Site icon

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 35 उमेदवार फिक्स? Uddahv thakrey Shivsena list


नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आता वाऱ्या होऊ लागले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे. यामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्ष, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे मिळून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. तसेच आता शिवसेना उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीसाठी 110 जागा तर काँग्रेस पक्षाला शंभर जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना 70 जागा वाटप करण्याचे चर्चा चालू आहेत. चला तर पाहुयात मग उद्धव ठाकरे गटाचे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवार फिक्स झाले आहेत. चला तर पाहुयात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार फिक्स करण्यात आले आहेत
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सध्यातरी 35 उमेदवार फिक्स असल्याचे बोलले जात आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून आलेले आमदार राजन साळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राजन साळवी हे सलग तीन टर्म निवडून आलेले आमदार आहेत त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून राजापूर या विधानसभा मतदारसंघासाठी राजन साळवी यांचे नाव फिक्स आहे. धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील यांना 2024 मध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून तिकीट मिळेल.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले सुनील प्रभू यांना उद्धव ठाकरे गटाकडून आता तिसरी टर्म आमदार होण्यासाठी उमेदवारी दिली जाईल. बालापुर विधानसभा मतदारसंघ येथून नितीन देशमुख यांच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोलले जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघात उमेदवार असतील.आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघ येथून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून रिंगणात उतरतील.
शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गट संधी देणार आहे. परभणी विधानसभा मतदारसंघ येथून राहुल पाटील हे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. चेंबूर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश फातपेकर यांना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून पुन्हा एकदा उमेदवारी भेटेल. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून येणारे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी भेटेल. कुडाळ या विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी भेटेल. उल्हास पाटील यांची उमेदवारी शिरोळ या विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाकडून निश्चित मानले जात आहे
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या विधानसभा मतदारसंघ येथून शंकरराव गडाख यांना उमेदवारी निश्चित दिले जाईल. कुलबा विधानसभा मतदारसंघ येथे गणेश सानप यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी चे तिकीट दिले जाईल.अद्वय हिरे पाटील यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ इथून शिवसेना उद्धव ठाकरे हे मालेगाव बाह्य विधानसभा येथे रिंगणात उतरवतील. गेवराई विधानसभा मतदारसंघातून बदामराव पंडित यांचे उमेदवारी येथे फिक्स मानली जात आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी दिलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांना पुन्हा एकदा ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देतील अशा चर्चा रंगल्या आहेत.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून वसंत गीते यांना उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट मिळेल. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दत्ता गोरडे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून पैठण या विधानसभा मतदारसंघातून निवडण्यात येईल. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. रमेश कोरगावकर यांना भांडुप वेस्ट विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गट हे उमेदवारी निश्चित देणार असे समजत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ठाणे विधानसभा मतदारसंघ येथून उद्धव ठाकरे गट यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे हे गंगापूर विधानसभा मतदारसंघ येथून उद्धव ठाकरे गट तिकीट देतील अशी शक्यता आहे.
नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांची उमेदवारी महाड विधानसभा मतदारसंघ येथून ठाकरे गटाकडून फिक्स मानले जात आहे. तर दापोली विधानसभा मतदारसंघ इथून संजय कदम यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील. सत्यजित पाटील हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पाचोरा या विधानसभा मतदारसंघातून वैशाली पाटील यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राजू शिंदे यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. राजू शिंदे यांनी नुकताच उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ते मानली जात आहे. तेजस्विनी घोसाळकर यांना दहिसर विधानसभा मतदारसंघ इथून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची संधी जास्त आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सुभाष भोईर यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाईल.
दिनकर माने यांना औसा या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील. खालापूर विधानसभा मतदारसंघ इथून नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर मंडळी या सर्व विधानसभा मतदारसंघ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून कोणाला उमेदवारी भेटावी असं तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा.

Exit mobile version