तो ‘अनलकी बंगला’ एकाही मंत्र्याला नको?, रामटेकचा काय आहे इतिहास?
मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला.. सी फेसिंग. या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षांपर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची. पण भुजबळांना तुरुंगवास झाला आणि खडसेंचं मंत्रिपद गेल्याने आता ‘रामटेक’ म्हटलं की मंत्री कानावर हात ठेवू लागले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर बंगल्याचे वाटप झाले आहे.
 या बंगले वाटपावरुन शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
 कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले गेले आहे.
महायुती सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीनंतर सर्वात ज्येष्ठ ठरलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे.
परंतु रामटेक बंगल्याचा इतिहास पहिल्यास बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत आहे
. गेल्या काही वर्षांमध्ये रामटेक बंगला ज्या मंत्र्यांना मिळाला, त्यांचे भवितव्य काय झाले? ही चर्चा आता सुरु झाली आहे.
महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्र्यांसाठी बंगल्यांचे नुकतेच वाटप झाले आहे. पण या सगळ्यात मलबार हिल येथे असलेल्या ‘रामटेक’ बंगल्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
कारण या बंगल्याचा ताबा घेण्यास कोणीही तयार नसल्याचं समजतं आहे.
कारण अनेक मंत्री हा बंगला ‘अनलकी’ समजतात.
सामान्य प्रशासनाकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार रामटेक हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत त्यांना देण्यात आला आहे.
चला तर पाहूया रामटेक बंगल्याचा इतिहास काय आहे आणि हा बंगला अनलकी का समजला जातो?
चला तर पाहूया रामटेकच्या बंगल्याचा इतिहास काय आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे त्याला का नाकारत आहे?
1975 च्या आणीबाणीनंतर ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई गंभीर आजारी होते.
या काळात त्यांचं वास्तव्य शरद पवारांच्या याच रामटेक बंगल्यात होतं.
दलवाईंनी मृत्यूनंतर आपलं दफन नव्हे तर दहन करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली.
 पण इस्लाममध्ये पार्थिवाचं दहन करण्यास मनाई आहे.
 त्यामुळे शरद पवारांना हमीद दलवाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या वादाचा सामना करावा लागला.
 त्या काळातही पवारांचं वास्तव्य रामटेकमध्येच होतं..
 1978 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले.
त्यांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदची स्थापना केली.
दादांचं सरकार पाडणार नाही, म्हणता म्हणता पवारांनी याच रामटेक बंगल्यातून सरकारला धक्का लावला आणि त्यावेळीही रामटेक बंगला चर्चेत होता.
त्यामुळेच रामटेक बंगला लाभतो, अशी धारणा तयार झाली.
1995 साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेल्या गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला.
 याच काळात मुंडेंचे एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला.
ज्यावरुन आख्ख्या राज्यात राळ उडाली आणि मुख्यमंत्री असलेल्या जोशी सरांसोबतचं शीतयुद्ध मुंडेंना चार वर्ष पुरलं.
त्यांनतर काँग्रेस,-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला होता.
यावेळी मंत्री असताना तेलगी घोटाळा समोर आला होता. या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळांवर काही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता
त्यांनतर सत्ता गेल्यानंतर भुजबळांची जागा एकनाथ खडसेंनी घेतली.
 मुख्यमंत्र्यांनंतर खडसेच सरकारमधील वजनदार मंत्री होते.
भाजप-शिवसेना 2014 मधील सरकारच्या काळात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता.
पण दीड वर्षातच खडसेंच्या मागेही भ्रष्टाचाराचे आरोप लागले.
खडसेंनी यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण रामटेक खडसेंचं मंत्रिपद खाऊनच शांत झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंनी अगदी काहीच दिवसांपूर्वी रामटेकवर वास्तूशास्त्राची पूजाही घातली होती, पण त्याचा फायदा काही झाला नाही.
यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यानंतर त्यांना आतापर्यंत पुन्हा मंत्री होता आलं नाही.
पुन्हा छगन भुजबळ  2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या सरकारमध्ये भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले. पण भुजबळ मंत्री असलेले महविकास आघाडी सरकार अडीच वर्षांत पडले. त्यामुळे भुजबळांना रामटेक बंगला सोडावा लागला. तर यावेळेस त्यांना कोणतेच मंत्रीपद मिळाले नाही.
मागील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले दीपक केसरकर यांना हा बंगला मिळाला होता.
 दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असतानाच केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमवावे लागले आहे. कारण फडणवीस मंत्रिमंडळातून त्यांचे नाव वगळण्यात आले.
खरंतर शरद पवारांनंतर रामटेक कुणाला लाभला? हा संशोधनाचाच विषय आहे. तरीही रामटेकसाठी मंत्र्यांचा आग्रह मात्र कायम आहे. पण खडसेंचं मंत्रिपद गेल्यानंतर भाजपमधील मंत्री रामटेकच्या रेसमध्ये आमचं नाव चालवू नका, म्हणून आग्रह करु लागले आहेत. अर्थात अशा शुभ-अशुभावर विश्वास ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
पण सूत्रांच्या माहितीनुसार, पंकजा मुंडे या मात्र ‘रामटेक’ बंगला घेण्यास तयार आहेत. कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना याच बंगल्यात राहत होते. त्यामुळेच या बंगल्याशी पंकजा यांचे भावनिक नाते असल्याचे बोलले जात आहे.
रामटेक बंगला हा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असून अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे. मात्र असं असलं तरीही या बंगल्यात राहणारे मंत्री एकतर भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकतात किंवा पुन्हा मंत्री होऊ शकत नाहीत, असे बोलले जाते.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *