्के मतदान बंजारा समाजाचे आहे.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  कारंजा विधानसभा मतदारसंघ  क्रमांक ३५ आहे. कारंजा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राजेंद्र पाटणे हे सलग दोन वेळा भाजपचे निवडून आलेले आमदार होते.  राजेंद्र पाटणे यांचे गेल्या काही महिन्यांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे कारंजा विधानसभा मतदारसंघ तसा आता रिक्त झालाय. राजेंद्र पाटणी यांचे निधनामुळे भाजप या पक्षामध्ये आता इच्छुकां ची संख्या वाढू लागली आहे. राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणे यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे तर येथे अमोल पाटणकर यांचाही सहभाग जास्त वाढला आहे. अमोल पाटणकर हे देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यालयात अप्पर सचिव म्हणून काम करतात ते त्यांचे विश्वासूही आहेत असं मानले जाते.  तर कारंजा या विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवार सोडून मतदारसंघ बाहेरील उमेदवार आमदार म्हणून निवडून येतात अशी खासियत आहे.  तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्येही या जागेसाठी चांगली रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी शिवसेना आणि भाजप अशी महायुती असल्यामुळे येथील जागेवर भाजप दावा करायचा परंतु 2024 मध्ये या जागेवर शिवसेनाही दावा करू शकते अशा चर्चा आहेत. तर शिवसेना फुटीमुळे येथील मतदान नाराज असल्याचेही बोलले जात आहे.  तर येथील दलित आणि बंजारा समाजाची मते तसेच लोकसभेचा निकाल हे पाहता येथे महाविकास आघाडीची जिंकण्याची संधी वाढलेली दिसत आहे. विकासाच्या संदर्भात मात्र, हा मतदारसंघ मागासलेला आहे.  कारंजा शहरातील पुरातन वेशींची डागडुजी हा जिव्हाळ्याचा व प्रलंबीत प्रश्न आहे.  या मतदारसंघात आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, ग्रामीण भागात सिंचनाच्या सुविधा अत्यल्प आहेत.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रिसोड
वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो.  2014 च्या लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत ‘मोदी लाट’ थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखली होती. अमित झनक हे 12 हजार मतांनी विजयी झाले होते. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  रिसोड विधानसभा मतदारसंघ  क्रमांक ३३ आहे.  रिसोड मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मालेगांव आणि रिसोड ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित सुभाषराव झनक हे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. रिसोड हा प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला असं बोललं जातं . रिसोड ची या अगोदर अनेक नावे बदलण्यात आले आहे त्यामध्ये गोवर्धना मेडशी आणि 2019 च्या पुन्हा रचनेनंतर रिसोड असं नाव देण्यात आलेला आहे. रिसोड मध्ये राजकीय वर्चस्व हे जनक या कुटुंबाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. रामराव झनक सुभाष झनक आणि त्याच्यानंतर आता आमदार अमित झनक असे सलग तीन पिढ्या येथे आमदार म्हणून जिंकून आलेले आहेत. तर रिसोड येथे काँग्रेस पक्ष अंतर्गतही बरेच वाद आहेत.  ते म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक या कुटुंबीयाचे वाद सर्वांनाच माहित आहे.
 अनंतराव देशमुख यांनी जनक या कुटुंबांना बराच वेळा आव्हान देण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो प्रयत्न फेल ठरला.  त्यानंतर शेवटी स्वतःच्या भविष्यासाठी अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून अमित झनक यांचे नाव कन्फर्म आहे असं बोललं जातं. तर भाजपकडून भरपूर इच्छुक आहेत परंतु त्यामध्ये अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल देशमुख यांच्या नावाची ही चर्चा आहे. त्यामुळे येणारी आगामी विधानसभा निवडणूक रिसोड येथे अतिठटीची पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही. तर झनक या कुटुंबाकडे खूप वर्ष सत्ता हातात असूनही यांनी मात्र रिसोड मध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला दिसत नाही. येथील रस्त्यांची अवस्था तर खूपच खराब आहे तसेच ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे त्यामुळे यावेळी इथे काँग्रेसला ही निवडणूक जड जाईल असे दिसत आहे. तर मित्रांनो असा आहे छोटासा हा वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील हे तीन विधानसभा मतदारसंघ तर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

Leave a Comment